नमस्कार, आज आपण सदरच्या लेखांमध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना होय.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना ही आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजातील लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच बरोबर या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर्ज पुरवते. सदरची योजना महाराष्ट्रातील शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि इतर लोकांसाठी एक वरदान ठरली आहे.
सदरच्या लेखांमध्ये आपण या महामंडळाबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची वैशिष्ट्ये, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, त्याचबरोबर कर्ज मिळवण्याची संपूर्ण माहिती, या योजनेची उद्दिष्टे, पात्रता, योजनेच्या अटी याविषयीची संपूर्ण माहिती सदरच्या लेखांमध्ये आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेची उद्दिष्टे
- महाराष्ट्रातील युवकांना त्यांचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सुरू असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून.
- आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणणे.
- समाजातील बेरोजगार युवकांपर्यंत आर्थिक सहाय्य पोचवून त्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सक्षम बनवणे.
- स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये त्याचबरोबर जास्त व्याजदराने पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी या योजनेच्या माध्यमातून सहज कर्ज उपलब्ध करून देणे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
- सदरची योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
- या योजनेसाठी महाराष्ट्रातील आर्थिक मागास व्यक्ती अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन करण्यात आली असल्यामुळे अर्ज करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही अर्जदार व्यक्तीही घरी बसून स्वतःच्या मोबाईल द्वारे अर्ज करू शकतो त्यामुळे त्याच्या वेळेची व पैशाची बचत होते.
- सदरच्या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या व्यक्तीला अर्ज केल्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत ची संपूर्ण माहिती मोबाईलच्या माध्यमातून मिळते.
- या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन असल्यामुळे सदरच्या योजनेत पारदर्शकता दिसून येते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेच्या अटी
- सदर योजनेअंतर्गत जी व्यक्ती या योजनेचा लाभ घेणार आहे त्याने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- एक व्यक्ती फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज दाखल करत असल्यास त्यांना दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अक्षम मापदंडाच्या आधारे अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- अर्जदार व्यक्ती ही कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
- एखाद्या लाभार्थ्याने जर मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्याला दिला जाणारा व्याज परतावा मिळणार नाही.
- व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असेल तर कर्जफेडीचा हप्ता हा प्रति माह (महिना) असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार व्यक्तीचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीने त्याच्या उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
- सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्जदार व्यक्तीने हे कर्ज प्रकरण सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली किंवा तत्सम संगणक प्रणाली द्वारे हे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेतच केले असावे.
- या योजनेसाठी गट प्रकल्प योजनेअंतर्गत किमान एक भागीदार किंवा अर्ज करणारी व्यक्ती किमान १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या १०% रक्कम महामंडळाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड (रेशन कार्डावरील कुटुंब सदस्यांची नावे असलेली बाजू)
- सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीस शासनाकडून मिळालेला जातीचा दाखला
या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे सदरची कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेचा फायदा
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी तसेच सुरू असलेल्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज पुरवले जाते.
- सदरच्या कर्जावरील व्याजाची परतफेड महामंडळामार्फत केली जाते.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत गरजू युवकांना बिनव्याजी कर्ज पुरवले जाते.
- सदरच्या योजनेअंतर्गत या महामंडळाकडून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना १० लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीने कर्जाच्या हप्ते वेळेत भरल्यास कर्जाची व्याजाची रक्कम (१२%) लाभार्थ्याच्या बँक खात्यात दरमहा जमा केली जाते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या महत्त्वपूर्ण बाबी
- या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणारे व्यवसाय किंवा प्रकल्प हे महाराष्ट्रात असणे अनिवार्य आहे.
