प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळवा २० लाख रुपयां पर्यंतचे कर्ज

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयीची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे पाहणार आहोत. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक लघुउद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणारी योजना आहे. देशातील एखादा तरुण जर स्वतःचा नवीन उद्योग उभारू इच्छित असेल तर, पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला किंवा तरुणाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग उभारून त्याला उद्योजक बनता येते. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही सूक्ष्म व लघु उद्योगांना उभारण्यासाठी पतपुरवठा करणारी भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात येणारे कर्ज हे उत्पादन, व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना उपलब्ध आहेत. कृषी व्यवसायामध्ये गुंतलेले उद्योजक मुद्रा योजनेसाठी अर्ज करू शकतात.

PM Mudra Yojna 2025

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाची किमान रक्कम नाही, तर कमाल कर्जाची रक्कम ही १० लाख रुपये आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी मुद्रा कर्ज घेतले आहे त्याला प्रक्रिया शुल्क देण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जावरील व्याजदर मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट (Marginal Cost of Landing Rate) द्वारे निर्धारित केले जातात. याची गणना आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनानुसार केली जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आपण या लेखांमध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे? प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे, योजनेची वैशिष्ट्ये, प्रधानमंत्री मुद्रा योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: मिळणार ₹3000 आणि उपयोगी उपकरणे | Vayoshree Yojana

प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयी थोडक्यात…

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारतातील लघु उद्योजकांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची त्याचबरोबर महत्त्वकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लघु उद्योगांना चालना देणे, रोजगार निर्मिती करणे आणि देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा आहे. या योजनेअंतर्गत १० लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते.

अर्थसंकल्प २०२४-२५: ज्या उद्योजकांनी त्यांच्या श्रेणीतील मागील कर्जाची यशस्वीपणे परतफेड केली आहे. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तरुण श्रेणी मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना उद्देश

  • लघु उद्योजकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून व्यवसाय वाढीला चालना देणे.
  • सूक्ष्म किंवा उद्योग उभारणीसाठी कर्ज पुरवठा करून लघु उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती करून बेरोजगारी कमी करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून सर्व स्तरातील लोकांना आर्थिक विकासात सहभागी करून घेणे.
  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून लोकांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन आत्मनिर्भर बनवणे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना फायदे

  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना कर्ज प्रदान करणे.
  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणी आवश्यक नसते. मुद्रा कर्जामध्ये कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • सदर योजनेअंतर्गत कर्जासाठी कमीत कमी कर्जाची रक्कम नाही.
  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात. म्हणून कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकतात.
  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या कर्जाची पद मुदतीची कर्जे आणि ओव्हर ड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमी पत्रांसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना वैशिष्ट्ये

१. प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रक्रिया शुल्क किशोर आणि शिशु कर्जासाठी ० तर तरुणांना मिळणाऱ्या खर्चासाठी ०.५% रक्कम ही प्रक्रिया शुल्क वेगवेगळ्या बँका नुसार आकारले जाते.

हे वाचा-  मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र 2025 योजनेअंतर्गत मिळणार ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान...

२. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेतले असेल तर कर्ज घेतल्यापासून ३ ते ५ वर्षी हा त्या कर्जाचा परतफेड करण्याचा कालावधी असेल.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या कर्ज रकमेवर आधारित तीन प्रकारची मुद्रा कर्जे

  • शिशु: प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५०,००० कृपया पर्यंतचे कर्ज मंजूर होऊ शकते.
  • किशोर: प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५०,००० ते ५ लाख रुपये पर्यंतचे कर्ज मंजूर होऊ शकते.
  • तरुण: सदर योजनेअंतर्गत तरुणांना ५ लाख ते १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर होऊ शकते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना पात्रता

  • लघु उद्योग व्यवसाय मालक
  • दुग्धत्पादक
  • कुक्कुटपालन
  • कारागीर
  • शेती विषयक उपक्रम संबंधित दुकानदार
  • मत्स्यपालन
  • फळ आणि भाजी विक्रेते

वरील सर्व व्यवसायामध्ये गुंतलेले व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत.

