नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजनांच्या एकत्रीकरणातून सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्वावर भांडवल उभारणी करून देणे हा आहे. या योजनेची सुरुवात १५ ऑगस्ट २००८ पासून झाली आहे. राज्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकामार्फत या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोउद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र यातील यंत्रणेमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. राज्य खादी ग्रामोद्योग आयोग, मुंबई या योजनेसाठीची निवड एजन्सी म्हणून काम करते.
Prime Minister Employment Guarantee Program (PMEGP) | पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना
या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग व खादी ग्रामोद्योग मंडळ मार्फत ग्रामीण भागामध्ये व जिल्हा उद्योग केंद्र मार्फत शहरी व ग्रामीण भागामध्ये केली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. बेरोजगारांना स्वतःचा उद्योग करता यावा यासाठी अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज देण्याचे काम या योजनेमार्फत केले जाते.
सदर लेखामध्ये आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया.
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची वैशिष्ट्ये
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:
- या योजनेअंतर्गत २५ लाखापर्यंत गुंतवणुकीचे उद्योग अथवा १० लाख रुपयापर्यंतच्या व्यवसायाचे व घटक प्रकल्पांना ९० ते ९५ टक्के खर्च राष्ट्रीयकृत बँका अथवा विभागीय ग्रामीण बँका आयडीबीआय मार्फत उपलब्ध होते.
- या योजनेअंतर्गत उर्वरित रक्कम (५ ते १० टक्के) अर्जदाराला भरावी लागते.
- योजनेअंतर्गत एकूण कर्जापैकी सर्वसाधारण गटातील उमेदवाराला शहरी भागात १५% व ग्रामीण भागात २५% अनुदान प्राप्त होते.
- विशेष गटातील उमेदवाराला शहरी भागात २५% व ग्रामीण भागात ३५% अनुदान प्राप्त होते.
- विशेष गट म्हणजे अनुसूचित जात/जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक, महिला, अपंग उमेदवार, माजी सैनिक यांचा समावेश होतो.
- या योजनेसाठी 18 वर्ष पूर्ण असलेला कोणताही व्यक्ती पात्र असून त्याला उत्पन्नाची अट नाही.
- ५ लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीचे व्यापार सेवा घटकांसाठी तसेच १० लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या उद्योग प्रकल्पासाठी शिक्षण किमान ८ वी पास अन्यथा शिक्षणाची अट नाही.
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची उद्दिष्टे
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:
- ग्रामीण आणि शहरी कारागिरांना व बेरोजगार तरुणांना या योजनेच्या माध्यमातून एकत्र आणणे आणि त्यांना स्वयंरोजगार मिळवून देणे.
- या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी कारागीर व बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी आणि टिकाऊ असा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे जेणेकरून गावातील तरुण शहराकडे जाणे टाळतील.
- पारंपारिक क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांची पैसे मिळवण्याची क्षमता वाढवणे. ग्रामीण आणि शहरातील बेरोजगारांची संख्या कमी करून त्यांच्या विकासाला चालना देणे.
- स्वयंरोजगाराच्या नव्या उद्योगामार्फ/परियोजनेतून किंवा सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून देशातील शहरी क्षेत्राबरोबरच ग्रामीण क्षेत्रात देखील रोजगाराची हमी देणे.
पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत खालील व्यवसायांना कर्ज दिले जाते
- कृषी आधारित अन्नप्रक्रिया उद्योग
- हाताने तयार केलेले कागद आणि फायबर उद्योग
- वन आधारित उत्पादने
- खनिज आधारित उत्पादने
- पालीमर आणि केमिकल आधारित उत्पादने
- सेवा आणि वस्त्रोद्योग
- ग्रामीण अभियांत्रिकी आणि बायोटेक
वरील व्यवसायांना पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते.
पंतप्रधान रोजगार योजनेचे स्वरूप
पंतप्रधान रोजगार योजनेचे स्वरूप खालील प्रमाणे:
- उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पाची जास्तीत जास्त किंमत २५ लाख रुपये आणि व्यवसाय किंवा सेवा क्षेत्राची किंमत १० लाख रुपये आहे.
- लाभार्थ्याच्या वर्गवारी पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत अनुदानाचा दर (प्रकल्प खर्च) क्षेत्र (प्रकल्पाचे स्थान) सामान्य श्रेणी १५% शहरी, २५% ग्रामीण.
