नमस्कार, आपण सदर लेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारची अगदी कमी वेळेत सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. ही योजना नागरिकांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध चांगला जावा त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी ही योजना खूपच महत्त्वपूर्ण आहे. प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेअंतर्गत बचत करून भारतातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या उतार वयात आर्थिक संकटाचा सामना करता येतो.
Pradhanmantri Atal Pension Yojana 2025
या आर्थिक बचतीतून उतारवयात मिळणाऱ्या पेन्शन द्वारे नागरिक त्यांच्या मूलभूत गरजा भागू शकतात त्यांना इतर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. जर एखाद्या व्यक्तीने आत्तापासूनच या योजनेत गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत चांगले फायदे मिळू शकतात.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही विविध बँक अथवा पोस्ट कार्यालयातील उपलब्ध आहे. या योजनेचे एप्लीकेशन ही उपलब्ध आहे ज्याच्या आधारे एखादा व्यक्ती गुंतवणुकीची अद्यावत माहिती मिळवू शकेल. एखादा व्यक्ती जर भविष्यासाठी एखाद्या चांगल्या योजनेच्या शोधात असेल तर प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना हा एक सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर वयाच्या ६० वर्षानंतर त्या व्यक्तीला दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळते. ही रक्कम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील उत्तरार्धात एक समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी पुरेशी आहे . त्यामुळेच केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेत देशातील नागरिक मोठ्या संख्येने या योजनेत गुंतवणूक करत आहेत या योजनेसाठी देशातील कोणताही नागरिक अर्ज करू शकतो.
म्हणूनच आपण सदर लेखाच्या माध्यमातून या योजनेविषयीची संपूर्ण माहिती अधिक सविस्तर स्वरूपात पाहणार आहोत. त्यामध्ये अटल पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य, उद्देश, कागदपत्रे, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? त्याचबरोबर या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजने विषयी थोडक्यात…
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या गुंतवणुकीच्या नमुन्यानुसार, या योजनेअंतर्गत गोळा केलेली रक्कम पेन्शन फंड रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे व्यवस्थापित केली जाते. ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव योजना आहे. ही योजना भारताचे तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर केली होती. प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही प्रामुख्याने भारतातील सर्व नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे. ही योजना विशेषतः गरीब वंचित आणि असंघटित क्षेत्रातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करते. प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेने केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वावलंबन योजनेची जागा घेतली.
देशातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षेची भावना देऊन त्यांच्या वृद्धापकाळात कोणतेही आजार, अपघात याविषयी त्यांना सुरक्षित वाटावे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी त्यांना त्या संस्थेकडून पेन्शनचा लाभ मिळत नाही ते देखील प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयाच्या ६० व्यावर्षी १००० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये, ५००० रुपये निश्चित पेन्शन मिळवण्याचा पर्याय आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शन ही व्यक्तीचे वय आणि योगदानाच्या रकमेवर आधारित निश्चित केली जाईल.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना उद्दिष्टे
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे:
- प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही आजार,अपघात यासारख्या विविध समस्यापासून भारतीय नागरिकांचे संरक्षण करणे हे या योजनेचे ध्येय आहे.
- प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही प्रामुख्याने देशातील असंघटित क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते.
- या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीने जमा केलेल्या फंडातून देण्यात येणारी मासिक पेन्शन देण्यात येते. एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पती/पत्नीला पेन्शन प्राप्त होईल. लाभार्थी आणि त्यांच्या पती/पत्नी या दोघांच्या पश्चात वारसाला या योजनेची रक्कम दिली जाईल.

प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:
- या योजनेअंतर्गत एखादा व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या मासिक पेन्शनची रक्कम त्याला सत्ता निश्चित करावी लागते. ही रक्कम १००० रुपये ते ५००० रुपयां पर्यंत असू शकते.
- एखाद्याने निश्चित केलेल्या पेन्शनच्या रक्कमनुसार आणि त्याच्या वयानुसार त्याचे मासिक योगदान निश्चित केले जाते.
- एखाद्या व्यक्तीला या योजनेसाठी कमीत कमी २० वर्षे योगदान द्यावे लागते.
- प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेत देशातील १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणताही नागरिक जर तो कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेत नसेल तर तो या योजनेत सहभागी होऊ शकतो.
- केंद्र सरकार द्वारे या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून काही निश्चित रक्कम देते.
- या योजनेअंतर्गत एखादा व्यक्ती निवृत्त झाल्यावर त्याला मासिक पेन्शन मिळते. जर त्या व्यक्तीचे योगदान २० वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला या योजनेअंतर्गत अधिक पेन्शन मिळेल.
