काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना? | जनधन योजनेअंतर्गत खातेधारकांना १०,००० रुपयांचा मिळतो लाभ

नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारच्या अशा एका योजनेबद्दल पाहणार आहोत की ज्या योजनेने नुकतीच आपली यशस्वीरित्या १० वर्षे पूर्ण केली आहेत. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री जन-धन योजना. सदरची योजना ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहेत. ज्या आधारे भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा त्यांच्या प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात १५/०८/२०१४ ला केली होती. बरोबर या योजनेचे विमोचन पंतप्रधानांच्या द्वारे २८ ऑगस्ट २०१४ ला करण्यात आली होते.

आर्थिक मंत्रालयाद्वारे चालवण्यात येत असलेल्या या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटनाच्या दिवशीच देशात १.५ करोड खाती उघडण्यात आली होती. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेतली. या या रेकॉर्डचे प्रमाणपत्र देताना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने असे म्हटले की, २३ ते २९ ऑगस्ट २०१४ यादरम्यान भारतातील बँकांमध्ये सुमारे १,८०,९६,१३० इतकी खाती सुरू करण्यात आली. जून २०१६ पर्यंत हा काढा २२० लाख पर्यंत पोहोचला व प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे ३८४.११ लाख रुपये इतके या योजनेत जमा करण्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या या प्रमाणपत्राद्वारेच असे समजते की, या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व स्तरातील लोक बँकिंग क्षेत्राशी जोडण्यात आलेले आहेत.

प्रधानमंत्री जनधन योजनेची उद्दिष्टे

  • कोणत्याही बँकेत खाते नसलेल्या व्यक्तींसाठी बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे म्हणजेच देशातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक प्रवाहात सामील करून घेणे. यामध्ये आधारभूत बचत बँक ठेव खाते सुरू करून देणे, त्यासाठी कमीत कमी कागदपत्रे, सुलभ KYC, E-KYC शिबिर, शून्य रुपयांची किमान ठेव शिल्लक आणि शून्यशुल्क अशा सोयी उपलब्ध करून देणे.
  • आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून वंचितांना अर्थसाह्य मिळवून देणे. यामध्ये मायक्रो इन्शुरन्स/लघु विमा, खर्चासाठी ओव्हर ड्राफ्ट,मायक्रो पेन्शन/ लघु निवृतीवेतन आणि मायक्रो क्रेडिट/ लघु पतपुरवठा अशा वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे.
  • व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी रोख रक्कम काढण्यासाठी तसेच देयकांची रक्कम भागवण्यासाठी स्वदेशी डेबिट कार्ड/ रूपे डेबिट कार्ड जारी केले आहे.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून खातेदाराला जीवन विमा दुर्घटना विमा हा २ लाख रुपये पर्यंतचा विनामूल्य प्रदान करण्यात आला आहे
  • प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होते
हे वाचा-  प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळवा २० लाख रुपयां पर्यंतचे कर्ज

प्रधानमंत्री जनधन योजनेचे फायदे

  • प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून खातेदाराला पैसे बँक खात्यामध्ये जमा करून सुरक्षित ठेवता येतात.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होते.
  • डिजिटल पेमेंट्स द्वारे वेळ आणि पैसा वाचवता येतो.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून महिला आणि गरीब वर्गाचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण होते.

प्रधानमंत्री जनधन योजना खालील ६ मुद्द्यावर सुरू केली

  • भारतातील सर्व स्तरावर बँकिंग सेवांची सार्वत्रिक उपलब्धता करून देणे.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी पात्र प्रौढ व्यक्तीसाठी १०,००० रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेसह आधारभूत बचत बँक खाते काढणे.
  • आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून खातेदारांना बचत, एटीएम चा वापर यासाठी प्रोत्साहन देणे, पतपुरवठ्यासाठी पात्र करणे, विमा आणि निवृत्त वेतनाचा लाभ मिळवणे, बँकिंग सेवांचा वापर हा मोबाईलच्या माध्यमातून करणे.
  • पत हमी निधीच्या माध्यमातून कर्ज बुडवणाऱ्यांच्या विरोधात बँकांना काही हमी प्रदान करणे.
  • १५ ऑगस्ट २०१४ ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान उघडण्यात आलेल्या खात्यावर खाते धारकांना १ लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा संरक्षण आणि ३०,००० रुपयापर्यंत जीवन विमा प्रदान करणे .
  • असंघटित क्षेत्रातील निवृत्तीवेतन योजना.

सुधारित वैशिष्ट्यसह प्रधानमंत्री जनधन योजनेचा विस्तार

केंद्र सरकारने या योजनेत काही नवीन बदल करून ही योजना २८/०८/२०१८ नंतर ही पुढे सुरू ठेवून तिचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला,ते नवीन बदल खालील प्रमाणे.