- विशेष श्रेणी २५% शहरी, ३५ % ग्रामीण
- विशेष श्रेणीमध्ये एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक, महिला, माजी सैनिक, शारीरिक दृष्ट्या अपंग, NER, टेकडी आणि सीमा क्षेत्र इत्यादींचा समावेश होतो.
- एकूण प्रकल्प खर्चाची शिल्लक रक्कम मुदत कर्ज आणि खेळत्या भांडवलाच्या स्वरूपात बँका द्वारे लाभार्थ्याला प्रदान केली जाईल.
पंतप्रधान रोजगार योजना कर्ज परतफेडीचा कालावधी
पंतप्रधान रोजगार योजनेचा कर्ज परतफेडचा कालावधी हा ३ ते ७ वर्षापर्यंत असतो. बँक कर्जाचा व्याजदर हा प्रचलित दराप्रमाणे असतो. कर्ज मंजुरीनंतर व वाटपापूर्वी लाभार्थ्याने संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण घेतलेले असले पाहिजे. लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर नूडल बँकेत मार्जिन मनी अनुदानासाठी केस पाठवली जाते. त्यानंतर अनुदानित रक्कम नोडल बँकेकडून कर्ज देणाऱ्या बँकेस वितरित करण्यात येते. वितरित करण्यात आलेले अनुदान लाभार्थ्याच्या नावे ३ वर्षाकरिता टर्म डिपॉझिट रिसीट मध्ये डिपॉझिट करण्यात येते.३ वर्षानंतर आवश्यक ती खात्री केल्यानंतर अनुदानित रक्कम कर्ज खात्यात पाठवली जाते. अशाप्रकारे लाभार्थ्यास त्याच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज सुविधा तसेच अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
पंतप्रधान रोजगार योजना आवश्यक कागदपत्रे
पंतप्रधान रोजगार योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- किमान आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- विशेष श्रेणी प्रमाणपत्र
- एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, माजी सैनिक,PHC यांच्यासाठी शैक्षणिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र
- विज बिल
- भाडेकरार
- जागेची कागदपत्रे (जागा स्वतःची असल्यास)
- प्रकल्प अहवाल
- उद्योगासाठी खरेदी करत असलेल्या वस्तूचे किंवा मशीनचे कोटेशन
- व्यवसाय परवाना
- पंतप्रधान रोजगार योजनेच्या पोर्टलवर केलेल्या अर्जाची प्रत
- स्व: गुंतवणूक उपलब्ध असलेल्या पुरावा
- प्रकल्पानुसार आवश्यक कागदपत्रे
पंतप्रधान रोजगार योजना अर्ज प्रक्रिया
पंतप्रधान रोजगार योजनेचा अर्ज हा दोन पद्धतीने भरता येतो ऑनलाईन व ऑफलाईन आपण या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा भरायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खाली पाहूया:
पंतप्रधान रोजगार योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- पंतप्रधान रोजगार योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ???????????????????????????????? https://www.kviconline.gov.in
- पंतप्रधान रोजगार योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वाचे अनुसरण करा आणि तुमची माहिती सर्व आवश्यक तपशीलासह भरा.
- सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर भरलेले ट्रॅक सेव्ह करण्यासाठी ‘सेव्ह एप्लीकंट डेटा ‘वर क्लिक करा.
- तुम्ही तुमचा डेटा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अर्जाच्या अंतिम मिशनसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- अर्ज पूर्ण झाल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर अर्जदाराचा आयडी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पाठविला जाईल.
पंतप्रधान रोजगार योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- पंतप्रधान रोजगार योजनेच्या अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरा.
- सर्व माहिती अचूक स्वरूपात भरल्यानंतर अर्ज मसुदा म्हणून जतन करा.
- अर्जाची प्रिंट आऊट घ्या.
- अर्जाची प्रिंट आऊट जवळच्या कार्यालयात जमा करा.
- या योजनेच्या संबंधित बँकेने केलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करा.
अशा पद्धतीने या योजनेचा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही भरता येतो.
सदर लेखांमध्ये आपण पंतप्रधान रोजगार योजनेविषयीची संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आपण या योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, कर्जाचा कालावधी, स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. या माहितीच्या आधारे राज्यातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकेल. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडलेली असेल. धन्यवाद!