प्रधानमंत्री गोबर धन योजना २०२५ पहा संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा आपला लेख हा शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे, कारण केंद्र सरकारची एक योजना जी फक्त शेतकरी वर्गालाच लागू होते. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री गोबर धन योजना होय. आज-काल जगामध्ये अनेक विविध प्रकारचे साथीचे रोग उद्भवत आहेत. त्यामध्ये आपला देश मागे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता, अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे साथीचे रोग उद्भवतात त्यामुळे अनेक नागरिकांना या रोगामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. म्हणूनच केंद्र सरकारने खेडेगावातील स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच बरोबर शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढवून ते आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारने २०१८ मध्ये प्रधानमंत्री गोबर धन योजना सुरू केली होती.

Pradhanmantri Gobar Dhan Yojana 2025

प्रधानमंत्री गोबर धन योजना ही भारत सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे खेडेगावातील गोबर आणि जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, त्याचबरोबर स्वच्छ भारत या मोहिमेला चालना देणे हे आहे.

प्रधानमंत्री गोबर धन योजना सुरू होऊन भरपूर कालावधी होऊन गेला. पण देशातील शेतकरी वर्गाला अशी कोणती योजना आहे हे बऱ्यापैकी माहित नाही. त्यामुळेच आपण सदर लेखाच्या माध्यमातून या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रधानमंत्री गोवर्धन योजनेची उद्दिष्टे, या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये, प्रधानमंत्री गोबर धन योजनेची पात्रता, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, प्रधानमंत्री गोबर धन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: मिळणार ₹3000 आणि उपयोगी उपकरणे | Vayoshree Yojana

प्रधानमंत्री गोबर धन योजना उद्दिष्टे

आपल्या देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. त्यामधील जवळपास सर्वच लोक शेती या व्यवसायात गुंतले आहेत. शेती व्यवसाय करताना साहजिकच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या पशुपालनामध्ये गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश असतो. या सर्व पशुंच्याद्वारे दररोज मोठ्या प्रमाणावर शरीरातील टाकाऊ पदार्थ शेणांच्या स्वरूपात बाहेर टाकले जातात. या टाकाऊ पदार्थांचा उपयोग खत तयार करण्यासाठी होतो. ज्या शेतकऱ्यांच्याकडे शेती आहे ते याचा उपयोग त्यांच्या शेतीमध्ये करतात. पण जे नागरिक फक्त पशुपालन या व्यवसायावर अवलंबून आहेत त्यांना शेती नाही त्यामुळे या जनावरांकडून तयार होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचा उपयोग करू शकत नाही, अशा शेतकरी बांधवांसाठी ही योजना फायद्याची आहे. अशा शेतकऱ्यांसाठीच केंद्र सरकारने प्रधानमंत्री गोबर धन योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री गोबर धन योजनेमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा उद्देशही पूर्ण होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पशुपालनाच्या माध्यमातून जमा केलेल्या शेणाचा वापर सरकार बायोगॅस, सीएनजी आणि सेंद्रिय खत निर्मितीसाठी करणारा असून यामुळे गाव स्वच्छ होईल आणि शेतकऱ्याला याचा फायदा होईल.

प्रधानमंत्री गोबर धन योजना पात्रता

प्रधानमंत्री गोवर्धन योजनेसाठी खालील पात्रता आहेत:

  • प्रधानमंत्री गोबर धन योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकांना मिळणार आहे, म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी एखादा नागरिक भारतीय असणे आवश्यक आहे.
  • प्रधानमंत्री गोबर धन योजनेचे प्रमुख लाभार्थी हे शेतकरी असतील. म्हणजेच या योजनेचा मुख्य लाभार्थी वर्ग हा शेतकरी असणार आहे.
हे वाचा-  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र २०२४, या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३० हजार आर्थिक मदत...

प्रधानमंत्री गोबर धन योजना फायदे

प्रधानमंत्री गोबर धन योजनेचे फायदे खालील प्रमाणे:

  • केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत शेतकरी वर्गाकडून शेणखत खरेदी करण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या शेणखताच्या बदल्यात सरकार शेतकऱ्यांना पैसे देणार आहे.
  • केंद्र सरकारने शेतकऱ्याकडून गोळा केलेले शेण सरकार सीएनजी, बायोगॅस आणि सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरणार आहे.
  • केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या सीएनजी, बायोगॅस आणि सेंद्रिय खते विकून केंद्रसरकारही पैसे मिळवणार आहे.
  • केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गोबरधन योजनेमुळे भारतातील ग्रामीण भाग स्वच्छ होणार आहेत, त्यामुळे अनेक साथीच्या रोगांची किंवा आजारांची शक्यता कमी होईल. जसे अस्वच्छतेमुळे डासांच्या द्वारे होणारे मलेरिया सारखे रोग.
  • प्रधानमंत्री गोबर धन योजनेसाठी ६० रक्कम केंद्र सरकार ४० टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे.
  • प्रधानमंत्री गोबरधन योजनेअंतर्गत भारतातील ग्रामीण भागात सामुदायिक, वैयक्तिक, स्वयंसहाय्यता गट, गोशाळा, स्वयंसेवी संस्था या स्तरावर गोबर गॅस प्लांटची स्थापना केली जाणार आहे.
  • प्रधानमंत्री गोबर धन योजनेअंतर्गत शेण, पालापाचोळा इत्यादीचे कंपोस्टिंग करून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे.
  • प्रधानमंत्री गोबर धन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करताना जास्त त्रास होणार नाही यासाठी शासनाकडून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली आहे, जी अत्यंत सोपी आहे.

प्रधानमंत्री गोबर धन योजना आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री गोबर धन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
हे वाचा-  घरकुल आवास योजना ऑनलाईन सर्व्हे सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रधानमंत्री गोबर धन योजना हेल्पलाइन क्रमांक

प्रधानमंत्री गोबर धन योजनेबद्दल अधिक माहितीसाठी देशातील कोणताही नागरिक या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून या योजनेची माहिती मिळवू शकतो. ०११-२४३६२१२९

प्रधानमंत्री गोबर धन योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री गोबर धन योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे

  • प्रधानमंत्री गोबर धन योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.???????? https://gobardhan.co.in
  • या वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर तिथे असलेल्या नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नोंदणी पर्यायावर क्लिक केल्यानंतर समोर दिसणाऱ्या पेज मध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती अचूक स्वरूपात भरावी लागेल. जसे की तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, नोंदणी तपशील इ.
  • तुमची सर्व माहिती अचूक स्वरूपात भरल्यानंतर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर सर्वात शेवटी भरलेल्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी करून सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

अशाप्रकारे वरील माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा अर्ज अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री गोबर धन योजनेविषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील माहितीच्या आधारे देशातील शेतकरी जो की या योजनेचा प्रमुख घटक आहे तो लाभ घेऊ शकेल. प्रधानमंत्री गोबर धन योजनेविषयी आपण या योजनेचे फायदे, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेची पात्रता, त्याचबरोबर या योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आम्ही आशा करतो की या माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल. धन्यवाद!

Leave a Comment