कृषी यांत्रिकीकरण महाराष्ट्र योजनेअंतर्गत शेती अवजारे खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान जाणून घ्या सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अशा योजनेबद्दल आज पाहणार आहोत ज्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्राचा कायापालट होणार आहे. ही योजना म्हणजे महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना होय या योजनेच्या माध्यमातून सरकारद्वारे शेतकऱ्यांना अनेक शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

Krishi Yantrikikaran Yojana Maharashtra 2024 | कृषी यांत्रिकीकरण योजना

आपला देश कृषीप्रधान देश म्हणून जगभरात ओळखला जातो, परंतु देशांमध्ये अजूनही बहुसंख्य शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती करत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील शेतीबाबत काही वेगळी परिस्थिती नाही येथील  बहुसंख्य लोक पारंपारिक पद्धतीने शेती करत आहे. यामुळेच शेतकरी वर्गाचे उत्पादन तर वाढत नाही पण त्यांचे कष्ट काही कमी झाले नाही.

अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते शेतीसाठी प्रगत अवजारे खरेदी करू शकत नाही. यामुळेच शेतकऱ्यासमोर काही पर्याय नसल्याने तो वर्षाने वर्षे चालत आलेली पारंपारिक पद्धतीने शेती करत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतीमध्ये अधिक कष्ट करावे लागत आहे परिणामी उत्पादन ही कष्टाच्या मानाने मिळत नाही. परिणामी शेतकरी वर्गाची पीछेहाट होत आहे.

वरील शेतकरी वर्गाची परिस्थिती आणि अडचणीचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्याला शेतीतील कामे करण्यासाठी अधिक वेळ खर्च होऊ नये. त्याचबरोबर त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आर्थिक समृद्ध होईल या अनुषंगाने शेती करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर व्हावा, आणि शेतकरी वर्गाला मेहनतीसाठी लागणारा वेळ कमी व्हावा यामुळेच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना सरकारद्वारे शेती अवजारे घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी विभागांतर्गत शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारी आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी ८० टक्के अनुदान मिळणार आहे.

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना यामध्ये आपण सदर योजना काय आहे? या योजनेची वैशिष्ट्ये, योजनेचा उद्देश, या योजनेमध्ये समाविष्ट असलेली अवजारे, योजनेसाठी लागणारी पात्रता, योजनेसाठीच्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे, सदर योजनेची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

हे वाचा-  अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: मराठा तरुणांसाठी १५ लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज

कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी थोडक्यात…

महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे या योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकरी वर्गासाठी शेतीसाठी लागणाऱ्या विविध अवजारे घेण्यासाठी ८०% अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत यामध्ये विविध अवजारांचा समावेश केला गेला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महिलांसाठी ३०% व दिव्यांग व्यक्तीसाठी ३% असा राखीव निधी ठेवण्यात आला आहे. पण जर महिलांचा व दिव्यांग व्यक्तीचा अर्ज या योजनेसाठी आला नाही तर, या जागेचा वापर इतर शेतकऱ्यांसाठी केला जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे घेण्यासाठी ८०% अनुदान सरकारकडून देण्यात येणार आहे.

ही योजना कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेती क्षेत्रात आधुनिक यंत्राचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग घेऊ शकतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारा खरेदीसाठी ८०% पर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येते. या योजनेसाठीची अधिकृत वेबसाईट👇👇👇 https://mahadbtmahait.gov.in ही आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेचे उद्देश

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करणे.
  • शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेती मधील मेहनत करण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे.
  • आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून सहाय्य करणे.
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, शेतीसाठी लागणारी आधुनिक अवजारे खरेदी करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे.

कृषी यांत्रिकीकरण योजना वैशिष्ट्ये

  • या योजनेच्या द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून ८० टक्के अनुदान मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या साह्याने शेतकरी शेतीसाठी लागणारी नवीन अवजारे खरेदी करू शकतील.
  • या अवजारांच्या मदतीने शेतकरी शेतीतील कामे जलद त्याचबरोबर कमी वेळेत जास्त काम करू शकेल.
  • शेतीतील कामे कमी वेळेत पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत थेट जमा होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासाठी GST रक्कम गृहीत धरली जाणार नाही.
  • कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी नागरिक अर्ज करू शकतील.
  • कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारचा ४० टक्के सहभाग आहे.
  • सदर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही अतिशय सोपी असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
  • अर्ज प्रक्रिया करताना अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मोबाईल द्वारे या योजनेसाठी अर्ज करता येतो.
हे वाचा-  प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना २०२५ | अटल पेन्शन योजनेअंतर्गत सर्व वृद्धांना मिळणार पेन्शन

कृषी यांत्रिकीकरण योजना समाविष्ट अवजारे

१. स्वयंचलित अवजारे: यामध्ये रिपर, रिपर कम बाईंडर, पावर विनर (इंजिन ऑपरेटेड) या अवजारांचा समावेश स्वयंचलित अवजारामध्ये होतो.