- या योजनेअंतर्गत जर लाभार्थ्याचे आकस्मित निधन झाले तर त्याच्या/तिच्या पती किंवा पत्नीला शिल्लक रक्कम म्हणून पेन्शन मिळू शकते.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेचे फायदे
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेचे फायदे खालील प्रमाणे:
- अटल पेन्शन योजना अंतर्गत एखाद्याच्या योगदानानुसार वयाच्या ६० व्या वर्षी किमान मासिक पेन्शन १००० ते ५००० रुपयांची हमी देते.
- केंद्र सरकार तुमच्या मासिक योगदानाच्या ५०% पर्यंत किंवा १००० रुपये प्रतिवर्षी,१८ ते ४० वर्षाच्या दरम्यान सामील झालेल्यांसाठी पाच वर्षासाठी सह योगदान देईल.
- प्रधानमंत्री अटल पेन्शन योजने अंतर्गत आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८०CCD(1) अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरते.
- या योजनेअंतर्गत जर लाभार्थी अकस्मित मरण पावला तर त्याच्या जोडीदाराला समान पेन्शन मिळते, जर जोडीदाराचा ही मृत्यू झाला असेल तर नॉमिनीला या योजनेचा संपूर्ण फायदा मिळतो.
- जर एखाद्याला किमान दहा वर्षाच्या योगदानानंतर या योजनेतून बाहेर पडायचे असेल तर त्याला केवळ व्याजासह जमा झालेला निधी मिळू शकतो हमी पेन्शन मिळणार नाही.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला खालील आवश्यक पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत.
- प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ती व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- सदर व्यक्तीचे वय १८ ते ४० वर्षाच्या दरम्यान असावे.
- प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेसाठी एखाद्या व्यक्तीने किमान वीस वर्षासाठीचे योगदान दिले गेले पाहिजे.
- या योजनेसाठी पात्र होण्यास व्यक्तीचे आधार कार्डशी लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
- वैध मोबाईल नंबर आवश्यक आहे.
- ज्या व्यक्ती केंद्र सरकारच्या स्वावलंबन योजनेचा लाभ घेत आहेत ते ऑटोमॅटिक अटल पेन्शन योजनेत स्थलांतरित होतील.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- फोटो
- मोबाईल नंबर
- वयाचा पुरावा
- स्व- प्रमाणीकरण अर्ज
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना प्रीमियम
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेअंतर्गत निवडलेल्या पेन्शनच्या आधारावर 18 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींसाठी मासिक योगदान रक्कम खालील प्रमाणे:
- १८ वर्ष: १. दरमहा ४२ रुपयांचे योगदान दिल्यास तुम्हाला एक हजार रुपये ची पेन्शन मिळेल.२. दरमहा २१० रुपयांचे योगदान दिल्यास तुम्हाला ५००० रुपयांची पेन्शन मिळेल.
- ४० वर्ष: १. दरमहा २९१ रुपयांचे योगदान दिल्यास तुम्हाला १००० रुपयांची पेन्शन मिळेल.२. दरमहा १४५४ रुपयांचे योगदान दिल्यास तुम्हाला ५००० रुपयांची पेन्शन मिळेल.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेसाठीचा अर्ज हा दोन पद्धतीने भरता येतो. ऑनलाईन पद्धतीने व ऑफलाईन पद्धतीने आपण या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम या संकेतस्थळाला भेट द्या. https://www.npscra.nsdl.co.in/enrollment-details-of-apy.php
- त्यानंतर APY खाते उघडा विभाग पहा आणि अटल पेन्शन योजना ऑनलाइन अर्ज पुढे जा.
- तुमचा बचत खाते क्रमांक, ई-मेल आयडी आणि UID क्रमांक यासारखे तुमचे वैयक्तिक अटल पेन्शन योजनेसाठी आवश्यक तपशील भरा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अटल पेन्शन योजना लॉगिन क्रेडेन्शियल प्राप्त होईल. KYC औपचारिकता ऑनलाईन पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करा.
- वरील सर्व प्रोसेस यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अटल पेन्शन योजना नोंदणी क्रमांक असेल एक पोचपावती ई-मेल स्वरूपात मिळेल.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- प्रथम तुमच्याजवळ एक पीओपी एसपी शोधा. ही तुमची बँक शाखा, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणतीही अधिकृत एजन्सी असू शकते.
- पीओपी एसपी कडून प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना फॉर्म मिळवा.
- प्रधानमंत्री अटल पेन्शन चा अर्ज मिळाल्यानंतर तो अर्ज व्यवस्थित अचूक रित्या भरा.
- सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रासह भरलेला फॉर्म पी ओ पी एस पी प्रतिनिधीकडे सबमिट करा.
वरील माहितीच्या आधारे प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती या योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरू शकते.
प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या माहितीच्या आधारे भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.