नमस्कार, या लेखामध्ये आपण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकार देशातील जनतेच्या उज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर त्यांचे राहणीमान सुधारावे यासाठी सतत विविध योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करत असते. प्रधानमंत्री उज्वला योजना ही यापैकीच एक आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना राबवत आहे.
Pradhanmantri Ujjwala Yojna 2025
पारंपरिक इंधनाच्या वापरामुळे त्यामध्ये जळाऊ लाकूड, कोळसा, शेणापासून बनवण्यात आलेल्या गोवऱ्या महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर ही या इंधनांचा विपरीत परिणाम होत असतो. पर्यावरणावरील व महिलांच्या आरोग्यावरील होणारे दुष्परिणाम लक्षात घेता केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना १ मे २०१६ रोजी या योजनेची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.
प्रधानमंत्री उज्वला योजनेची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, प्रधानमंत्री उज्वला योजनेचा फायदा, सदरच्या योजनेचे लाभार्थी कोण असतील, त्याचबरोबर या योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि अटी, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याविषयीची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे पाहूया.
प्रधानमंत्री उज्वला योजना विषयी थोडक्यात…
प्रधानमंत्री उज्वला योजना ही केंद्र सरकार द्वारे संपूर्ण देशामध्ये राबवली जाते. पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारी परिणाम त्याचबरोबर पर्यावरणावर देखील होत असलेले दुष्परिणाम पाहता ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात करण्यात आली.
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडरचे कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते. तसेच लाभार्थ्यांना प्रति वर्ष १२ सिलेंडरचसाठी २०० रुपये इतके अनुदान दिले जाते व ही अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्लभ कुटुंबांना एलपीजी सारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देणे तसेच पारंपारिक इंधनामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारी परिणाम यापासून त्यांची मुक्तता करणे.
केंद्र सरकारच्या नवीन शासन निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२३ पासून प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर एकूण ४०० रुपयांची सबसिडी दिली जात आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेची वैशिष्ट्ये
- प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन ही कुटुंबातील फक्त महिलेच्या नावावर दिले जाते.
- प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी दरवर्षी ८ हजार करोड रुपयांचे बजेट निर्धारित करण्यात आले आहे.
- केंद्र सरकारकडून या योजनेसाठी देशातील ८ करोड कुटुंबांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- केंद्र सरकारच्या या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना विशेषतः महिलांना खूप धीर मिळाला आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेची उद्दिष्टे
- ग्रामीण भागातील पारंपारिक इंधने किंवा जीवाश्म इंधने यांच्या जागी LPG च्या वापरासाठी प्रोत्साहन देणे.
- देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळवणे.
- सरकारच्या माध्यमातून देशातील सर्व गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे.
- पारंपरिक इंधने किंवा जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे महिलांना किंवा कुटुंबातील लहान मुलांना होणाऱ्या आजारापासून रक्षण करणे.
- प्रधानमंत्री उज्वला योजनेचा मुख्य उद्देश्य म्हणजे देशातील ज्या कुटुंबाकडे LPG कनेक्शन नाही त्यांना या योजनेच्या माध्यमातून LPG कलेक्शन प्रदान करणे.
- प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत महिलांव्यतिरिक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल ST, OBC आणि अल्पसंख्यांक समुदायातील पुरुषांनाही LPG कनेक्शन साठी पात्र केले आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना लाभार्थी
- देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
- प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या महिला खालील प्रमाणे:
- वनक्षेत्रात राहणारे कुटुंब
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंब (BPL)
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/बौद्ध/मागासवर्गीय आणि गरीब कुटुंब
- अति मागासवर्गीय (MBC)
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण लाभार्थी)
- चहा आणि माजी चहाबाग जमाती
- अंत्योदय योजना
- बेटे आणि नदी बेटांचे रहिवाशी
- SECC कुटुंबांतर्गत किंवा १४ कलमी घोषणेनुसार कोणत्याही गरीब कुटुंबांतर्गत नोंदणी केलेले
- देशातील दुर्गम ती अतिदुर्गम भागात जिथे महिलांना स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस कनेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना चुलीवर जेवण बनवावे लागते अशा महिलांना या प्रधानमंत्री उज्वला योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
वर उल्लेख केलेले सर्व महिला किंवा कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे
- प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एलपीजी सिलेंडर आणि मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाते.
- सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याला या योजनेच्या माध्यमातून सिलेंडरवर सबसिडी मिळते.
