नमस्कार, सदर लेखाच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली राज्यातील विधवा महिलांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणून विधवा पेन्शन योजनेकडे पाहिले जाते. ही योजना राज्य सरकारने विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच मुलांचे पालन पोषण करण्यासाठी कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसते अशा महिलेला आर्थिक मदतीची गरज असते ती गरज या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने भागवण्याचा प्रयत्न केला आहे. हाच एकमेव उद्देश या योजनेचा आहे.
Vidhva Pension Yojana Maharashtra 2025
विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे राबवण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात २०२० मध्ये केली गेली. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना मिळतो. या योजनेचा लाभ घेण्याची वयोमर्यादा १८ ते ६५ वर्षे आहे. या योजनेअंतर्गत विधवा महिलांना प्रतिमाह ६०० रुपये ते ९०० रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य रक्कमेच्या स्वरूपात दिले जाते.
विधवा पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामध्ये योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, विधवा पेन्शन योजनेचे फायदे, या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयीची माहिती आपण पाहूया.
विधवा पेंशन योजनेविषयी थोडक्यात…
महाराष्ट्रामध्ये महिला व बाल विकास विभागामार्फत विधवा पेन्शन योजना राबवण्यात येते. या योजनेची सुरुवात २०२० मध्ये केली गेली. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना आर्थिक स्वरूपात मदत दिली जाते. महाराष्ट्र मध्ये विधवा पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मासिक रुपये ६०० रुपये ते ९०० रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी विधवा महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तिचे वय १८ ते ६५ वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. याचबरोबर या अगोदर विधवा महिलेला सरकारकडून इतर कोणतेही पेन्शन किंवा लाभ मिळत नसावा.
सदर योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली १८ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र विधवा महिलांना मासिक ६०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते तसेच एखाद्या विधवा महिलेस मुले असतील तर त्यांना ९०० रुपये मासिक आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते. मुले असणाऱ्या विधवा महिलेस ती रक्कम ती मुले २५ वर्षे वयाची होईपर्यंतच दिली जाईल. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम संबंधित महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते.
महाराष्ट्र सरकारने विधवा महिलांसाठी सुरू केलेला हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ज्यामुळे राज्यातील विधवा महिलांना स्वावलंबी बनवणे, त्याचबरोबर पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व मुलांचे पालन पोषण करण्यासाठी या आर्थिक सहाय्याची पूर्तता सरकारकडून केली जाते.
विधवा पेन्शन योजना उद्देश
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून या महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांना सन्मानाने त्याच बरोबर सुरक्षित जीवन जगता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली आहे. विधवा पेन्शन योजनेचे उद्देश्य खालील प्रमाणे:
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विधवा महिलांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे.
- राज्यातील विधवा महिला ज्या गरीब दारिद्र्यरेषेखालील आहेत अशा सर्व विधवा महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तसेच आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी राज्य सरकारने अशा सर्व महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलेचे सक्षमीकरण करणे, त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसाहाय्य प्रदान करणे.
विधवा पेन्शन योजना फायदे
महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी राज्य सरकारने जी विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे त्या योजनेचे फायदे खालील प्रमाणे:
- या योजनेचा महत्त्वाचा फायदा म्हणजे विधवा महिला सक्षम स्वावलंबी होऊन त्यांचे राहणीमान व जीवनमान सुधारण्यास मदत होते.
- सदर योजना ही आर्थिक सहाय्यता प्रदान करते.
- मुलांच्या पालनपोषणासाठी ज्या आर्थिक अडचणी येतात त्या आर्थिक अडचणी दूर करण्यास योजना मदत करते.
- विधवा महिलांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी ही योजना आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देते.
- महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करून महिलांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी ही योजना आर्थिक भार कमी करते.
विधवा पेन्शन योजना पात्रता
विधवा पेन्शन योजनेसाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे:
- विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सदर विधवा महिला १८ ते ६५ वर्षे वयोगटातील असावी.
- या योजनेचा लाभ घेणारी संबंधित महिला दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी असावे असावे जर २१ हजार रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर संबंधित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा महिला शासकीय कर्मचारी नसावी.
- या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी लाभार्थी विधवा महिलेने इतर कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर लाभ घेतलेला असेल तर संबंधित महिला या योजनेसाठी पात्र असणार नाही.
विधवा पेन्शन योजना आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विधवा पेन्शन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
- दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक तपशील
- मोबाईल क्रमांक
विधवा पेन्शन योजना अर्ज प्रक्रिया
विधवा पेन्शन योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने आहे. अर्जदार हा कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकतो. याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
विधवा पेन्शन योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- प्रथम जवळच्या समाज कल्याण कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय भेट द्या आणि महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी चा अर्ज मागवा.
- या योजनेसाठी लागणारी सर्व माहिती अगदी अचूक स्वरूपात भरा. त्यामध्ये वैयक्तिक माहिती किंवा तपशील संपर्क माहिती, बँक खाते तपशील इ. अर्जावर दिलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या.
- या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
- आवश्यक कागदपत्रासह अर्ज संबंधित प्राधिकार्याकडे जमा करून, तुम्ही त्या अर्जाची पोचपावती मिळवा.
- अर्ज सादर केल्यानंतर संबंधित प्राधिकारी किंवा अधिकारी अर्जामध्ये दिलेल्या कागदपत्राच्या आणि माहितीची पडताळणी करेल.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर सदर पेन्शनची रक्कम अर्जदाराने दिलेल्या बँक खात्यात दर महिन्याला जमा केली जाईल.

विधवा पेन्शन योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- विधवा पेंशन योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽 https://mahasainik.maharashtra.gov.in
- वेबसाईटच्या होम पेज उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
- तुम्ही जर पहिल्यांदाच या योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुमचा मूलभूत तपशील जसे की नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही या अगोदर नोंदणी केली असेल तर तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून थेट लॉगिन करू शकता.
- नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमचा सर्व आवश्यक तपशील भरणे आवश्यक आहे. तपशील भरल्यानंतर दिलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या.
- त्यानंतर या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर संबंधित अधिकारी या अर्जाची व कागदपत्रांच्या माहितीची पडताळणी करेल.
- जर तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला मिळणारी पेन्शन तुम्ही दिलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल.
आपण महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना जी महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन म्हणून ओळखले जाते. या योजनेची संपूर्ण माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूकपणे पाहिले आहे. आम्ही आशा करतो की तुम्ही या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ नक्की घ्याल. धन्यवाद!