मुख्यमंत्री वयोश्री योजना: मिळणार ₹3000 आणि उपयोगी उपकरणे | Vayoshree Yojana

नमस्कार आपण आज महाराष्ट्र सरकारच्या एक अशा महत्त्वाकांक्षी योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत, जी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवसंजीवनी ठरणारी योजना आहे. सदरची योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय.

सध्याच्या स्थितीला राज्यांमध्ये ६५ वर्षे व त्यावरील अधिक वय असलेली लोकसंख्या सुमारे १५% च्या आसपास आहे. या लोकसंख्येची गणना ही काम न करणारी किंवा अवलंबून असणारी लोकसंख्या यामध्ये होते. त्यामुळेच राज्य सरकार द्वारे या लोकसंख्येला त्यांच्या एका ठराविक वयानंतर म्हणजेच 65 वर्षांच्या नंतर आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार आहे.

म्हणूनच सदरच्या लेखांमध्ये आपण या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत यामध्ये आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय? या योजनेचे उद्दिष्ट, सदरच्या योजनेच्या पात्रतेचे निकष किंवा नियम, सदरच्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, त्याचबरोबर वयश्री योजनेसाठी अर्ज प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल थोडक्यात… | About Vayoshree Yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाणार आहे. योजनेमध्ये महाराष्ट्रातील ६५ वर्षे व त्यावरील वयाच्या लोकांना राज्य सरकार द्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आवश्यक वस्तू लागतात. त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती या त्यांच्या वयामुळे अनेक विकारांनी किंवा आजारांनी त्रस्त असतात,त्यांना या उतार वयामध्ये अनेक व्याधींनी ग्रासलेले असते त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्य हे उत्तम प्रकारे राहावे यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ सरकार द्वारे देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत ६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदरची योजना ही वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी राबवली गेली आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा राज्यातील ६५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना होणार आहे.

मानसिक आरोग्य उपचार केंद्र तसेच कुटुंब कल्याणासाठी लागणाऱ्या इतर उपाययोजनांचा समावेश या योजनेमध्ये केला आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणारी साधनसामग्री तसेच उपचारासाठी लागणारी औषधे त्याचबरोबर वयोवृद्ध अपंग व्यक्ती असेल तर त्यासाठी लागणारे साहित्य हे सर्व या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या माध्यमातून एक चांगले जीवन जगू शकतील. त्याचबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही अशी तरतूद या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून केली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप

सदरच योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता/दुर्बलतेनुसार लागणारी साधने किंवा उपकरणे खरेदी करता येतात. त्यामध्ये खालील उपकरणांचा समावेश होतो.

  • चष्मा
  • श्रवण यंत्र
  • फोल्डिंग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • नि-ब्रेस
  • ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर
  • लंबर बेल्ट
  • सर्वाइकल कॉलर

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रतेचे निकष | Vayoshree Yojana Criteria

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी कोण कोणती निकष आहेत याबद्दल आपण पाहूया.

  • या योजनेचा लाभ घेणारे जे कोणी वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक असतील ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व नागरिक असावेत.
  • त्यांनी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असावीत.
  • ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असायला हवे जर त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल व दुसरे कोणतेही त्यांच्या ओळखीच्या पुराव्याचे कागदपत्रे असतील तर ती स्वीकारली जातील.
  • सदरच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांच्या आत असावे. त्यासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला व स्वतःचे वचन पत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी जे नागरिक अर्ज करणार आहेत, अशा व्यक्ती जिल्हा प्राधिकरणाकडून त्यांची पात्रता सिद्ध करू शकतात किंवा त्यांचे रेशन कार्ड व इतर योजनेच्या माध्यमातून निवृत वेतन असल्याचा किंवा मिळाल्याचा पुरावा देऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत जे नागरिक पात्र होतील त्यांनी त्यांचे  आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या बचत खात्याला जोडलेले असावे. या बचत खात्यामध्ये या योजनेचे ३००० रुपये  DBT प्रणाली द्वारे डायरेक्ट वितरित केल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकांनी येणाऱ्या तीन दिवसाच्या आत त्यांनी मानसिक आरोग्य केंद्रातून जी उपकरणे खरेदी केली आहेत आणि त्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे जमा करणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर वरील सर्व दस्तऐवज आणि साहित्य हे समाज कल्याण अधिकारी यांनी प्रमाणित केलेले असायला हवे.
  • ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी ची लागणारी कागदपत्रे ही ३० दिवसाच्या आत संस्थेच्या वेबसाईट वरती अपलोड करणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या बँक खात्यामधून या योजनेचे पैसे वजा केले जातील.
  • सदरच्या योजनेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ३०%  लाभार्थी या महिला असतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे | Vayoshree Yojana Documents

सदर योजनेसाठी जे नागरिक अर्ज करणार आहेत अशा नागरिकांना या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे सदरच्या कागदपत्रांची यादी आपण खाली दिली आहे.

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • स्वयंघोषणापत्र
  • ओळख पटवण्यासाठी लागणारी अन्य कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज प्रक्रिया | Vayoshree Yonana Form

१.मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. हा अर्ज व्यवस्थित भरून ग्रामपंचायत मध्ये सादर करणे आवश्यक आहे.

सदरचा फॉर्म भरत असताना या फॉर्मवर अर्जदाराला फोटो चिकटवा लागेल. त्याचबरोबर अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचे  वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा त्याचबरोबर अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात भरणे आवश्यक आहे.

अर्जदार व्यक्तीने मागील तीन वर्षांमध्ये कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही याबद्दलची घोषणापत्र अर्जासोबत भरायचे आहे.

अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर अर्जासोबतची आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करावा.

Leave a Comment