महात्मा फुले जन आरोग्य मोफत उपचार योजना 2025 | ५ लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत…

नमस्कार, केंद्र आणि राज्य सरकार देशातील आणि राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास नागरिकांसाठी सतत काही ना काही योजना राबवत असते. यामधील आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेली आरोग्य विषयक योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेची संपूर्ण माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यावर पाच लाख रुपयापर्यंत उपचार मोफत केले जातात.

Mahatma Phule Jan Aarogya Yojana 2024

राज्यातील पिवळे रेशन कार्ड धारक व केशरी रेशन कार्ड धार कुटुंबांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना एक दर्जेदार व मोफत वैद्यकीय सुविधा मिळत आहेत.

सदर लेखामध्ये आपण या योजनेविषयीची संपूर्ण माहिती यामध्ये योजनेची वैशिष्ट्ये, उद्देश, फायदे, योजनेचे स्वरूप, योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, योजनेची पात्रता, त्याचबरोबर योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेविषयी थोडक्यात…

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाही महाराष्ट्र सरकार द्वारे राबविण्यात येते. ही योजना २ जुलै २०१२ रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व रेशन कार्डधारक घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयापर्यंत चे उपचार मोफत केले जातात. या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवणे हा आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जात असे. सुरुवातीला योजना ८ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती नंतर राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला त्यानंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लागू करण्यात आली.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आरोग्य विषयक विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारी आणि खाजगी रुग्णालयात विविध आजारावर मोफत उपचार करण्यात येतात. १ एप्रिल २०२० पासून राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच राज्यातील सर्व रेशन कार्डधारक सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात.

हे वाचा-  मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र Online Apply, बेरोजगारांना मिळणार 6000 रुपये मासिक भत्ता

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळतो, तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी होणाऱ्या खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये ६०:४० अशी करण्यात आली आहे. दोन्ही योजना एकत्र करण्यात आले असल्यामुळे राज्यातील नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार घेता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने यामध्ये काही गंभीर आजारांचाही समावेश केला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना वैशिष्ट्ये…

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे.
  • राज्यातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत दवाखान्यामध्ये त्यांचा एक प्रतिनिधी नागरिकांच्या मदतीसाठी ठेवलेला आहे. तो प्रतिनिधी नागरिकांची मदत करून या योजनेअंतर्गत लाभ मिळवून देतो.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड फोटो ओळखपत्राच्या आधारे योजनेचा लाभ दिला जातो.
  • राज्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील पांढरे रेशन कार्ड  किंवा शेतकऱ्याकडील असलेल्या ७/१२ उतारा व ओळखपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ घेता येतो.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत रुग्णालयामध्ये नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, कॅन्सर शस्त्रक्रिया, डेंगू, स्वाइन फ्लू, मलेरिया, पीडियाट्रिक सर्जरी, सिकलसेल ॲनिमिया यासारख्या आजारावरील योजनेच्या माध्यमातून उपचार केले जातात.
  • राज्यातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना उद्दिष्टे

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:

  • राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना या योजनेच्या माध्यमातून गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
  • राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास नागरिकांना चांगले उपचार मिळावेत हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
  • आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबांना चांगले उपचार घेण्यासाठी ही योजना खूपच महत्त्वाची आहे त्यांना आजारावर उपचार घेण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंब राहण्याची गरज भासणार नाही.
  • राज्यातील प्रत्येक व्यक्तीला चांगली वैद्यकीय सेवा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभार्थी

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी खालीलप्रमाणे:

  • राज्यातील ज्या कुटुंबांचे उत्पन्न वार्षिक एक लाख रुपयां पर्यंत आहे, आणि त्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड, अंतोदय रेशन कार्ड, त्याच बरोबर केशरी रेशन कार्ड आहे असे सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.
  • राज्यांमधील ज्या आश्रम शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेच्या माध्यमातून उपचार घेता येणार आहेत.
  • राज्यातील बांधकाम कामगार व त्यांच्या मुलांनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो.
  • सरकारी आश्रमातील महिला, अनाथ मुले यांनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ दिले जातात.
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २०११ च्या जनगणनेतील ग्रामीण व शहरी भागासाठी निश्चित केलेल्या नकाशानुसार राज्यातील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती नाही महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार घेता येतात.
हे वाचा-  कृषी यांत्रिकीकरण महाराष्ट्र योजनेअंतर्गत शेती अवजारे खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान जाणून घ्या सविस्तर माहिती

महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना वार्षिक विमा संरक्षण मर्यादा

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या कुटुंबाला प्रति वर्ष १.५ लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत केले जातात. यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण साठी मर्यादा प्रति कुटुंब प्रति वर्ष २.५ लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांना घेता येतो. आता या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करून ती पाच लाख रुपयापर्यंत केले आहे त्याचबरोबर या योजनेत अनेक आजारांचा समावेश ही करण्यात आलेला आहे.

आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील कोणत्याही नोंदणीकृत दवाखान्यामध्ये दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रत्येक कुटुंब प्रत्येक कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपये पर्यंतचे आरोग्य कवच पुरवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांना घेता येतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून १.५ लाख रुपयापर्यंत विमा कवच देण्यात येते तर १.५ लाखा पेक्षा जास्त ५ लाख रुपयापर्यंतचे विमा कवच राज्य सरकारद्वारे आरोग्य हमी सोसायटी मार्फत हमी तत्वावर देण्यात येते. या योजनेच्या पॉलिसीचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च यादरम्यान असते.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ खालील प्रमाणे:

  • यापूर्वी केवळ पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना त्या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत होता मात्र आता राज्यातील सर्व रेशन कार्ड धार कुटुंबने या योजनेचा लाभ घेता येतो.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना चांगल्या व दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांवर मोफत उपचार केले जातात.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून किडनी ट्रान्सप्लाटेशन साठी ३ लाख रुपये आणि कुटुंबाच्या उपचारासाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत २ लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जात आहे यामध्ये आता वाढ करून ५ लाख रुपये पंच विमा संरक्षण करण्यात आले आहे.
  • महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून घरी गेल्यानंतर १० दिवसापर्यंत चालणारे उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचार, रोगांचे निदान व एखाद्या उपचारासाठी अत्यावश्यक उपचार, जेवण, एका वेळचा परतीचा प्रवास खर्चही दिला जातो.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या आजाराचे निधन मोफत केले जाते आणि त्याच्यावर उपचार ही मोफत केले जातात.
  • या योजनेचा लाभ घेत असताना राज्यातील नागरिकांना एक रुपयाचाही खर्च करण्याची आवश्यकता नाही.
हे वाचा-  प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना २०२५ | अटल पेन्शन योजनेअंतर्गत सर्व वृद्धांना मिळणार पेन्शन

महात्मा फुले जन आरोग्य योजना नियम व अटी

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नियम व अटी खालील प्रमाणे:

  • या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी सर्वप्रथम ती व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • आर्थिक दृष्ट्या मागास आणि सर्व रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न २ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे केवळ रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आवश्यक कागदपत्रे

या योजनेअंतर्गत आवश्यक असलेली कागदपत्रे खालील प्रमाणे:

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा
  • लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे कोणतेही एक रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. (पिवळे, केशरी,अंत्योदय यापैकी एक)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्न दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  • लाभार्थी एक्स सर्विस मॅन असल्यास त्याचे ओळखपत्र
  • राजीव गांधी हेल्थ कार्ड

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अर्ज प्रक्रिया

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे:

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.???????????????????????? https://www.jeevandayee.gov.in
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक मुखपृष्ठ उघडेल त्यावर ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर तुमच्यासमोर महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यामध्ये तुम्हाला फ्रेश एप्लीकेशन हा पर्याय निवडायचा आहे.
  • या पर्यावरण क्लिक केल्यानंतर नाव नोंदणीसाठी तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल.
  • यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे.
  • सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून झाल्यावर व या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

सदर लेखांमध्ये आपण महात्मा फुले जन आरोग्य योजने विषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात पाहिली आहे. यामध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, उद्देश, पात्रता, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठीची विमा संरक्षण मर्यादा, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल, त्याचबरोबर तुम्ही या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घ्याल. धन्यवाद!

Leave a Comment