कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र २०२४ | कुसुम सोलर योजनेअंतर्गत ९०% अनुदानावर सोलर पंप मिळवा

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण केंद्र सरकारच्या अशा एका योजनेबद्दल पाहणार आहोत की जी योजना शेतकऱ्यांसाठी नव संजीवनी देणारी ठरणार आहे. शेतकऱ्यांना नव संजीवनी देणाऱ्या या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना. केंद्र सरकार कडून ही योजना राबवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे निसर्गाचा लहरीपणा आणि विजेचा तुटवडा यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सहजपणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते, आणि हेच संकट ओळखून केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे.

आपण सदरच्या लेखांमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेविषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात मांडणार आहोत यामध्ये आपण कुसुम सोलार योजना म्हणजे काय? कुसुम सोलार योजनेची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर कुसुम सोलार योजनेसाठीची पात्रता, या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, या योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ही शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना एक महत्त्वाची योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सौर पंप,सौर पॅनल यांच्या खरेदीसाठी अनुदान आणि सबसिडी स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

  • प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेची घोषणा २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी हा उद्देश समोर ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचे महत्त्व

  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी हा सौर ऊर्जेच्या द्वारे स्वतःची वीज स्वतः तयार करू शकतो त्याला इतर पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी होऊ शकते.
  • या योजनेच्या द्वारे सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा विजेवर होणारा खर्च कमी होतो.
  • सौर ऊर्जेच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, सौर ऊर्जा ही एक स्वच्छ आणि पर्यावरण पूरक ऊर्जा स्त्रोत आहे.
  • आपला देश उष्ण कटिबंधात असल्यामुळे येथे वर्षभर स्वच्छ सूर्यप्रकाश असतो त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून आपला देश सौर ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने एक यशस्वी वाटचाल करत आहे.
हे वाचा-  पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत मिळणार घरावर सोलर बसवण्यासाठी मिळणार 78 हजार पर्यंत अनुदान

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचे मुख्य घटक

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ही प्रामुख्याने तीन मुख्य घटकावर आधारित आहे,तीन मुख्य घटक खालील प्रमाणे.

  • प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सोलर पंप बसवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या गटांना सोलर पावर प्लांट उभारण्यासाठी मदत करणे.
  • प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेच्या माध्यमातून ग्रीड कनेक्टेड सोलर पावर प्लांट उभारणे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर सौर कृषी पंप पात्रता निकष

  • आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज मंजूर झाले नाहीत ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • बोरवेल, विहीर, शेततळे, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या माध्यमातून शेतामध्ये पाण्याचा शाश्वत स्त्रोत असणे आवश्यक आहे.
  • ज्या कोणा शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे, अशा ठिकाणी वीज कनेक्शन उपलब्ध होऊ शकत नाही असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
  • शेतकऱ्यांच्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार हे सौर पंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
  • २.५ एकर शेतजमीन शेतकऱ्यांना ३ एचपी डीसी, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी डीसी, ७ एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ एचपी डीसी तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंपासाठी अनुदान दिले जाणार आहे.
  • सदरच्या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारताचा नागरिक असावी.
  • सदरच्या योजनेअंतर्गत स्वयं गुंतवणुकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
  • प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमतेच्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करू शकतो.
  • या योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ Megawatt ते २ Megawatt क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज करू शकतात.
हे वाचा-  ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025| ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत मिळणार १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

वर दिलेल्या प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेसाठी पात्रतेमध्ये जो कोणी शेतकरी बसत असेल तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना वैशिष्ट्ये

  • या योजनेसाठी महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये पारेषण विरहित ३८१४ सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना दिवसाही पाणी देता येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी स्वखर्चाने अन्य उपकरणेही त्याला जोडू शकतो.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त क्षमतेची सौर पंप उपलब्ध होणार आहेत.
  • प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी पंप किमतीच्या १०% तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना ५% हिस्सा हा लाभार्थी यांचा राहणार आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रेशन कार्ड
  • नोंदणी प्रत
  • जमीन प्रत
  • प्राधिकरण पत्र
  • चार्टर्ड अकाउंटंट द्वारे जाहीर केलेले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते स्टेटमेंट

वरील सर्व कागदपत्रे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी अनिवार्य आहेत.

Kusum solar online form

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज करताना शेतकरी केवळ ऑनलाइन स्वरूपातच अर्ज करू शकता. तर कोणत्याही माध्यमातून या योजनेसाठीचा अर्ज स्वीकारला जात नाही. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरता येत नसेल त्यांनी ऑनलाईन केंद्रावर जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकतात. सदरच्या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आपण खाली पाहूया.

  • प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या संकेतस्थळावर जावे लागेल.👇 https://kusum.mahaurja.com
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ‘एक लाभार्थी नोंदणी फॉर्म’ मिळेल, फॉर्म मिळाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि इतर संबंधित तपशील वापरून लाभार्थी म्हणून नोंदणी करावी लागेल.
  • लाभार्थी नोंदणी फॉर्ममध्ये तुमचे गाव किंवा स्थान ही आवश्यक माहिती भरल्यानंतर सौर पंपाच्या क्षमतेनुसार (३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी) तुमच्या स्थानासाठी योजनेची उपलब्धता दर्शवणारा पॉप अप विंडो दिसेल.
  • तुमच्या स्थान किंवा गावासाठी योजनेअंतर्गत  कोट्याच्या उपलब्धतेवर अवलंबून तुम्ही अर्ज फी भरून पुढे जा.
  • पेमेंट भरताना पेमेंट फॉर्ममध्ये अचूक माहिती भरा. UPI, NET BANKING/ATM आणि CREDIT CARD द्वारे फी भरू शकता.
  • अर्जाची फी भरल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस (SMS) पाठवला जाईल. त्यानंतर OTP साठी एसएमएस चेक करा आणि पोर्टलवर अचूक स्वरूपात प्रविष्ट करा.
  • OTP अचूक स्वरूपात प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीसाठी एक पुष्टीकरण विंडो दाखवली जाईल. या विंडोमध्ये तुमचा अर्ज क्रमांक नाव मोबाईल नंबर या वेब पेजवर दिसतील.
  • तुम्ही पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचा सौर पंप घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता.
  • तुमचा अर्ज लॉगिन करण्यासाठी SMSद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पाठवलेला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरा आणि अर्ज पूर्णपणे अचूक स्वरूपात भरा.
  • सर्व तपशील अचूकपणे पूर्ण केल्यानंतर, अर्जदाराने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करणे गरजेचे आहे. अर्ज सबमिट केल्यावर अर्जदाराला ‘यशस्वीपणे नोंदणीकृत’ असा मेसेज पोचपावती क्रमांक स्वरूपात प्राप्त होईल.
हे वाचा-  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र २०२४, या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३० हजार आर्थिक मदत...

वरील माहितीचा संदर्भ घेऊन अर्जदार शेतकरी हा कुसुम सोलर योजनेसाठीचा अर्ज अगदी अचूक स्वरूपात भरू शकेल.

सदरच्या लेखांमध्ये आपण केंद्र सरकारची एक विजेच्या बाबतीत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना याविषयीची संपूर्ण माहिती आपण अगदी सविस्तर पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे शेतकरी वर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेचा वापर आपल्या शेतीमध्ये करू शकतात आणि आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ करू शकतात.

Leave a Comment