प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना महाराष्ट्र २०२५| Online Apply

नमस्कार, आपण सदरच्या लेखामध्ये केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येत असलेली एक योजना जी देशातील नागरिकांना विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनवणार आहे. योजना म्हणजे प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना होय. ही योजना राबवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, देशात औद्योगिक क्षेत्रामध्ये विजेच्या मागणी दिवसेंदिवस प्रचंड वाढवत चालली आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक वीज निर्मिती साधने ही अपुरी पडत चालली असल्यामुळे येणाऱ्या काळात देशाला  विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना देशभरात राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pradhanmantri Muft Solar Panel Yojana Maharashtra 2025 | प्रधानमंत्री मोफत सोलर

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ४०% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमुळे नागरिकांच्या वीज बिलामध्ये बचत होणार आहे. तर सौर ऊर्जेमुळे जास्त वीज निर्माण झाल्यामुळे तिची विक्री सुद्धा करता येणार आहे त्यामुळे नागरिकांना यातून थोडफार आर्थिक लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना घरगुती वर्गवारीतील किमान एक किलो वॅट क्षमतेची छतावर सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री मोफत सोलर योजना या लेखांमध्ये आपण या योजने विषयाची सर्व माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. यामध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण खाली पाहूया.

प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजनेविषयी थोडक्यात…

प्रधानमंत्री मोफत सोलर योजना ही केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाद्वारे राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी ४० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली. या योजनेचा लाभ घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, त्याचबरोबर गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी भागातील नागरिक हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना त्यांच्या वीज बिलामध्ये बचत होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर जास्त प्रमाणात निर्माण झालेले विजेची विक्री करून त्यातून तो नागरिक पैसेही मिळू शकणार आहे.

हे वाचा-  आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणार ५ लाख पर्यंतचे उपचार मोफत

प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी २० ते ४० टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत नागरिकांचा विज बिलावर होणारा खर्च शून्य होईल.
  • प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेच्या सहाय्याने महाराष्ट्रातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील. म्हणजेच त्यांना कोणावरी अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा केली जाते.

प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना उद्दिष्टे

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:

  • या योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे विज बिल शून्यावर आणणे. आणि त्यांना विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे.
  • या योजनेअंतर्गत निर्माण झालेली शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकाकडून विकत घेणार आहे त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळणार आहे.
  • पारंपरिक ऊर्जा संसाधनावरील ताण कमी करून स्वच्छ आणि प्रदूषण विरहित सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे.
  • देशातील नागरिकांना अक्षय उर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील राज्यावरील विजेचा भार कमी करणे.
  • देशातील नागरिकांना प्रदूषण विहिरीत वीज निर्मितीला प्रोत्साहन देणे.

प्रधानमंत्री मोफत सोलार पॅनल योजना फायदे

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेचे फायदे खालील प्रमाणे:

  • प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेचा लाभ देशातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
  • प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेअंतर्गत २० ते ४० टक्के पर्यंत अनुदान लाभार्थ्याला दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था, निवासी संघटना यांना २० टक्के अनुदान दिले जाते.
  • या योजनेचा लाभ घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना घेऊ शकतात.
  • या योजनेमुळे नागरिकांचे घरगुती विज बिल शून्यावर येऊन, विजेच्या बाबतीत नागरिक आत्मनिर्भर बनतात.
  • अंदाजे २५ वर्ष सोलर पॅनलचा उपयोग करून विजेची निर्मिती करता येते.
  • पर्यावरणाला कोणतीही हानी न पोचवता स्वच्छ आणि प्रदूषण विरहित वीज निर्माण करता येते.
  • या योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त वीज लाभार्थ्याला चालू दराने प्रति युनिट विद्युत महावितरण ला विकून आर्थिक लाभ घेता येतो.
  • सौर उर्जेवर ही वीज निर्माण होत असल्यामुळे ही वीज खंडित होत नाही त्यामुळे या समस्येपासून नागरिकांची सुटका होईल.

प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना नियम,अटी व पात्रता

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेच्या नियम व अटी खालील प्रमाणे:

  • या योजनेअंतर्गत देशांमध्ये ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचा पुरवठा नियमित नाही अशा ठिकाणांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्ज करणारा व्यक्ती हा भारताचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेअंतर्गत एकापेक्षा अधिक गावांची निवड करण्यात आली असेल तर अशा गावांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.
  • गावांची निवड करते वेळेस त्या गावाची प्राथमिक माहिती देणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्या गावात विजेचा नियमितपणा भौगोलिक परिस्थिती इत्यादीची माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे. गावाच्या प्राथमिक माहिती मध्ये गावाचे नाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, गावातील आदिवासी जमातींची लोकसंख्या, गावातील एकूण घरांची संख्या इ. माहिती
  • या योजनेअंतर्गत निवड करण्यात येणारे गाव, वस्ती, पाडा, वाडी ही अतिदुर्गम भागातील असावी. त्याचबरोबर त्या गावातील आदिवासी गरीब दारिद्र्यरेषेखालील असावेत.
  • १ किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी १० स्क्वेअर मीटर जागेची आवश्यकता आहे.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला घेता येईल.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीने या अगोदर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या इतर कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर तो अर्जदार या योजनेत पात्र असणार नाही.
हे वाचा-  महात्मा फुले जन आरोग्य मोफत उपचार योजना 2025 | ५ लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत...

प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • विज बिल
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
  • घरातील सह-हिस्सेदारांचे संमती पत्र
  • बँक पासबुक

प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजनेअंतर्गत मिळणारे वित्त सहाय्य

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेअंतर्गत मिळणारी वित्त सहाय्य खालील प्रमाणे:

  • देशातील नागरिकांना १ ते ३ किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर पॅनल साठी शासनाकडून ४० टक्के अनुदान दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत ३ किलोवॅट व त्यापेक्षा अधिक १० किलो वॅट पर्यंत विद्युत निर्मिती सोलर पॅनल साठी २० टक्के अनुदान दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान दिले जाते.
  • गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी १० किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर पॅनल साठी २० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेचा अर्ज अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने करता येतो त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण खाली स्टेप बाय स्टेप पाहूया:

  • प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या संकेतस्थळावर जावे लागेल. ????????????????????????                   https://pmsuryaghar.gov.in
  • त्यानंतर होम पेजवर Apply For Solar Rooftop बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करायची आहे.
  • आता तुमच्या समोर पुन्हा एकदा नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये या योजनेचा अर्ज तुमच्यासमोर येईल, अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात तुम्हाला भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Consumer Number येथे तुमच्या वीजबिलावर असलेला Consumer Number टाकायचा आहे.
  • Consumer Number टाकल्यानंतर तुम्हाला एक Pop Up येईल त्यावर 0k वर क्लिक करायचे आहे.
  • Ok वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • या नवीन पेजवर तुम्हाला ग्राहक जोडणी प्रकार निवडायचा आहे, तुमचा ग्राहक नंबर टाकायचा आहे, बिलिंग युनिट टाकायचा आहे आणि सर्च कंजूमर वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तुमची सर्व माहिती दिसेल.
  • या माहितीमध्ये तुम्हाला तुमची राहिलेली माहिती (ई-मेल, मोबाईल नंबर) भरायची आहे किंवा अपडेट करायचे आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर l Agree वर क्लिक करून Submit वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला Data Submitted Successfully चा Message दिसेल त्याला Ok करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला परत एकदा पहिल्या टॅब वर जायचं आहे त्यावर तुम्ही भरलेली आणि अपडेट केलेली सर्व माहिती दिसेल.
  • त्यानंतर तुम्हाला उर्वरित माहिती भरायची आहे त्यामध्ये तुमच्या अर्जामध्ये लँडमार्क टाकायचा आहे.
  • ई-मेल टाकायचा आहे
  • आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • आता तुम्हाला Scheme Name मध्ये MNRE-RTS-PH 2 Subsidy निवडायचे आहे. (या योजनेचा दुसऱ्या टप्प्या अंतर्गत लाभ घेऊ इच्छितो)
  • आता RE Generator Type मध्ये Solar ला क्लिक करायचा आहे व Generator Type मध्ये Only Rooftop Capacity निवडायचे आहे.
  • Rooftop Capacity मध्ये तुम्हाला ज्या किलोवॅटची गरज आहे ते टाकायचे आहे.
  • Output Voltage of RE System 230/240 Volt निवडायचे आहे.
  • Do you want to mention the chronology in case of there is inadequate distribution transformer capacity : No करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Instaltion Cost दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सबसिडी दिली जाते हो तुम्हाला भरावयाची रक्कम दिलेली आहे.
  • आता तुम्हाला Generate OTP करून रक्कम भरायची आहे.
  • तुम्हाला तुमचे Application Status तपासायचे आहे.
  • तुमचे Application Accept झाल्यानंतर तुम्हाला Annexure Form भरून योग्य नंबर कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून जवळच्या विद्युत महावितरण कार्यालयात जमा करायचे आहे.
हे वाचा-  प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २०२५ अंतर्गत अनुदान Online Apply

प्रधानमंत्री मोफत सोलर योजनेची संपूर्ण माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहिली आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही या योजनेविषयीची अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, या योजनेच्या नियम. अटी व पात्रता या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!

Leave a Comment