- या योजनेच्या लाभार्थ्याकडून सुरू करण्यात येणाऱ्या व्यवसायामध्ये कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री आणि सेवा क्षेत्र असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश सह कर्जदार म्हणून करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत जर एखाद्या लाभार्थ्याने कर्जाच्या हप्त्याची परतफेड केली नाही तर त्यांना या महामंडळाकडून मिळणारा व्याजाचा परतावा केला जाणार नाही.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी नाव नोंदणी
- अर्जदार व्यक्तीने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या अटी व शर्तीनुसार अर्ज पात्र असल्यास अर्जदारास संगणकीकृत सशस्त्र हेतु पत्र किंवा मंजुरी पत्र दिले जाईल. त्यानंतर अर्जदाराने या मंजूर पत्राच्या आधारावर बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत झालेले महत्वाचे बदल
- या योजनेसाठी शासनमान्य असलेले कोणतेही गट ज्या गटाचे सदस्य 100% शेतकरी वर्गातील असतील व त्यांना शेती संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा गटातील सदस्यांकरिता कमाल वय (४५ वर्षे) मर्यादेची अट असणार नाही.
- या योजनेअंतर्गत सर्व महिला बचत गटांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत असलेली जास्तीत जास्त वयाची अट रद्द करण्यात आली आहे.
- गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत यापूर्वी बँक कर्ज मर्यादेची रक्कम किमान १० लाख ते कमाल ५० लाख रुपये इतकी होती. ही अट आता शिथिल करून सुधारित बँक कर्ज मर्यादा जास्तीत जास्त ५० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.
- सदरच्या योजनेतील लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर व्यवसाय सुरू आहे याचे किमान ३ फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र असलेले गट
- शासनमान्य बचत गट (इतर कोणत्याही शासकीय योजनेसाठी मान्यता असलेले)
- भागीदारी संस्था (निबंधक, महाराष्ट्र राज्य, भागीदारी संस्था, मुंबई यांनी प्राधिकृत केलेले)
- सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक यांनी प्राधिकृत केलेले)
- कंपनी (कंपनी कायदा २०१३ संकेतस्थळानुसार)
वरील गट हे गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र असतील.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठीची आवश्यक करारपत्रे
- भागीदारी संस्थेतर्फे/सर्व भागीदार आणि महामंडळ यातील करार (शासनाने निश्चित केलेल्या किमतीच्या स्टॅम्प पेपरवर)
- लाभार्थ्याला कर्ज रक्कम मिळाल्याची पोचपावती
- कर्ज वसुलीसाठीचा ॲडव्हान्स चेक
- अर्जदार गट किंवा संस्थेच्या संबंधित बँक खात्यात गट किंवा संस्था सहभागाची १०% रक्कम जमा केल्याची बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत
- ज्या व्यवसायासाठी कर्ज मिळाले आहेत त्या संबंधित व्यवसाय करता आवश्यक परवान्याची प्रत प्रकल्पाच्या किमतीत अंतर्भूत असलेल्या यंत्रसामग्री किंवा साधनसामग्रीचे बिल
- व्यवसाय सुरू करण्याच्या जागे संदर्भातील दस्तऐवज (करार/भाडे पावती/ना हरकत प्रमाणपत्र)
- जागेचा ७/१२उतारा, स्थावर व जंगम मालमत्ता धारकाचे मूल्यांकन/PR Card/८अ उतारा मूल्यांक देण्यात येणाऱ्या कर्ज रकमेपेक्षा अधिक असणे आवश्यक
- Hypothecation Did, नोंदणीकृत गहाणखत, Surety Bond, जनरल करारनामा, रक्कम पोचपावती, वचनचिठ्ठी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची वित्तीय परतफेड
१. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास वित्तीय महामंडळाच्या कर्ज योजनेची वसुली ही कर्जाची रक्कम जमा झाल्यापासून ६ महिने पूर्ण झाल्यानंतर ७ व्या महिन्यापासून करण्यात येते.
