ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025| ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत मिळणार १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला आजचा लेख हा महाराष्ट्र शासनाच्या ट्रॅक्टर अनुदान योजने विषयीचा आहे. राज्यातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती व्यवसायात गुंतलेली आहे. त्यामुळेच शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा घटक म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणूनच शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे या गोष्टीवर प्रामुख्याने भर देऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ट्रॅक्टर सबसिडी योजना राबवली जात आहे. योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास आधुनिक पद्धतीने होईल. ज्याद्वारे शेतीतून शेतकरी व देश आर्थिक दृष्ट्या समृद्ध होतील आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल.

Tractor Anudan Yojna Maharashtra 2025

ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीतील उत्पन्न वाढवू शकेल. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना ८ ते ७० एचपी च्या ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळणार आहे.

सदर लेखांमध्ये आपण ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ शेतकरी कसा घेऊ शकतो? या योजनेसाठी ची पात्रता काय आहे? या योजनेचे फायदे काय आहेत? ट्रॅक्टर सबसिडी योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे? याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

ट्रॅक्टर अनुदान योजनेविषयी थोडक्यात…

ट्रॅक्टर अनुदान योजना ही केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवली जाते. सदर योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी १.५ लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांची शेती आधुनिक पद्धतीने कसता येणार आहे. यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्याबरोबरच शेतकऱ्याचे कष्टाचे काम कमी होणार आहे. शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी या योजनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना ही २०२३ला सुरू झाली. सदरची योजना ही केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आले आहे. राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत केली जाते. या योजनेसाठी राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी लाभार्थी असणार आहेत. ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत करणे. घरच्या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन किंवा ऑफलाइन आहे.

हे वाचा-  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र २०२४, या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३० हजार आर्थिक मदत...

ट्रॅक्टर अनुदान योजना उद्दिष्टे

  • अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करून शेतकऱ्याची जमीन उत्पादकता वाढवणे आणि त्यातूनच शेतकऱ्याची उन्नती साधने हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि अल्पभूधारक शेतकरी यांना या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर घेण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • भारतामध्ये किंबहुना राज्यांमध्ये आजही शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती करतात. पैशाच्या कमतरतेमुळे शेतीमध्ये यंत्राचा वापर करणे टाळतात. मुळेच सरकार द्वारे आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करण्यास प्रोत्साहन करणे.

वरील उद्देशाने ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून राज्यांमध्ये राबवली जात आहे. योजनेच्या केंद्रस्थानी फक्त शेतकरी वर्गालाच ठेवण्यात आले आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना फायदे

  • ट्रॅक्टर अनुदान योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा वापर करून जर शेतकऱ्यांनी शेती केली तर त्याचे कष्ट कमी होतील आणि चांगल्या पद्धतीने शेतकरी शेती करू शकेल.
  • यांत्रिकीकरणाच्या किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारेल.
  • ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीतील कामे कमी वेळात करता येतील. त्यामुळे शेतकऱ्याच्या पैशाची आणि वेळेची बचत होईल.
  • यंत्राच्या साह्याने म्हणजेच ट्रॅक्टरने केलेली कामे कमी वेळेत आणि कमी कष्टात होतात त्यामुळे शेतकऱ्याची कार्यक्षमता वाढेल आणि शेतकरी त्याची कार्यक्षमता इतर कामांमध्ये वापरू शकेल.
  • यंत्राच्या किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करून राज्यातील किंबहुना देशातील धान्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येईल.
  • यंत्राचा किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केल्याने शेती करण्याच्या वेळेमध्ये बचत होते. तोच वेळ तो वेगळ्या कामांमध्ये वापरून त्याची प्रगती करू शकेल.

ट्रॅक्टर अनुदान योजनेचे वरील फायदे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शेतकरी तर आर्थिक संपन्न होईलच पण त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेचाही विकास होईल.

