नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला देशातील जवळपास ५२% लोक हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायामध्ये गुंतले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली आहे. देशातील कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी ही योजना मुख्यत्वे करून केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून देशातील कृषी व्यवसायाला आर्थिक स्वरूपात मदत करून शेतकऱ्यांचे व्यवसायातून उत्पन्न वाढवण्यासाठी मदत केली जाते.
Rashtriy Krishi Vikas Yojana 2025
राष्ट्रीय कृषी विकास योजनेची सुरुवात २००७ रोजी करण्यात आली. ही योजना केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते, कारण या योजनेच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्राचा विकास करणे हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशातील कृषी आणि कृषी विषयक क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे अतिरिक्त योगदान दिले आहे.
कृषी आणि कृषी विषयक क्षेत्राशी संबंधित विकास सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेची सुरुवात २००७ रोजी करण्यात आली होती. या योजनेची तत्कालीन २ पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत अंमलबजावणी करण्यात आली होती. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून राज्यातील कृषी आणि कृषी विषयक संबंधित क्षेत्रामध्ये सार्वजनिक स्वरूपात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेने अल्पावधीतच खूप मोठे यश प्राप्त केले आहे.
सदर लेखाच्या माध्यमातून आपण कृषी विकास योजनेची संपूर्ण माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. यामध्ये कृषी विकास योजना म्हणजे काय? या योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, या योजनेमध्ये समाविष्ट असलेले घटक, त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी पात्रता, या योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.
राष्ट्रीय कृषी विकास योजने विषयी थोडक्यात…
राष्ट्रीय कृषी विकास योजना ही केंद्र सरकार द्वारे सुरू केली गेली आहे,आणि या योजनेच्या अंमलबजावणी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय केली जाते. या योजनेची सुरुवात २००७ रोजी करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील कृषी क्षेत्राचा विकास करणे हा आहे. या योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकऱ्यांना घेता येतो.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेविषयी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेत १ नोव्हेंबर २०१७ पासून राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी आणि कृषी विषयक संलग्न क्षेत्रासाठी महत्त्वाचे म्हणून चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून २०१७ पासून पुढे तीन वर्षाच्या कालावधीत सुमारे १६ हजार कोटींचे आर्थिक वाटप करण्यात आले होते. या भरीव निधीच्या माध्यमातूनच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करून कृषी व्यवसायाला चालना देऊन शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. याचा लाभ देशातील शेतकऱ्यांना झाला आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कृषी आणि कृषी व्यवसायाला आर्थिक मदत करून व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते. या योजनेअंतर्गत इकोसिस्टीम सुधारित योजना RASHTRIY KRISHI VIKAS YOJANA-RAFTAAR माध्यमातून एक नवीन घटक २०१८-१९ मध्ये सुरू करण्यात आला आहे. इकोसिस्टीम सुधारित योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी व्यवसाय वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना वैशिष्ट्ये
राष्ट्रीय कृषी विकास योजनेची उद्दिष्ट खालील प्रमाणे:
- राष्ट्रीय कृषी विकास योजना ही पूर्णपणे केंद्र सरकार पुरस्कृत आहे.
- या योजनेअंतर्गत मागील ३ वर्षाच्या सरासरी खर्चाच्या आधारे आधारभूत खर्चाची गणना केली जाते.
- या योजनेचा कार्यक्रम प्रोत्साहन पुरस्कृत असल्याने याचे वाटप ही स्वयंचलित आहेत.
- राष्ट्रीय कृषी विकास योजना ही त्याच्या संबंधित क्षेत्राला संयुक्तपणे एकत्र करते.
- या योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर कृषी आराखडे तयार करणे अनिवार्य आहे.
- राष्ट्रीय कृषी विकास योजना निश्चित अशा ठरलेल्या कालावधीत प्रकल्पांना प्राधान्य देते.
- राष्ट्रीय कृषी योजना ही केंद्र सरकारची योजना राज्य सरकारकडून राज्यभरात राबवली जाते.
- या योजनेअंतर्गत राज्य सरकारने RKVY-RAFTAAR योजनेच्या निकषाचे पालन करून कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. राज्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून बाहेर पडले तरीही त्याची अंमलबजावणी सुरूच ठेवली पाहिजे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना उद्दिष्टे
राष्ट्रीय कृषी विकास योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:
- कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्राचा विकास करणे.
- कृषी व्यवसायाला चालना देणे.
- कृषी क्षेत्राला पायाभूत सुविधा निर्माण करून देणे.
- सर्व राज्यांना त्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करताना त्याविषयीची लवचिकता केंद्र सरकारकडून पुरवली जाते.
- देशामधील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार राज्य व जिल्हा स्तरावर योजना तयार करून शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत केली जाते.
- शेती व शेती संबंधित व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक गरज भागवून त्यांना आर्थिक सक्षम करणे.
- राज्यामधील महत्त्वाच्या पिकांचे उत्पादन वाढवणे.
- कौशल्य विकास नवनवीन कल्पना व शेती व्यवसाय करण्यासाठी देशातील तरुणांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना पात्रता
राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित देशातील नागरिक पात्र आहेत.
- या योजनेअंतर्गत राज्य कृषी आराखडे आणि जिल्हा कृषी आराखडे तयार करणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत केंद्र सरकार जो निधी वाटप करते तो निधी राज्य सरकार थेट शेतकरी किंवा कृषी क्षेत्राची संबंधित संस्था किंवा समूहाला वितरित करते.
- अर्ज करणारी व्यक्ती किंवा शेतकरी कृषी किंवा कृषी संबंधित क्षेत्रात त्याचे योगदान असावे किंवा तो त्या क्षेत्रात काम करणारा असावा.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेले घटक
राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये खालील घटक समाविष्ट आहेत:
- दुग्ध व्यवसाय
- मत्स्यव्यवसाय
- पीक संवर्धन
- फलोत्पादन
- वनीकरण आणि वन्यजीव
- वृक्षारोपण आणि कृषी विपणन
- मृदा आणि जलसंधारण
- कृषी संशोधन आणि शिक्षण
- कृषी वित्तीय संस्था
- अन्न साठवणूक आणि गोदाम
- इतर कृषीविषयक कार्यक्रम
राष्ट्रीय कृषी योजना आवश्यक कागदपत्रे
राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या प्रकल्पांतर्गत निधी प्राप्त करण्यासाठी राज्यांना सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी
- मागील आर्थिक वर्षात वाटप केलेल्या निधीसाठी १००% उपयोगिता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- त्रेमासिक आधारावर कार्यप्रदर्शन अहवाल (भौतिक आणि आर्थिक उपलब्धता) आणि दिलेल्या कालावधीत परिणाम निर्देशित स्वरूपात देणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपात आहे. त्याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ????????http://rkvy.da.gov.in/
- वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुमच्यासमोर या योजनेचे होम पेज उघडेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर होम पेजवर Apply Now हा पर्याय दिसेल.
- यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेची संबंधित अर्ज उघडेल.
- या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने भरा.
- त्यानंतर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्या.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर या योजनेचा अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थितपणे तपासून घ्या.
- त्यानंतर सर्वात शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून हा अर्ज तुम्ही सबमिट करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता. ह्या अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
सदर लेखाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेची संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर माहितीच्या आधारे देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
आपण या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. यामध्ये या योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, या योजनेमध्ये समाविष्ट असलेले घटक, या योजनेसाठीची पात्रता, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, त्याचबरोबर या योजनेची अर्ज प्रक्रिया जी ही एक खूप सोपी अर्ज प्रक्रिया आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण अगदी अचूक स्वरूपात दिलेली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!