पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत मिळणार घरावर सोलर बसवण्यासाठी मिळणार 78 हजार पर्यंत अनुदान

नमस्कार मित्रांनो, सदरच्या लेखांमध्ये आपण आज केंद्र सरकारच्या एक महत्त्वकांक्षी योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. या योजनेचा उद्देश म्हणजे देशातील प्रत्येक घरात सौर ऊर्जा पोहोचवून देशाला वीज क्षेत्रात स्वावलंबी बनवणे हा उद्देश आहे. या योजनेचे नाव आहे पीएम सूर्यघर योजना(PM Suryaghar Yojana) ही एक केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी सरकारी योजना आहे. ही योजना 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. या योजनेअंतर्गत भारतातील कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून सबसिडी देण्यात येणार आहे. सबसिडी ही सौर पॅनलच्या झालेल्या खर्चावर 40% पर्यंत दिली जाणार आहे. या योजनेमुळे देशातील एक कोटी कुटुंबांना या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. सदरच्या योजनेसाठी प्रति वर्ष केंद्र सरकारकडून 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी कुटुंबांना मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सदरच्या लेखांमध्ये आपण पीएम सूर्य घर योजना काय आहे? त्याचबरोबर या योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो? या योजनेसाठीची पात्रता काय आहे? त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे? या सर्व मुद्द्यांची आपण सविस्तरपणे माहिती या लेखात पाहणार आहोत.

पीएम सूर्य घर योजना(PM Surya Ghar Yojana) म्हणजे काय?

भारतातील मुख्य समस्त पैकी एक समस्या म्हणजे म्हणजे वीज आहे. देशातील बहुसंख्य लोकांना विजेच्या खर्चाने हैराण करून सोडले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने देशातील जनतेसाठी पीएम सूर्यघर योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या माध्यमातून देशातील लोकांची विजेच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. या योजनेसाठी केंद्र सरकारने 75 हजार कोटी रुपये चा निधी निश्चित केला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने एक कोटी घरांवर सौर पॅनल लावण्याचे लक्ष ठेवले आहे. ग्रामीण भागात पोस्ट खात्याच्या माध्यमातून गावातील पक्क्या घरांचा सर्वे करून या घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी चे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सदरच्या योजनेसाठी देशातील कोणतीही व्यक्ती अर्ज प्रक्रियेद्वारे पात्र होऊ शकते. त्याचबरोबर या योजनेसाठी कधीही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

हे वाचा-  प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळवा २० लाख रुपयां पर्यंतचे कर्ज

पीएम सूर्यघर योजनेविषयी थोडक्यात…

पी एम सूर्यघर योजना ही केंद्र शासनाकडून राबवली जात आहे. ही योजना 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे एक कोटी नागरिकांना मोफत वीज देणे आणि त्या व्यक्तींच्या घरावर सोलर पॅनल बसवणे. या योजनेचा लाभ देशातील गरीब कुटुंबांना घेता येतो. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 30 हजार ते 78 हजार रुपये पर्यंत ची सबसिडी मिळते. या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो. यासाठी पी एम सूर्यघर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.???????????? https://pmsuryaghar.gov.in

पीएम सूर्यघर योजना (PM Surya Ghar Yojana) उद्देश

  • देशाची ऊर्जा स्वावलंबिता वाढवून ऊर्जा आयातीवरचे अवलंबित्व कमी करणे.
  • देशामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात रोजगार निर्मिती करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे.
  • सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देऊन देशाला स्वच्छ आणि हरित ऊर्जा उपलब्ध करून देणे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शाश्वत वीज पुरवठा करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी घरांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देणे.

पीएम सूर्यघर योजना (PM Surya Ghar Yojna) फायदे

  • या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे.
  • आपला देश उष्णकटिबंधात असल्यामुळे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाशाची उपलब्धता असते त्यामुळे या योजनेत सौर ऊर्जेचा जास्त वापर होणार असून,नैसर्गिक संसाधनाची बचत होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या विजेमुळे प्रदूषण होणार नाही. त्याचबरोबर दगडी कोळशाच्या माध्यमातून जी वीज तयार होत होती ती कमी प्रमाणात तयार होईल.
  • या योजनेअंतर्गत एक कोटी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 40% पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
  • प्रत्येक कुटुंबाला एक किलो वॅट क्षमतेच्या प्लांट साठी तीस हजार रुपये तर दोन किलो वॅट क्षमतेच्या प्लांट साठी 60000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
  • जे लोक आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसतील त्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी 78 हजार रुपये पर्यंत अनुदान आणि 300 युनिट मोफत विजेचा लाभ मिळणार आहे.
हे वाचा-  विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2025 मिळणार राज्यातील विधवा महिलांना पेन्शन...

पीएम सूर्यघर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • छत असलेल्या घराचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • विज बिल
  • बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

पीएम सूर्यघर योजनेसाठीची पात्रता

  • सर्वप्रथम या योजनेसाठी पात्र असण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी कुटुंबाकडे वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे.
  • संबंधित कुटुंबाकडे छत असलेले घर असणे गरजेचे आहे.
  • संबंधित कुटुंब सौर पॅनलसाठी अन्य सबसिडी असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभार्थी नसावे.
  • कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.
  • आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.

पीएम सूर्यघर योजनेसाठी रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने करावे

  • पी एम सूर्यघर योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.???????????? https://pmsuryaghar.gov.in     
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे apply solar हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
  • नवीन पेजवर registration here या पर्यायावर क्लिक करा.
  • यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा निवडायचा आहे.
  • त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते नंबर तेथे टाका.
  • Next बटन क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर तुम्हाला एक  OTP येईल तो OTP तिथे टाका.
  • वरील process केल्यानंतर नंतर तुमची नवीन नोंदणी होईल.
हे वाचा-  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र २०२४, या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३० हजार आर्थिक मदत...

पीएम सूर्यघर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

  • पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पीएम सूर्यघर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. येथे गेल्यानंतर login here या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि कॅप्च्या भरा.
  • नंतर next बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन होमपेज उघडेल.
  • त्यामध्ये Apply for rooftop solar installation हा फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • या फॉर्ममध्ये application details मध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल.
  • नंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • शेवटी तुम्ही संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा चेक करून final submit करावा यानंतर तुमचा फॉर्म तपासणीसाठी जाईल आणि त्यानंतर तुम्हाला मंजूर मिळेल आणि त्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल.

वरील माहितीच्या आधारे देशातील कोणत्याही नागरिक पीएम सूर्यघर योजनेसाठी अर्ज करू शकतो. आम्ही पीएम सूर्य घर योजने संबंधित संपूर्ण माहिती अचूकपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा घेऊ शकता.

Leave a Comment