  • सुधारित वैशिष्ट्यसह प्रधानमंत्री जनधन योजनेचा विस्तार करताना प्रत्येक कुटुंबा ऐवजी आता प्रत्येक प्रौढ या ध्येयपूर्तीवर लक्ष केंद्रित केले गेले.
  • सुधारित वैशिष्ट्य सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना खात्यासाठी मोफत अपघाती विमा संरक्षणाचे कवच १ लाख रुपयांवरून वाढवून २ लाख रुपये इतके केले.
  • ओव्हरड्राफ्टची मर्यादा दुप्पट केली ती ५,००० रुपयावरून १०,००० रुपये इतकी केली. २००० रुपयापर्यंतचा ओव्हरड्राफ्ट विनाअट
  • ओव्हरड्राफ्टसाठी जास्तीत जास्त पात्र वयाची मर्यादा ६० वर्षांवरून 65 वर्षे इतकी केली.
हे वाचा-  पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मिळणार व्यवसायासाठी ३५% अनुदान आणि ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज...

धन मंत्री जनधन योजनेची आतापर्यंतची कामगिरी

  • मंत्री जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत बँक खात्यांची एकूण संख्या ४६.२५ कोटी आहे, त्यापैकी ५५.५९% जनधन खाते धारक महिला आहेत.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेच्या पहिल्याच वर्षात १७.९० कोटी जनधन खाती उघडण्यात आली जो की एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडल्या जाणाऱ्या खात्यांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ होत आहे.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुरू केलेल्या खात्यांच्या संकेत आत्तापर्यंत तिप्पट वाढ झाली आहे जी की आर्थिक समावेशनाच्या कार्यक्रमाचा एक उल्लेखनीय प्रवास आहे.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या ४६.२५ कोटी खात्यापैकी ३७.५७ कोटी खाती सक्रिय आहेत.
  • आतापर्यंत प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत उघडलेल्या एकूण खात्यापैकी केवळ ८.२% खाती ही शून्य शिल्लक असलेली खाती आहेत.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यामधील शिल्लक ठेव १,७३,९५४ कोटी रुपये इतकी आहे.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामधील शिल्लक ठेव सुमारे ७.६० पटीने वाढली आहे. त्यासोबतच खात्याची एकूण संख्या ही २.५८ पटीने वाढली आहे.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत काढलेल्या खात्यामध्ये प्रती खाते सरासरी शिल्लक ठेव ३,७६१ रुपये इतकी आहे.
  • ऑगस्ट 2015 पासून आज पर्यंत प्रती खाते सरासरी शिल्लक ठेव २.९ पटीने वाढली आहे.
  • प्रधानमंत्री जनधन खातेधारकांना आतापर्यंत वितरित केलेली एकूण रुपये कार्ड ३१.९४ कोटी आहेत.
  • या योजनेअंतर्गत वितरित केलेल्या रुपये कार्डांची आणि या कार्डाच्या वापरांची संख्या सातत्याने वाढतच राहिली आहे.
हे वाचा-  ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025| ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत मिळणार १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

प्रधानमंत्री जनधन योजनेचे मूल्यमापन

प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे लोककेंद्री आर्थिक उपक्रमाचा पाया आहे. थेट लाभ हस्तांतरण , कोविड -१९ साठी दिलेली आर्थिक मदत, पंतप्रधान किसान सन्मान योजना, मनरेगा अंतर्गत वाढीव मोबदला, जीवन आणि आरोग्य विमा संरक्षण या सर्व उपक्रमाची पहिली पायरी म्हणजे प्रत्येक प्रौढ व्यक्तीला त्याचे स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून देणे. आणि हेच काम प्रधानमंत्री जनधन योजनेने जवळजवळ यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आतापर्यंत उघडण्यात आलेल्या प्रत्येक दोन बँक खात्यापैकी एक खाते हे प्रधानमंत्री जनधन योजनेचे आहे.

जनधन खात्यामुळे गरिबांना त्यांची बचत औपचारिकपणे आर्थिक व्यवस्थेत आणण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर खेड्यापाड्यांमध्ये असलेल्या  कुटुंबांना बँकिंग सेवांच्या माध्यमातून पैसे पाठवण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. याचबरोबर गाव पातळीवर लुबाडणूक करणाऱ्या सावकारांच्या तावडीतून या कुटुंबांची सुटका झालेली आहे. आज पर्यंत चे बँकिंग व्यवस्थित जोडले गेले नव्हते अशांना प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँकिंग व्यवस्थित आणले आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेने भारताच्या आर्थिक रचनेचा विस्तार केला आहे त्याचबरोबर जवळपास देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आर्थिक समावेशनाच्या वर्तुळात आणले आहे.

वरील बाबीवरूनच असे लक्षात येते की, प्रधानमंत्री जनधन योजना ही पूर्णपणे यशस्वी झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक व्यक्ती ही बँक व्यवस्थेशी जोडली गेली आहे. त्यामुळेच या योजनेचा विस्तार संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

सदरच्या लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री जनधन योजनेला नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली याबद्दलचा या योजनेचा संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल.

Leave a Comment