२. ट्रॅक्टरचलित अवजारे: रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड विंडर, रेज्ड बेड प्लांटर, पलटी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, कॉटन श्रेडर, ट्रॅक्टर माऊंटेड स्प्रेयर इ. अवजारांचा समावेश ट्रॅक्टरचलित अवजारामध्ये होतो.

३. काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे: मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर, पॉलिशर, क्लीनर कम ग्रेडर इ. अवजाराचा समावेश काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणांमध्ये होतो.

वरील उपकरणाचा समावेश कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये होतो.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

  • शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी अवजारांसाठी या योजना अंतर्गत ६०% अनुदान (२४ लाख रुपयापर्यंत अनुदान) दिले जाते
  • अल्प व अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकरी यांना ५० % अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत इतर शेतकरी वर्गांसाठी ४०% पर्यंत अनुदान दिले जाते.
  • राईस मिल, दाल मिल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर, पॉलिशर इत्यादीच्या बाबतीत अल्प व अत्यल्प भूधारक, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी ६०% अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते.
  • सदर योजनेअंतर्गत इतर लाभार्थ्यांनां ५०% पर्यंत अनुदान दिले जाते.

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ची पात्रता

  • महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे ही योजना चालवली जात असल्यामुळे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.
  • अर्ज करणारी व्यक्ती ही शेतकरी असावी त्याच्याकडे त्याच्या जमिनीचा ७/१२ व ८-अ उतारा ही कागदपत्रे असावीत.
  • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील व्यक्ती देखील अर्ज करू शकतात परंतु अर्जदार व्यक्तीला त्याच्या जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत जी अवजारे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहेत ती अवजारे किमान ६ वर्षे शेतकऱ्यांने वापरणे गरजेचे आहे.६ वर्षानंतर ही अवजारे शेतकरी हस्तांतर करू शकेल किंवा विक्री करता येईल अथवा गहाण ठेवता येतील.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार या एकाच यंत्रासाठी अनुदान घेण्यासाठी पात्र काही.
  • या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकरी व्यक्तीने एखाद्या यंत्रासाठी अर्ज करून यंत्र खरेदी केले असेल तर, किमान दहा वर्षे त्याला त्याचं अवजारासाठी अर्ज करता येणार नाही, पण या दहा वर्षाच्या काळामध्ये त्याला दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येतो.
हे वाचा-  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2025| या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना मिळणार ५ वर्षे मोफत अन्नधान्य

कृषी यांत्रिकीकरण योजनेची पात्रता ही वरील प्रमाणे आहे. या पात्रतेमध्ये राज्यातील जो कोणी व्यक्ती किंवा शेतकरी बसत असेल तो या योजनेसाठी अर्ज करण्यास किंवा योजनेचा लाभ घेऊ शकेल.

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • अर्जदाराच्या जमिनीचा ७/१२ व ८-अ उतारा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • जातीचा दाखला
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र
  • यंत्र खरेदी केल्याची पावती
  • परीक्षण केले असल्याचा अहवाल

वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत.

कृषी यांत्रिकीकरण योजना अर्ज प्रक्रिया

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही दोन पद्धतीने करता येते. आपण या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा हे पाहू.

कृषी यांत्रिकीकरण योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • अर्जदाराने या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम तो ज्या भागात राहतो त्या भागातील जिल्हा यातील कृषी विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्ज संपूर्णपणे वाचून त्यावर विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात भरायची आहे. व त्यानंतर या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
  • अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे व अर्ज अर्जदाराला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहेत व त्या अधिकाऱ्याकडून पावती घ्यायची आहे ही पावती अर्जदाराला भविष्यात उपयोगी पडेल.

वरील प्रमाणे अर्जदार हा ऑफलाईन पद्धतीने कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करू शकतो.

कृषी यांत्रिकीकरण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज करण्यासाठी या संकेतस्थळावर जा.👇👇👇 https://mahadbtmahait.gov.in
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला कृषी विभाग यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर कृषी विभागातील कृषी यांत्रिकीकरण बटणावर क्लिक करा.
  • यामध्ये एक फॉर्म ओपन होईल त्यात विचारलेले सर्व माहिती अचूक स्वरूपात भरायची आहे.
  • या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे या अर्जासोबत अपलोड करायची आहेत.
  • सर्वात शेवटी आपणाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

अशाप्रकारे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज अगदी सोप्या पद्धतीने अर्जदार भरू शकतो.

सदर लेखामध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण योजना याविषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Comment