२. गट किंवा संस्थेने या वित्तीय साहित्याची परतफेड ७ वर्षात करणे आवश्यक आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत येणाऱ्या बँकांची यादी
- श्री. वारणा सहकारी बँक लिमिटेड, वारणानगर
- कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड
- सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित
- विकास नागरी सहकारी बँक लिमिटेड, औरंगाबाद
- श्री. महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक
- श्री. आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इचलकरंजी
- श्री. वीरशैव को-ऑपरेटिव बँक मर्यादित, कोल्हापूर
- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग
- दि नॅशनल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड
- देवगिरी नगरी सहकारी बँक, औरंगाबाद
- राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड पेठ, सांगली
- ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे
- हुतात्मा सहकारी बँक मर्यादित, वाळवा
- ती पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मर्यादित, पनवेल
- द चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड चिखली, बुलढाणा
- राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, कागल
- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर
- राजापूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड राजापूर
- नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक मर्यादित
- यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक मर्यादित
- शरद नागरिक सहकारी बँक मर्यादित
- लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित सोलापूर
- प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक
- पलूस सहकारी बँक पलूस
- रामेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित
- रेंडल सहकारी बँक मर्यादित रेंडल
- कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव बँक मर्यादित कुरुंदवाड
- श्री अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव बँक
- जनता सहकारी बँक अमरावती
- दि अमरावती मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित
- अभिनव अर्बन को-ऑपरेटिव बँक मर्यादित
- जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई
- अरिहंत को-ऑपरेटिव्ह बँक
- दि कराड अर्बन को-ऑपरेटिव बँक
- विदर्भ मर्चंट को-ऑपरेटिव बँक मर्यादित हिंगणघाट
- दि व्यंकटेश्वरा सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी
- सेंट्रल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड कोल्हापूर
- सांगली अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड सांगली
- दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक
- गोदावरी अर्बन बँक
- श्री नारायण गुरु को-ऑपरेटिव बँक लिमिटेड
- श्रीकृष्ण को-ऑपरेटिव बँक लिमिटेड
- नागपूर नागरी सहकारी बँक
- सातारा सहकारी बँक
- दि हस्ती को-ऑपरेटिव बँक लिमिटेड
- दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादित बुलढाणा
- अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड
- जनता सहकारी बँक लिमिटेड गोंदिया
- निशिगंधा सहकारी बँक
- महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्यादित लातूर
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा
- रायगड सहकारी बँक लिमिटेड.
- येस बँक लिमिटेड
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- वयाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- प्रकल्प अहवाल
बँकेतून कर्ज घेताना बँकेला सादर करावयाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- विज बिल
- व्यवसाय सुरू करण्याचा परवाना
- बँक खाते स्टेटमेंट
- सिबिल स्कोर रिपोर्ट
- व्यवसाय किंवा प्रकल्प अहवाल
- व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
व्याज परताव्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- बँक स्टेटमेंट
- व्यवसाय सुरू करण्याबाबतचा परवाना
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचा फोटो
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेसाठी अर्जदाराला सर्वप्रथम या संकेतस्थळावर जावे लागेल.???????????? https://udyog.mahaswayam.gov.in
- संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम मुखपृष्ठावर नोंदणी या बटणावर क्लिक करावे लागेल.
- तुमच्यासमोर नवीन नोंदणीसाठी तुमची माहिती विचारली जाईल ती अचूक स्वरूपात भरायचे आहे त्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला Username आणि Password दिला जाईल त्याचा वापर करून login करायचे आहे.
- Login करून झाल्यावर अर्ज करण्यासाठी या बटनावर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल त्यानंतर लागू या बटणावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या गटाचा किंवा कंपनीचा तपशील भरायचा आहे.
- त्यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्ज रद्द होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होतो.
- अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही कर्ज योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार करणारी व्यक्ती ही कोणत्याही वित्तीय संस्थेची किंवा बँकेची थकबाकीदार असल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार व्यक्तींनी अर्जामध्ये खोटी तसेच दिशाभूल करणारी माहिती दिली असेल तर अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदाराने एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील तर बाकीचे अर्ज रद्द केले जातात.
अशाप्रकारे आपण सदरच्या लेखांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजने विषयीची संपूर्ण माहिती सदरच्या लेखांमध्ये पाहिली आहे. या माहितीच्या आधारे पात्र होणाऱ्या व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवू शकतात.