प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2025| या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना मिळणार ५ वर्षे मोफत अन्नधान्य

नमस्कार, आपण या लेखामध्ये केंद्र सरकारच्या एक अशा योजनेबद्दल पाहणार आहोत की ज्या योजनेमध्ये देशातील सर्व जनता सामावलेली आहे. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना देशातील गरीब जनतेला मोफत अन्नधान्य पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत योजनेचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Pradhanmantri Garib Kalyan Yojna 2025

देशातील एकही व्यक्ती जेवणाविना उपाशीपोटी राहू नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली आहे. यामुळे देशातील करोडो लोकांचा पोटाचा प्रश्न सुटला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत देशातील जवळपास ८५ कोटी लाभार्थ्यांना १ जानेवारी 2025 पासून पुढील ५ वर्षासाठी मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याविषयीची संपूर्ण माहिती आपण अगदी संक्षिप्त स्वरूपात या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजे काय? योजनेचे फायदे, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे त्याचबरोबर या योजनेची पात्रता, या योजनेची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण सविस्तर स्वरूपात पाहूया.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने विषयी थोडक्यात…

देशामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना २०१३ च्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत २०२० मध्ये कोरोना काळात सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्ड धारकांना प्रति व्यक्ती प्रति महिना ५ किलो मोफत धान्य देण्याचा या योजनेचा उद्देश होता. या योजनेचा कालावधी डिसेंबर २०२२ ला संपल्यानंतर त्यामध्ये पुन्हा एकदा डिसेंबर २०२३ पर्यंत वाढ करण्यात आली होती. डिसेंबर २०२३ ला पुन्हा एकदा या योजनेचा कार्यकाल संपल्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा पुढील ५ वर्षासाठी या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या योजनेचा कालावधी १ जानेवारी 2025 पासून पुढील पाच वर्षे राहील.

हे वाचा-  महात्मा फुले जन आरोग्य मोफत उपचार योजना 2025 | ५ लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत...

केंद्र सरकार १ जानेवारी २०२५ पासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत देशातील जवळपास ८५ कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवणार आहे. असा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळेच या योजनेचा समावेश जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनेमध्ये केला गेला आहे. पुढील पाच वर्षासाठी या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी केंद्र सरकारला सुमारे १२ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे.

या योजनेअंतर्गत देशातील पात्र नागरिकांना मोफत अन्नधान्यांमध्ये गहू, तांदूळ आणि भरड धान्य देण्यात येणार आहे. या अन्नधान्याचे वितरण देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामधील जवळपास ५ लाखाहून अधिक रेशन दुकानांच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहेत. वन नेशन वन रेशन कार्ड (एक देश एक शिधापत्रिका) उपक्रमांतर्गत या योजनेच्या लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही रेशन दुकानात जाऊन मोफत अन्नधान्य घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. एखादा व्यक्ती कुठेही राहत असला तरी त्याला संबंधित रेशन दुकानातून त्याचे रेशन कार्ड दाखवून तो तेथेही रेशन घेऊ शकतो. डिजिटल इंडिया अंतर्गत तंत्रज्ञानावर आधारित सुविधांचा भाग म्हणून स्थलांतरितांना राज्य अंतर्गत आणि आंतरराज्य सुविधा मिळवून देण्यात येणार असल्याने हा उपक्रम स्थलांतरीतासाठी एक संजीवनी ठरणार आहे.

देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. म्हणूनच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही जगातील एक सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक योजना म्हणून या योजनेची गणना केली जाते.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक रेशन कार्ड धारकाला मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत देशातील सुमारे ८५ कोटी पेक्षा अधिक नागरिकांना प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचा पुरवठा होत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न दूर झाला आहे.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही देशातील गरिबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी आत्तापर्यंत केंद्र सरकारने जवळपास ५० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना तीन महिन्यासाठी मोफत सिलेंडरचे ही वाटप केले गेले.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत अ श्रेणीतील कामगारांना ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण ही दिला गेला आहे.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना २२ लाखापेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण प्रदान करते.
हे वाचा-  आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणार ५ लाख पर्यंतचे उपचार मोफत

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना उद्दिष्ट्ये

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:

  • कोरोना काळात देशातील नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने पुढाकार घेत ही योजना सुरू करून देशातील जनतेला मोफत अन्नधान्य वाटप केले होते.
  • या योजनेअंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.
  • देशातील गरिबांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा केल्यामुळे त्यांचा अन्नधान्यावरील खर्च कमी झाला आहे.
  • देशातील गरीब घटकांना मोफत अन्नधान्य पुरवून त्यांची भूक आणि पौष्टिक कमतरता दूर करणे.
  • देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि यातून शेतकऱ्यांचा फायदा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पात्रता

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची पात्रता पुढीलप्रमाणे:

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व अंत्योदय अन्न योजना या प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबासाठी उपलब्ध आहेत.
  • या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीकडे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आहे अशा सर्व व्यक्ती किंवा नागरिक या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळवण्यासाठी पात्र आहेत.
  • अपंग किंवा ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेली व्यक्ती, विधवा, आजारी रुग्ण ज्यांच्याकडे उत्पन्नाचा स्त्रोत नाही आणि त्यांना कोणतेही सामाजिक मदत नाही अशा कुटुंबांनाही या योजनेला लाभ दिला जातो.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी रिक्षा चालक, हातगाडी ओढणारे, फळे विक्रेते, निराधार ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील इतर तत्सम श्रेणीतील भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर यामध्ये कुंभार लोहार सांभार विणकर सुतार आदींचा समावेश होतो हे सर्व या योजनेसाठी पात्र आहेत.
हे वाचा-  विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2025 मिळणार राज्यातील विधवा महिलांना पेन्शन...

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. अगदी कमी कागदपत्रांमध्ये या योजनेचा लाभ घेता येतो ती कागदपत्रे कोणती ते पाहूया:

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड (रेशन कार्ड सोबत लिंक केलेले असावे.)

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंमलबजावणीची टप्पे

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंमलबजावणीचे टप्पे पुढीलप्रमाणे:

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वप्रथम केंद्र सरकार राज्यांना त्यांच्या लाभार्थी नागरिकांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरवठा करते.
  • त्यानंतर राज्य सरकार रेशन दुकानदाराच्या माध्यमातून या मोफत अन्नधान्याची वाटप करते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तरच तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी ची ऑफलाइन प्रक्रिया खालील प्रमाणे:

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा अर्ज हा अर्जदाराला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना त्यांचे रेशन कार्ड घेऊन जवळच्या रेशन दुकानाला भेट देणे आवश्यक आहे.
  • रेशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर देशातील कोणत्याही रेशन दुकान विक्रेत्याला दाखवून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • आधार कार्ड  बायोमेट्रिक पडताळणीसाठी देणे आवश्यक आहे.
  • सर्वात शेवटी तुम्ही वरील प्रक्रियेतून या योजनेसाठी पात्र झाला तर या योजनेतील तरतुदीनुसार वाटप करण्यात येणारे अन्नधान्य तुम्हाला मोफत पणे मिळू शकेल.

सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात त्याचबरोबर अचूकपणे देण्याचा प्रयत्न केला आहे.या माहितीच्या आधारे कोणताही व्यक्ती या योजनेसाठी पात्र होऊ शकतो की नाही त्याचबरोबर या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कोणताही नागरिक वरील माहितीच्या आधारे घेऊ शकतो.

वरील लेखामध्ये आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे माहिती पाहिली आहे.ज्यामध्ये योजनेची वैशिष्ट्ये, योजनेचे उद्दिष्ट, योजनेचे अंमलबजावणीचे टप्पे, त्याचबरोबर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!

Leave a Comment