मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र 2025 योजनेअंतर्गत मिळणार ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान…

नमस्कार मित्रांनो, आपण या लेखांमध्ये राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना म्हणजे शेततळे अनुदान योजना होय. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये शेततळे निर्माण करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना एक शाश्वत आणि निश्चित असा पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे.

राज्यामध्ये बहुसंख्य लोक हे पारंपारिक शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंब हे पूर्णपणे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. ही शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्याला शेतीमधील चढ-उतार सहन करावे लागत आहेत. यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी या संकटाचा घेता शेतीवर परिणाम होत असतो. या अनुषंगाने शेतकऱ्यांना बसत असलेले शेतीमधील नुकसान कमी करण्यासाठी व पाण्याचा शेतीला बसणारा फटका कमी करण्यासाठी राज्य सरकारने शेततळे अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेती उत्पादनामध्ये दीर्घकालीन शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यातील पर्जन्यावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन च्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेततळे अनुदान योजना सुरू केली आहे.

सदर लेखांमध्ये आपण शेततळे अनुदान योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये योजनेची उद्दिष्ट्ये, वैशिष्ट्ये, शेततळे अनुदान योजनेचे फायदे, या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, शेततळे अनुदान योजनेची पात्रता, या योजनेच्या अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

शेततळे अनुदान योजने विषयी थोडक्यात…

मागेल त्याला शेततळे योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. ही योजना राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१६ रोजी मंजूर केली होती. या योजनेचा लाभ राज्यातील शेतकरी घेऊ शकतात. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्याला शेततळे तयार करण्यासाठी  ५०,०००० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.

हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: मिळणार ₹3000 आणि उपयोगी उपकरणे | Vayoshree Yojana

या योजनेअंतर्गत ७ प्रकारच्या आकारमानाची शेततळे निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये सर्वात मोठे आकारमानाचे शेततळे ३०×३०×३ मीटर असून सर्वात कमी आकारमानाचे शेततळे १५×१५×३ मीटर आहे. सर्वात मोठ्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी ५०,००० रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

शेततळे अनुदान योजना राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील बहुतांश भाग हा दुष्काळी त्याचबरोबर अतिशय कमी पावसाचा असल्यामुळे या भागातील पाण्याची कमतरता कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना राज्य सरकारने युद्धपातळीवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषता मराठवाडा अतिशय दुष्काळी असल्यामुळे सरकारने ही योजना मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागू करण्यासाठी मोठे पाऊल उचललेले आहे. मराठवाड्यामध्ये पाऊस हा इतर ठिकाणांच्या तुलनेत सरासरीपेक्षा खूपच कमी पडत असतो. त्यामुळे मराठवाडा हा या शेततळे अनुदान योजनेचा केंद्रबिंदू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागेल त्याला शेततळे योजनेची उद्दिष्टे

मागेल त्याला शेततळे योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:

  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत करणे.
  • निश्चित आणि शाश्वत स्वरूपाचा पाणीपुरवठा शेतीला उपलब्ध व्हावा या अनुषंगाने मागेल त्याला शेततळे ही योजना राबवण्यात येत आहे.
  • पाहिजे तेव्हा पिकांना पाणीपुरवठा उपलब्ध होऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होऊन शेतकरी आर्थिक दृष्ट्या सदन व्हावा हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेची पात्रता

मागेल त्याला शेततळे योजनेची पात्रता खालील प्रमाणे:

  • या योजनेसाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  • मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • एससी, एसटी, अपंग, मागासवर्गीय आणि महिला अर्जदार असतील तर त्यांना  प्राधान्य दिले जाईल.
  • दारिद्र्यरेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी कारण पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये भरू शकेल अप्पा पुनर्भरण करणे शक्य होईल.
  • इतर प्रवर्गातील शेततळ्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल. (प्रथम अर्ज सादर करणाऱ्यांना प्राधान्य राहील)
हे वाचा-  प्रधानमंत्री आवास योजना २०२४ अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार घरासाठी  केंद्र सरकारकडून 3 लाख रुपये

