मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र २०२४ | Ladki Bahin Yojana Online Apply

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एक महत्वाकांक्षी योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सदरची योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखली जाते. चला तर मग जाणून घेऊया ही योजना काय आहे?

राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी किंवा आर्थिक सहाय्यक देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला आर्थिक स्वरूपात मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली.

सदरचा लेख हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे काय? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फायदे, त्याचबरोबर या योजनेचा उद्देश, अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, या योजनेसाठीची पात्रता, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याविषयीची संपूर्ण माहिती आपण सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विषयी थोडक्यात…

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. ही योजना महिलांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अंमलात आणली आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला आपले योगदान राज्यासाठी किंवा देशासाठी देऊ शकतील.

हे वाचा-  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र २०२४, या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३० हजार आर्थिक मदत...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून सुरू करण्यात आली होती त्याची अंतिम तारीख १५ जुलै पर्यंत होती. परंतु या योजनेसाठीचा राज्यातील महिलांचा प्रतिसाद पाहता ही तारीख सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली होती. तारीख वाढवूनही अद्यापही राज्यातील काही महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या असल्याने राज्य सरकारने या योजनेचा लाभ राज्यातील शेवटच्या महिलेला मिळत नाही तोपर्यंत या योजनेचा अर्ज भरणे सुरू राहील असे सांगितले आहे. या योजनेसाठी २१ वर्षे ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एका वर्षात ३ मोफत एलपीजी गॅस टाक्या मोफत मिळणार आहेत. ही योजना महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या हितासाठी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे

  • सदरच्या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांचे राहणीमान सुधारण्यास मदत होणार आहे.
  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक दुर्बल महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे त्यामुळे महिला या काही प्रमाणात आर्थिक सक्षम होतील.
  • या योजनेद्वारे महिलांना जी आर्थिक मदत मिळणार आहे या मदतीमुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. या आर्थिक मदतीच्या आधारे महिला आरोग्य सुविधा बरोबरच इतर गरजेच्या गोष्टी घेऊ शकते.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम झाल्यामुळे त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे महिलांना समाजात समान स्थान मिळण्यास मदत होईल.
हे वाचा-  पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत मिळणार घरावर सोलर बसवण्यासाठी मिळणार 78 हजार पर्यंत अनुदान

सदरच्या योजनेमुळे महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यामुळे त्या स्वावलंबी बनतील. त्याचबरोबर समाजात त्यांना समान स्थान मिळेल. त्यामुळे ही योजना महिलांसाठी उत्तम योजना आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता

  • सदरच्या योजनेसाठी अर्जदार करणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या महिलेचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
  • अर्जदार करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी, त्याचबरोबर आयकर भरणारी नसावी.
  • अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची लिंक असावे‌.
  • अर्जदार करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर चार चाकी वाहने नसावीत.
  • अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नसावा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे/केसरी रेशन कार्ड
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • बँक पासबुक
  • अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
  • अर्जदार महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर पतीचे रेशन कार्ड/मतदान कार्ड/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठीच्या अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे भरता येतो त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात खाली पाहूया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलच्या प्ले स्टोअर वरून Narishakti Doot हे ॲप डाऊनलोड करा.
  • त्यानंतर हे ॲप ओपन करा आणि मोबाईल नंबर टाकून अटी आणि शर्ती वरती क्लिक करा आणि OTP पडताळणी करून Login करून घ्या.
  • या ॲप वरती लॉगिन केल्यानंतर ॲप चे मुख्य पेज ओपन होईल त्यावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर सदरच्या योजनेचा अर्ज ओपन होईल. तो अर्ज तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. अर्ज भरल्यानंतर शेवटी आवश्यक ती कागदपत्रे Scan करून Upload करायची आहेत.
  • कागदपत्रे Upload केल्यानंतर Accept हमीपत्र Disclaimer यावर टिक करून माहिती जतन करा यावर क्लिक करा.
हे वाचा-  विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2025 मिळणार राज्यातील विधवा महिलांना पेन्शन...

अशाप्रकारे, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मोबाईल वरून भरू शकता. जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहिण योजना पोर्टल वरून अर्ज करायचा असल्यास खालील लिंक वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडीत जावे लागेल.
  • अंगणवाडी सेविकेकडून तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज घ्यावा लागेल.
  • माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज व हमीपत्र खालील वेबसाईटवरून तुम्ही डाऊनलोड करून मिळवू शकता.👇👇👇 https://drive.google.com/file/d/1LGdcBSwHrFeQttw3CAyC-pykJJH0wXfP/view
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी फॉर्ममध्ये भरलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, बँकेचे नाव, बँक खाते नंबर, आय एफ एस सी कोड इत्यादी माहिती अचूक स्वरूपात भरावी.
  • सदरचा अर्ज भरून झाल्यावर आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
  • आवश्यक ती कागदपत्रे जोडून झाल्यावर पुन्हा एकदा अर्जावरील संपूर्ण माहिती तपासायची आहे. आणि आपला अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे.
  • अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा केल्यानंतर त्यांच्याकडून अर्जाची पोहोच पावती घ्यायची आहे.

वरील योजनेचा अर्ज तुम्ही या प्रकारे ऑफलाइन पद्धतीने भरू शकता.

Leave a Comment