आत्मनिर्भर भारत रोजगार योजना: लाभ आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

नमस्कार, पण सदर लेखामध्ये केंद्र सरकारच्या एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेचे नाव आहे आत्मनिर्भर भारत रोजगार योजना. भारत रोजगार योजना ही केंद्र सरकार द्वारे कोविड-१९ च्या महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेली योजना आहे. कोरोना महामारीच्या काळात देशाचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना केंद्र सरकारद्वारे १ ऑक्टोंबर २०२० रोजी सुरू केली होती. देशातील संपूर्ण आर्थिक व्यवस्था सुरळीत व्हावी त्याचबरोबर रोजगार निर्माण व्हावेत यासाठी केंद्र सरकारने covid-19 च्या महामारी मध्ये ही योजना सुरू करून देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी उचललेले खूप मोठे पाऊल होते.

Aatmnirbhar Bharat Rojgar Yojana 2025

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना आर्थिक बाबतीत बळकट किंवा स्वयंपूर्ण बनवणे तसेच त्यांना रोजगार किंवा व्यवसाय प्राप्त करून देणे हे केंद्र सरकारचे मुख्य ध्येय होते. ही योजना मुख्यत्वे करून कोरोना महामारीच्या काळात ज्या नागरिकांनी त्यांचा रोजगार गमावला होता अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. त्यामुळेच ही योजना कोविड-१९महामारीच्या काळात केंद्र सरकारने राबवली आणि या योजनेचा अनेक नागरिकांना फायदा झाला आहे.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते देशातील जनतेसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात १ आक्टोंबर २०२० रोजी झाली. ही योजना केंद्र सरकार द्वारे राबवली जाते. या योजनेचे लाभार्थी देशातील बेरोजगार नागरिक आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार नागरिकांना रोजगार प्राप्त करून देणे त्यांना आर्थिक स्वावलंबी तसेच परिपूर्ण बनवणे. या योजनेत २०२० ते २०२३ पर्यंत या योजनेअंतर्गत अनेक बदल करण्यात आलेले आहेत. तसेच 2023 मध्ये या योजनेला ३.० असे नाव देण्यात आले आहे. 2023 यावर्षी या योजनेअंतर्गत अनेक बदल करण्यात आलेले आहेत त्याचा फायदा नागरिकांना होत आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी बेरोजगारीला आळा घालण्याच्या अनुषंगाने अनेक योजना राबवल्या जात असतात. या योजनेचा लाभ देशातील बेरोजगार नागरिकांना होत असतो तरीही देशातील बेरोजगारीवर कंट्रोल ठेवणे सरकारला कठीण जात आहे. त्यामुळेच सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेमध्ये अनेक बदल घडवून ही योजना जास्तीत जास्त नागरिकांना फायदेशीर ठरेल या अनुषंगाने या योजनेचे ३.० हे व्हर्जन राबवण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 3.0 मध्ये केंद्र सरकारने भरीव निधीची तरतूद करून दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना रोजगार प्राप्त होईल व त्यांना आर्थिक सहाय्य जास्त प्रमाणात मिळेल. या योजनेची सुरुवात जरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झाली असली तरी या योजनेचा लाभ देशातील बेरोजगार नागरिकांना होत आहे त्यामुळे ही एक खूप मोठी योजना आहे.

हे वाचा-  ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025| ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत मिळणार १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

सदर लेखाच्या माध्यमातून आपण या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की या योजनेचे उद्दिष्ट, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना उद्दिष्टे

१. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील बेरोजगार नागरिकांना रोजगार प्राप्त करून देणे व त्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. या योजनेमुळे अनेक बेरोजगार नागरिक रोजगार प्राप्त करून स्वयंपूर्ण बनलेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात बेरोजगार झालेल्या अनेक नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्राप्त करून दिले आहे त्याचबरोबर त्यांना नवीन नोकऱ्या केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

२. आत्मनिर्भर भारत रोजगार योजना ही केंद्र सरकारच्या EPFO संघटनेकडून किंवा संस्थेकडून राबवण्यात येत आहे.या योजनेविषयीची संपूर्ण माहिती EPFO यांच्याकडे मिळते आणि ही संस्था या योजनेचा सर्व कारभार पाहते.

३. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत नवीन कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.कारण नवीन कर्मचारी वर्गाला जास्तीत जास्त वेतन दिले जात असल्यामुळे हा वर्ग या योजनेविषयी समाधानी आहे.या योजनेसाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पापासून दरवर्षी प्रत्येक अर्थसंकल्पात भरीव रकमेची तरतूद केली जात आहे त्याचाच फायदा जास्तीत जास्त नागरिकांना होत आहे.

४. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत आत्तापर्यंत देशातील बहुसंख्य संस्था आणि कर्मचारी यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.त्यामुळेच ही योजना यशस्वी झालेली दिसून येते.या योजनेचा वेग देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.या योजनेमुळे देशातील नागरिकांना रोजगार प्राप्त होऊन देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे.या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सुमारे ५० लाख नोकऱ्या देण्यात आल्या असून त्यामध्ये अजूनही वाढ होत आहे.

हे वाचा-  पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मिळणार व्यवसायासाठी ३५% अनुदान आणि ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज...

५. कोरोना महामारीच्या काळात ही योजना केंद्र सरकारने सुरू केली होती या योजनेअंतर्गत अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना पात्रता

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेसाठीचे पात्रता खालील प्रमाणे:

  • आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी सर्वप्रथम या संस्था EPFO मध्ये नोंदणीकृत आहेत आणि त्यांनी सप्टेंबर २०२० पर्यंत जर नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली असल्यास त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो.
  • आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कोणत्याही संस्थेमधील कर्मचाऱ्यांची संख्या १००० पेक्षा जास्त असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी एखाद्या संस्थेमध्ये नवीन १००० पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास संस्थेला फक्त २५ टक्के वेतन द्यावे लागते बाकीचे संपूर्ण वेतन कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या EPFO द्वारे उपलब्ध करून दिले जाते.
Aamnirbhar bharat theme 2

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे फायदे

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे फायदे खालील प्रमाणे:

  • आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत covid-19 महामारीच्या वेळेस देशातील लाखो नागरिकांना रोजगार प्राप्त करून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे.
  • या योजनेअंतर्गत बेरोजगार नागरिकांना रोजगार प्राप्त होतो.
  • सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत चाळीस लाखापेक्षा जास्त नागरिकांना रोजगाराबरोबरच अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत.
  • देशातील बेरोजगारीचा आकडा लक्षात घेऊन दरवर्षी देशाच्या अर्थसंकल्पात या योजनेच्या आर्थिक तरतुदीत दरवर्षी वाढ केली जात आहे, त्यामुळे देशातील बेरोजगार नागरिकांना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक मदत दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत नवीन कर्मचारी वर्गाला जास्तीत जास्त वेतन व अधिक सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
  • एखाद्या संस्थेची कर्मचारी संख्या १००० पेक्षा जास्त असल्यास तेथील कर्मचाऱ्यांचे काम पाहून केंद्र सरकार द्वारे त्यांना दोन वर्षासाठी या योजनेचा लाभ दिला जातो त्याचबरोबर वेतनात वाढ करून दिली जाते.
  • आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ घेणे अतिशय सोपे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येतो.
हे वाचा-  राष्ट्रीय कृषी विकास योजना | केंद्र सरकारकडून मिळवा कृषी व्यवसायासाठी आर्थिक मदत

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना आवश्यक कागदपत्रे

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • रहिवाशी दाखला
  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड
  • EPFO या अधिकृत संस्थेमध्ये कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक खाते
  • मतदार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना अर्ज प्रक्रिया

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरता येतो. याविषयीची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहूया:

  • आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या EPFO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 👇👇👇 https://labour.gov.in
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल.
  • होम पेजवर तुम्हाला नोंदणी किंवा सर्विसेस हा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.
  • सर्विसेस पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एम्प्लॉइज हा पर्याय ओपन होईल त्यावर क्लिक करा आणि पुढे जा.
  • पुढे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर किंवा नोंदणी प्रकारचा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा नोंदणी फॉर्म ओपन होईल.
  • नोंदणीच्या पर्यायांमध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी अचूक भरणे आवश्यक आहे. जर ही माहिती चुकीची भरल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा या माहितीची पडताळणी करून घ्या त्यानंतर या योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तिथे भरा.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्हाला आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा अर्ज यशस्वीपणे भरून पूर्ण करता येईल.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेविषयीची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासमोर अगदी अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आपण योजनेची उद्दिष्टे, योजनेची वैशिष्ट्ये, या योजनेची अर्ज प्रक्रिया याविषयीची, त्याचबरोबर योजनेचे फायदे ही संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!

Leave a Comment