Mudra loan apply

प्रधानमंत्री मुद्रा योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन (ओळखीच्या पुराव्यासाठी या चार पैकी एक कागदपत्र आवश्यक)
  • विज बिल, गॅस बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल (पत्त्याच्या पुराव्यासाठी यापैकी एक कागदपत्र आवश्यक)
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा योजना बँक लिस्ट

  • ओरिएंन्टल बँक ऑफ कॉमर्स
  • युनियन बँक ऑफ इंडिया
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • पंजाब नॅशनल बँक
  • ॲक्सिस बँक
  • कॅनरा बँक
  • फेडरल बँक
  • इंडियन बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • युको बँक
  • इंडियन ओवरसीज बँक
  • एचडीएफसी बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • पंजाब अँड सिंध बँक
  • जम्मू अँड काश्मीर बँक
  • आयसीआयसीआय बँक
  • कारर्पोरेशन बँक
  • बँक ऑफ इंडिया
  • इलाहाबाद बँक
  • सारस्वत बँक
  • कोटक महिंद्रा बँक
  • इंडियन बँक
  • तमिळनाडू मरर्सेटाइल बँक
  • कर्नाटका बँक
  • आयडीबीआय बँक
  • सिंडिकेट बँक
  • आंध्रा बँक
  • देना बँक

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत वरील बँकांचा समावेश या योजनेमध्ये केला गेला आहे.

हे वाचा-  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र २०२४ | Ladki Bahin Yojana Online Apply

प्रधानमंत्री मुद्रा योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्जदार अर्ज प्रक्रिया दोन पद्धतीने करू शकतो एक म्हणजे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया त्याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहू.

प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला आवश्यक कागदपत्रासह जवळची वित्तीय संस्था म्हणजेच बँकेत जावे लागेल.
  • अर्जदार हा भारतातील जवळ जवळ सर्व आर्थिक संस्था म्हणजेच बँकेमध्ये मुद्रा योजनेसाठीचा अर्ज करू शकतो.
  • बँकेमध्ये गेल्यानंतर अर्जदाराला मुद्रा योजनेचा अर्ज भरावा लागेल. अर्जदाराला त्याचा वैयक्तिक व व्यावसायिक तपशील अचूकपणे द्यावा लागेल.
  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज करताना अर्जदाराला किती रक्कम घ्यायची आहे हे देखील तपासून पाहणे गरजेचे आहे.
  • मुद्रा योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करताना अर्जावर अर्जदाराला तीन पर्याय पुरवलेल्या असतील. त्यामध्ये शिशु किशोर आणि तरुण हे तीन पर्यायानुसार त्याचबरोबर तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही यापैकी कोणताही एक पर्याय निवडून या योजनेअंतर्गत कर्ज मिळवू शकता.

अशा पद्धतीने प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी ऑफलाईन अर्ज अर्जदार करू शकतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • मंत्री मुद्रा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना सर्वप्रथम आपणाला मुद्रा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👉 https://www.mudra.org.in
  • मुद्रा योजनेच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यासमोर मुखपृष्ठ उघडेल.
  • मुखपृष्ठावर सर्वप्रथम आपल्याला लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल.
  • लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल त्यामध्ये आपल्याला आपले नाव, संकेत शब्द आणि कॅप्च्या कोड लिहावा लागेल.
  • वरील प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही मुद्रा पोर्टलवर लॉगिन करण्यास सक्षम असाल.
  • त्यानंतर लॉगिन करून विचारलेली संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात भरून सबमिट बटणावर क्लिक करा.

वरील प्रमाणे आपण प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो.

सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री मुद्रा योजने विषयाची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहिली आहे. ज्या द्वारे या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना सदर माहितीचा फायदा होऊ शकेल.

Leave a Comment