मागेल त्याला शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे

मागेल त्याला शेततळे योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
  • उत्पन्न दाखला
  • ७/१२ उतारा व ८अ
  • पासपोर्ट साईट फोटो
  • दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • प्रतिज्ञापत्र
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारस दाखला (आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी)
  • मोबाईल नंबर

मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ

मागेल त्याला शेततळे योजनेचे लाभ खालील प्रमाणे:

  • मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून शेततळे बांधून मिळणार आर्थिक स्वरूपात दिल्यानंतर शेतकरी शेततळे तयार करून घेणार आहे.
  • शेततळे बनण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळत असल्याने शेतकरी शेतीसाठी निश्चित आणि शाश्वत स्वरूपाचा पाणीपुरवठा करून घेऊ शकतात.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष शेतकऱ्याला शेतीसाठी पाण्याचे नियोजन करून शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणार आहे.
  • शेततळे बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

मागेल त्याला शेततळे योजना लाभार्थ्याची जबाबदारी

मागेल त्याला शेततळे योजनेच्या लाभार्थ्याची जबाबदारी खालील प्रमाणे:

  • कृषी विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणीच शेततळे घेणे लाभार्थ्यासाठी अनिवार्य आहे.
  • शेततळे मंजूर झालेल्या तारखेपासून शेततळ्याचे काम ३ महिन्यात पूर्ण करणे लाभार्थ्यावर बंधनकारक राहील.
  • लाभार्थ्यांने त्याच्या बँक खात्याच्या पासबुकचे झेरॉक्स कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
  • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी लाभार्थ्याला स्थानिक प्रजातीची झाडे लावणे बंधनकारक आहे.
  • शेततळ्याच्या कामासाठी अगोदर कोणत्याही स्वरूपात लाभार्थ्यांना रक्कम मिळणार नाही.
  • शेततळ्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णपणे लाभार्थ्याची असेल.
  • शेततळ्याची नोंदणी ७/१२ वर करणे लाभार्थ्यावर बंधनकारक आहे.
  • शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मागेल त्याला शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वतःच्या खर्चातून करून लावणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याला ज्या आकाराचे शेततळे मंजूर होईल त्याच आकाराचे बांधणे बंधनकारक आहे.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर लाभार्थ्याला या नुकसानाची भरपाई मिळणार नाही.
  • राज्य सरकारकडून शेततळे बांधण्यासाठी ५० हजार रुपये आर्थिक स्वरूपात मदत दिली जाणार आहे ५० हजार रुपये पेक्षा जास्त खर्च लागला तर तो लाभार्थ्यांनी करायचा आहे.
हे वाचा-  ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025| ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत मिळणार १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

मागेल त्याला शेततळे योजना अर्ज प्रक्रिया

मागेल त्याला शेततळे योजनेचे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे. याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:

  • मागील त्याला शेततळे योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्ही लॉगिन युजर आयडी आणि आधार क्रमांक याद्वारे करू शकता.
  • त्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर उपघटकांमध्ये इनलेट्स आउटलेट्स किंवा यामध्ये दुसरा घटक आहे इंडियन आऊटलेट शिवाय यापैकी कोणताही पर्याय निवडा.
  • शक्यतो तुम्ही इनलेट आउटलेट शिवाय तुम्ही शेवटचा हा पर्याय निवडून अर्ज करा शेततळे लवकर मंजूर होते.
  • त्यानंतर तुम्ही परिणाम या ठिकाणी क्लिक करा. यामध्ये तुम्ही शेततळ्याची साईज कशी पाहिजे ती या ठिकाणाहून निवडू शकता, त्याचबरोबर लांबी रुंदी आणि खोली किती पाहिजे तेही या ठिकाणी निवडू शकता.
  • काय या सर्व बाबी निवडल्यानंतर त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ऑप्शन वर क्लिक करून अर्ज सबमिट करा आणि शेवटी पेमेंट करून अर्ज सादर करा.

मागेल त्याला शेततळे या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे राज्यातील नागरिक या योजनेचा लाभ मिळू शकतात.

या लेखामध्ये आपण मागेल त्याला शेततळे योजनेची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे,यामध्ये आपण योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया याविषयीचे संपूर्ण माहिती पाहिली आहे आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. धन्यवाद!

Leave a Comment