आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणार ५ लाख पर्यंतचे उपचार मोफत

सदर लेखामध्ये आपण केंद्र सरकारची एक आरोग्य विषयक योजना जी देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्य विषयक सेवा मोफत मिळावेत यासाठी राबवली जाते त्या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर ही योजना म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना होय. केंद्र सरकारने या योजनेचा शुभारंभ २०१८ ला केला होता. या योजनेमध्ये देशातील कोट्यावधी लोक सहभागी झाले असून ते या योजनेचा लाभ घेत आहेत.

Ayushman Bharat Pradhanmantri Jan Aarogya Yojana 2025

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून लाभार्थ्याला ५ लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. त्यासाठी केंद्र सरकारकडून गोल्डन कार्ड ची सुविधा दिली गेली आहे. या  योजनेअंतर्गत सरकारकडून नागरिकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड दिले जाते या आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयामध्ये जाऊन ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत आणि मिळवू शकतात. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कसे काढायचे याविषयीची माहिती आपण खाली पाहणारच आहोत.

आपण या लेखामध्ये आयुष्यमान भारत योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये या योजनेची वैशिष्ट्ये, या योजनेसाठीची पात्रता, उद्देश, त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि या योजनेचे अर्ज प्रक्रिया, त्याचबरोबर गोल्डन कार्ड कसे काढायचे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने विषयी थोडक्यात…

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना केंद्र सरकार द्वारे देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरिकांना आरोग्य विमा कवच प्रदान करते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पाच लाख रुपयांचे उपचार मोफत दिले जातात. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आता ७० वर्षे वयोगटातील वृद्धांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी नागरिकांच्या उत्पन्न स्तरावरील निर्बंध काढून टाकून त्याचबरोबर वाढता वैद्यकीय खर्च लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा वृद्धांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांना आरोग्य विमा कवच प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

हे वाचा-  महात्मा फुले जन आरोग्य मोफत उपचार योजना 2025 | ५ लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत...

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांचे अतिरिक्त टॉप अप कव्हर मिळेल. पूर्वी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रामुख्याने ४०% लोकसंख्येला आरोग्य मदत करत आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना सेवा देणार आहे. या निर्णयामुळे देशातील ४.५ कोटी कुटुंबातील ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक लाभार्थ्याला नवीन हेल्थ कार्ड मिळेल ज्यामुळे आरोग्य सेवेचा फायदा त्यांना घेता येईल. तसेच एकाच कुटुंबात अनेक ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असल्यास ५ लाख रुपये त्यांच्यामध्ये विभागले जातील. केंद्र सरकारने हे पाऊल चांगले उचलले आहे कारण भारतात विभक्त कुटुंब पद्धती आहे, जेथे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यावर होणारा खर्च हा आर्थिक भार आहे त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे खालील प्रमाणे:

  • आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दरवर्षी ५ लाख रुपये पर्यंतचे आरोग्य संबंधित उपचार मोफत दिले जातात.
  • या योजनेत रूम भाडे, डॉक्टरांचे शुल्क, निदान सेवा, उपचार खर्च, आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर खर्च यासह सुमारे १३९३ प्रकारच्या बाबींसाठी आर्थिक संरक्षण प्रदान केले जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी भारतातील सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही रुग्णालयामध्ये कॅशलेस मेडिकल सुविधांचा दावा किंवा क्लेम करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला ३ दिवसासाठी प्री- हॉस्पिटललायझेशन कव्हर आणि १५ दिवसांसाठी पोस्ट हॉस्पिटललायझेशन कव्हर मिळेल. या उपचारादरम्यान रुग्णाला औषधे आणि निदानासाठी संपूर्ण कव्हरेज देखील मिळणार आहे.
  • आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा मोठा फायदा म्हणजे हे कोणत्याही व्यक्तीला त्याचे लिंग, वय आणि कौटुंबिक आकारानुसार या योजनेचा फायदा किंवा लाभ घेण्यास प्रतिबंध करत नाही.
  • पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजने संबंधित दिले जाणारे ओळखपत्र किंवा आयडी कार्ड जवळ ठेवणे आवश्यक आहे.
हे वाचा-  मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र Online Apply, बेरोजगारांना मिळणार 6000 रुपये मासिक भत्ता

आयुष्यमान भारत योजना पात्रता

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकापर्यंत पोहोचवणे यावर सरकारचा भर असल्याने या योजनेच्या पात्रतेचे निकष किंवा अटी या कडक आहेत. त्यामुळे सरकारने शहरी व ग्रामीण असे दोन भाग पात्रतेचे केले आहेत, ते खालील प्रमाणे:

आयुष्मान भारत योजना  पात्रता शहरी भाग

  • बांधकाम कामगार/सुरक्षारक्षक/ प्लंबर/चित्रकार
  • धोबी/चौकीदार
  • कचरा वेचणारे
  • इलेक्ट्रिशियन/दुरुस्ती कामगार/मेकॅनिक
  • घरगुती काम करणारे कामगार
  • रस्त्यावर काम करणारी चांभार/फेरीवाले/इतर सेवा पुरवठादार
  • ड्रायव्हर/ट्रान्सपोर्ट वर्कर/कंडक्टर आणि यांच्याशी संबंधित इतर लोक
  • घर-आधारित कामगार/शिंपी/कारागीर
  • डिलिव्हरी सहाय्यक/दुकानात काम करणारे कामगार

आयुष्यमान भारत योजना पात्रता ग्रामीण भाग

  • अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती
  • १६ ते ५९ वर्षे वयोगटातील एकही पुरुष प्रौढ सदस्य नसलेले महिलांच्या नेतृत्वाखालील कुटुंब
  • शारीरिक दृष्ट्या अपंग सदस्य असलेली कुटुंबे (किमान एक व्यक्ती शारीरिक दृष्ट्या अपंग असावा.)
  • भूमिहीन कुटुंबे ज्यांच्या कमाईचे एकमेव साधन म्हणजे मजुरी करणे
  • कायदेशीर दृष्ट्या सुटका झालेले बंधूआ मजूर
  • कच्चे छप्पर आणि भिंती असलेल्या एका खोलीच्या घरात राहणारे लोक

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आवश्यक कागदपत्रे

आयुष्यमान भारत योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड (वय आणि ओळखीचा पुरावा म्हणून)
  • रेशन कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला (जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये पर्यंत असावे.)
  • कुटुंबाची सद्यस्थिती (संयुक्त/विभक्त) त्यासंबंधीचे सहाय्यक दस्तऐवज

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील आजारांचा समावेश

आयुष्यमान भारत योजना अंतर्गत समाविष्ट असलेल्या आजारांची यादी खालील प्रमाणे:

  • कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग
  • कवटीच्या तळाशी सर्जरी
  • पूर्ववर्ती मणक्याचे स्थिरीकरण
  • डबल वॉल्व रिप्लेसमेंट
  • प्रोटेस्ट कर्करोग
  • पल्मोनरी वॉल्व रिप्लेसमेंट
  • गॅस्ट्रिक पुल-अप सह लेरिंगोफरेन्जेटॉकमी
  • स्टेन्टसह कॅरोटिड एंजीओप्लास्टी
  • जळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर डिसफिगरमेंटसाठी उतक विस्तारक
  • लाभार्थी या योजनेअंतर्गत कोविड- १९ चाचणी आणि उपचार देखील विनंती घेऊ शकतात.
हे वाचा-  NPS वात्सल्य योजना २०२५|Online Apply|या योजनेअंतर्गत सुरू होणार लहान मुलांना पेन्शन

खालील उपचारासाठी या योजनेमध्ये आर्थिक तरतूद नाही ते उपचार खालील प्रमाणे:

  • अवयव प्रत्यारोपण
  • ओपीडी
  • इंडिव्हिज्युअल निदान
  • कॉस्मेटिक संबंधित कार्यपद्धती
  • औषध पुनर्वसन कार्यक्रम
  • प्रजनन संबंधित कार्यपद्धती

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्ज प्रक्रिया

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येतो त्याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:

  • आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇🏽👇🏽 https://www.pmjay.gov.in
  • त्यानंतर नवीन नाव नोंदणीसाठी New Registration किंवा Apply यावर क्लिक करा.
  • नंतर त्यामध्ये तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादीची माहिती प्रविष्ट करा.
  • जी माहिती तुम्ही प्रविष्ट केली आहे ती पुन्हा एकदा तपासा.
  • त्यानंतर या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • पुन्हा एकदा पूर्ण अर्ज तपासून सबमिट करा.
  • या सर्व प्रोसेस मधून गेल्यानंतर तुमचे आयुष्यमान भारत योजनेचे हेल्थ कार्ड तयार होईल.

याशिवाय ऑफलाइन पद्धतीने जर एखादा व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेचा अर्ज करणार असेल तर तो त्याच्या गावातील आरोग्य केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) केंद्रामधून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून तुमचे हेल्थ कार्ड मिळवू शकता.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव कसे तपासावे?

  • कॉमन सर्विस सेंटर (CSC): हेल्थकेअर योजनेसाठी आपली पात्रता निश्चित करण्यासाठी जवळचे सीएससी किंवा कोणतेही पॅनल बद्ध हॉस्पिटल शोधा.
  • हेल्पलाइन क्रमांक: या योजनेविषयीची सर्व आवश्यक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही १८००-१११-५६५ किंवा १४५५५ या हेल्पलाइन नंबरचा वापर करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ वरील माहितीच्या आधारे घेऊ शकता. सदर लेखांमध्ये आपण या योजनेविषयीची संपूर्ण माहिती यामध्ये योजनेची वैशिष्ट्ये, फायदे, आवश्यक कागदपत्रे, या योजनेची पात्रता, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद!

Leave a Comment