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता

  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे शेती करण्याच्या योग्यतेची जमीन असणे आवश्यक आहे.
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य दिले गेले आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे जर अगोदरच एक ट्रॅक्टर असेल किंवा त्याच्या जवळच्या कुटुंबीयाकडे ट्रॅक्टर असेल तर काही बाबींमध्ये किंवा प्रकरणांमध्ये सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पात्र असणार नाही.
  • अर्जदार करणारे व्यक्तीचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असेल तर,त्याला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: मिळणार ₹3000 आणि उपयोगी उपकरणे | Vayoshree Yojana

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रताही वरील प्रमाणे आहे. वरील पात्रतेमध्ये पात्र होणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

ट्रॅक्टर अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज सोबत काही आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे असते ती आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जमीन मालकीची कागदपत्रे (७/१२ उतारा, ८अ उतारा)
  • अर्जदार अनुसूचित जाती आणि जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे.
  • स्वयंघोषणापत्र
  • खरेदी करणाऱ्या उपकरणाचे म्हणजेच ट्रॅक्टरचे कोटेशन

सदर योजनेसाठी वरील कागदपत्रे खूपच महत्त्वाची आहेत.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

१. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने खरेदी केलेला ट्रॅक्टर ४० ते ७० एचपी क्षमतेपेक्षा जास्त असल्यास अशा ट्रॅक्टर साठी १ लाख २५ हजार एवढी रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते.

२. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने जर २० ते ४० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केला तर सरकार त्या लाभार्थ्याला १ लाख रुपयांपर्यंत अनुदान देते.

३. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी ८ ते २० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केला तर सरकारतर्फे त्या लाभार्थ्याला ४०% किंवा ७५ हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते.

४. अनुसूचित जाती, जमाती आणि अल्प व अत्यल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या माध्यमातून १०% अतिरिक्त अनुदान दिले जाते.

५. सदर योजनेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त ५% अनुदान दिले जाते.

सदर योजनेसाठी लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या क्षमतेनुसार अनुदान सरकार द्वारे दिले जाते.

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ

  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ५०% अनुदान दिले जाते.
  • खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ४०% अनुदान दिले जाते.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत शेतकरी त्याच्या पसंतीनुसार ट्रॅक्टर खरेदी करू शकतो.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले गेले आहे.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला बँक किंवा इतर वित्तीय संस्थाकडून कमीत कमी व्याजदरात कर्ज देण्याची सुविधाही दिली जाते.
हे वाचा-  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र २०२४ | Ladki Bahin Yojana Online Apply

ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज प्रक्रिया

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज अर्जदाराला ऑफलाइन त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने करता येतो. आपण दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा हे सविस्तरपणे पाहूया.

Tractor yojana website

ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.???????????? https://mahadbt.maharashtra.gov.in
  • अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेजवर New Registration चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक New Page उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव मोबाईल नंबर ईमेल पासवर्ड इत्यादी सर्व आवश्यक ती माहिती अचूक स्वरूपात लिहावी लागेल आणि Register बटनावर क्लिक करावे लागेल.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
  • त्यानंतर तुम्हाला Log In या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून Log In करावे लागेल.
  • Login केल्यानंतर My Scheme  यावर क्लिक करा आणि ट्रॅक्टर अनुदान योजना या पर्यायावर क्लिक करा आणि लागू करा या बटणावर क्लिक करा.
  • शेवटी या योजनेसाठी अर्ज असलेले एक New Page उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात भरावी लागेल आणि आवश्यक ती कागदपत्रे Upload करावे लागतील आणि अर्ज Submit करा या बटनावर क्लिक करा.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची Online Apply ची प्रक्रिया पूर्ण होईल.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी वरील प्रक्रिया ही ऑनलाइन आहे या द्वारे अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

ट्रॅक्टर अनुदान योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

१. ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या ऑफलाइन प्रक्रियेसाठी अर्जदाराला त्याच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयात जावे लागेल.

२. तर अनुदान योजनेसाठी कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याकडून अर्ज घ्यावा लागेल.

३. सदर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात भरून आणि आवश्यक ते कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज कृषी अधिकाऱ्यांना सादर करावा लागेल.

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया तुम्ही या प्रकारे पूर्ण करू शकता.

आपण सदर लेखांमधून ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र सरकार याविषयीची संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर माहितीचा आधार घेऊन महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

Leave a Comment