- एलपीजी हे पारंपारिक इंधनापेक्षा म्हणजेच लाकूड कोळसा आणि शेणापासून बनवण्यात आलेल्या गोवऱ्या यांच्यापेक्षा स्वच्छ आणि सुरक्षित इंधन आहे.
- एलपीजी मुळे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या पूर्णपणे कमी होतात.
- प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच महिला सशक्तीकरणाला वाव मिळतो.
वरील सर्व फायदे हे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत होतात.
प्रधानमंत्री उज्वला योजना आवश्यक पात्रता
- या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त महिलेच्या नावावर गॅस सिलेंडरची नोंदणी केली जाईल.
- अर्जदार महिलेचे वय १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
- अर्जदार करणाऱ्या महिलेच्या नावावर यापूर्वी कधीही गॅस कनेक्शन घेतलेले नसावे किंवा घरात इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन असू नये.
- या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला Self Declaration Form भरणे गरजेचे आहे. अर्जदार आला रेशन कार्ड झेरॉक्स प्रत द्यायची गरज नाही.
- अर्ज करणाऱ्या महिलेच्या नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे/अनिवार्य आहे.
- अर्जदार महिला बीपीएल (BPL) कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
वरील पात्रता या प्रधानमंत्री उज्वला योजनेचे आहेत. या पात्रतेमध्ये कोणतीही महिला पात्र होत असेल तर या योजनेचा लाभ येऊ शकतात.

प्रधानमंत्री उज्वला योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- अर्जदार महिलेच्या बँक खात्याचे तपशील झेरॉक्स
- कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड झेरॉक्स
- टेलिफोन/वीज/ पाणी बिल
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना अर्ज प्रक्रिया
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- धन मंत्री उज्वला योजने अंतर्गत ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम त्याच्या क्षेत्रातील जवळच्या गॅस वितरण केंद्रात जावे लागेल.
- गॅस वितरण केंद्रातून प्रधानमंत्री उज्वला योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात भरून त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी लागेल.
- सदर भरलेला अर्ज गॅस वितरण केंद्रात जमा करावा लागेल.
- अर्जदाराने गॅस वितरण केंद्रात भरलेला अर्ज गॅस वितरण केंद्राकडून सदर अर्जाची कागदपत्राची तपासणी करून गॅस वितरक तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभासाठी मंजुरी देतील.
वरील पद्धतीने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्जदाराला भरता येईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- पद्धतीने अर्ज करताना सर्वप्रथम अर्जदाराला प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.???? https://www.pmuy.gov.in
- वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील उपलब्ध गॅस कंपनीची निवड करावी लागेल. (HP gas/Bharat Gas/Indane gas)
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला नवीन जोडणी साठी ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला Type of Connection मध्ये Ujjwala 2.0 New Connection निवडावे लागेल.
- त्यानंतर राज्य मध्ये महाराष्ट्र आणि जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करायची आहे. पुढे तुम्हाला यादी पहा वर क्लिक करावे लागेल.
- यादी पहा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील गॅस वितरकांची यादी दिसेल, यातील तुमच्या जवळील गॅस वितरकांची निवड करायची आहे, आणि पुढे चालू वर क्लिक करायचे आहे.
- चालू यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात भरायची आहे. व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यावर Submit या बटणावर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत अर्ज केल्याचा एक Text Message येईल. त्यानंतर काही दिवसांनी आपण सिलेक्ट केलेल्या गॅस वितरण केंद्रातून तुम्हाला फोन येईल आणि तुम्हाला कागदपत्राच्या पडताळणीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी होऊन आमच्या घरी गॅस कनेक्शन येईल.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा महाराष्ट्राला झालेला फायदा
- महाराष्ट्रातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून येतो.
- २०२४ पर्यंत, महाराष्ट्रात सुमारे १.२५ कोटीहून अधिक महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन दिले गेले आहे.
- या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाक इंधन मिळण्यास मदत झाली आहे.
पंतप्रधान उज्वला योजनेचा महाराष्ट्रातील बहुसंख्य कुटुंबानी मोठ्या प्रमाणावर फायदा घेतलेला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणारे महाराष्ट्र राज्य देशामध्ये आघाडीवर आहे.
सदर लेखामध्ये आपण प्रधानमंत्री उज्वला योजने संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर माहितीच्या आधारे कोणतीही व्यक्ती या योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून विस्तृतपणे किंवा संक्षिप्त स्वरूपात पाहून सदर योजनेचा लाभ घेऊ शकते.