प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २०२५ अंतर्गत अनुदान Online Apply

Pradhanmantri Masya Sampda Yojana 2025

नमस्कार मित्रांनो, आम्ही केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अनेक नवनवीन योजना ज्या की देशातील नागरिकांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पडतील अशा योजनांची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पोहोचवत असतो. सदर लेखाच्या माध्यमातून ही आपण केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

जगामध्ये आपल्या देशाची ओळख ही एक कृषीप्रधान देश म्हणून आहे. देशातील सुमारे ५०% पेक्षा जास्त लोक हे शेतीव्यवसायात प्रत्यक्ष गुंतलेले आहेत. पण शेती व्यवसाय करत असताना शेतकरी हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून काही छोटे-मोठे शेतीपूरक व्यवसाय करत असतात. शेतीपूरक व्यवसाय करत असताना त्यांचा एकच उद्देश असतो की, या व्यवसायातून थोड्या प्रमाणात का होईना पैसे मिळतील.

सध्याची परिस्थिती पाहता शेती व्यवसाय नैसर्गिक संकटे त्यामध्ये गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळे त्याचबरोबर मानवनिर्मित संकटे यामध्ये शेतकरी हा पूर्णपणे हतबल झालेला दिसून येतो. ही संकटे ज्यावेळी येतात त्यावेळी शेतकरी पूर्णपणे निराश होऊन अगदी टोकाचे पाऊल ही उचलत असतो. त्यामुळेच अशा संकटातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असतात. शेतकरी हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून न राहता त्याने शेतीला जोड धंदा म्हणून सरकारच्या या विविध योजनांमधून आर्थिक सहाय्य घेऊन आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊन आत्मनिर्भर व्हावे या दृष्टिकोनातून सरकार अशा योजना राबवत असते.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत मिळते. म्हणूनच आपण सदर लेखाच्या माध्यमातून या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची वैशिष्ट्ये, उद्देश, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेविषयी थोडक्यात…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही केंद्र सरकारने १० सप्टेंबर २०२० रोजी सुरू केली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मत्स्य व्यवसाय विभाग पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय यांच्यामार्फत राबवली जाते. या योजनेचे लक्ष हे देशाच्या मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे हे आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार मार्फत २० हजार ५० कोटी रुपये इतक्या भरघोस निधीची तरतूद केली आहे. या योजनेचे लाभ मच्छीमार व मत्स्य व्यवसाय करणारे कारागीर घेऊ शकतात. या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही मत्स्य व्यवसाय विभागाने सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पर्यावरण दृष्ट्या निरोगी आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सामाजिक दृष्ट्या सर्वसमावेशक विकास घडवून आणणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत.

हे वाचा-  कृषी यांत्रिकीकरण महाराष्ट्र योजनेअंतर्गत शेती अवजारे खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान जाणून घ्या सविस्तर माहिती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५ चा अर्थसंकल्प सादर करताना या योजनेसाठी ६००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर मत्स्य पालन करणाऱ्या लोकांना सक्षम करण्यासाठी ६०० कोटी रुपयांच्या खर्चासह प्रधानमंत्री मत्स्य योजना अंतर्गत एक उपाय योजना सुरू करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना उद्दिष्टे

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:

  • मत्स्यव्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून २०२४-२५ पर्यंत मत्स्य उत्पादन ७० लाख टनापर्यंत वाढवणे.
  • मत्स्य व्यवसायामध्ये गुंतलेले मच्छीमार आणि कामगार यांना सक्षम करणे.
  • मच्छीमार आणि मत्स्य पालकांसाठी सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणे.
  • शाश्वत व सर्व समावेशक आणि न्याय पद्धतीने मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा विकास करणे.
  • मत्स्य व्यवसायासाठी लागणाऱ्या निसर्गातील साधन संपत्तीचा वापर करून मत्स्य व्यवसायाचे उत्पादन वाढवणे.
  • मच्छीमार आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि मोठ्या प्रमाणावर या व्यवसायामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  • मासे पकडल्यानंतर चे नुकसान २० ते २५ टक्क्यावरून १० टक्के पर्यंत कमी करणे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना फायदे

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे फायदे खालील प्रमाणे:

  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मासेमारी बंदर, फिश लँडिंग, फिश मार्केट फिश, सीड फॉर्म आणि फिश प्रोसेसिंग युनिट यासारख्या मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अनुदान आणि आर्थिक सहाय्य केले जाते.
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मत्स्यव्यवसाय करणाऱ्या आणि मच्छीमार कामगारांना अनुदान देते.
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना एखाद्या व्यक्तीला त्याचा  व्यवसाय एका मर्यादित क्षेत्रापुरता न ठेवता निर्यात करून आपल्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणण्यासाठी प्रोत्साहन देते.
  • मत्स्य व्यवसायामध्ये निर्यात करता यावी त्याचबरोबर कोल्ड चेन फिश प्रोसेसिंग युनिट आणि मासे उत्पादनाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पॅकेजिंग सुविधांच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते.
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही तलाव, पिंजरे आणि रोपवाटिका बांधणे त्याचबरोबर वायुविजन यंत्रणा आणि इतर आवश्यक उपकरणे बसवण्यासाठी मत्स्य पालकांना आर्थिक मदत करते जेणेकरून मच्छिमार मत्स्यव्यवसाय मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्त उत्पादन निर्मिती करू शकतील.
हे वाचा-  प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना २०२५ | अटल पेन्शन योजनेअंतर्गत सर्व वृद्धांना मिळणार पेन्शन
Pmmsy yojana

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे लक्ष

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लक्ष खालील प्रमाणे:

  • प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लक्ष हे मत्स्य उत्पादनात वाढ करणे.
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २० हजार ५० कोटी  रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली गेली आहे.
  • २०१८-१९ मधील उत्पन्न हे १३. ७५ दशलक्ष मेट्रिक टनावरून २०२४-२५ पर्यंत २२ दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत वाढवणे हे महत्त्वाचे लक्ष आहे.
  • सध्याची मत्स्य पालन उत्पादकता ३ टनाच्या राष्ट्रीय सरासरी वरून ५ टन प्रती हेक्टर वाढवणे.
  • देशांतर्गत  मासळीचा वापर हा दरडोई ५ किलो आहे तो १२ किलो पर्यंत वाढवणे.
  • मत्स्य व्यवसाय मधील काढणीनंतरचे नुकसान २० ते २५ टक्के वरून १० टक्के पर्यंत कमी करणे हे या योजनेचे लक्ष आहे.
  • ५५ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना पात्र व्यक्ती/संस्था/ कंपन्या

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी पात्र होणारे व्यक्ती, संस्था किंवा कंपन्या पुढील प्रमाणे:

  • मच्छीमार
  • मासेमारी करणारी कामगार आणि मासे विक्रेते
  • मत्स्यपालन महासंघ
  • मत्स्यपालन सहकारी संस्था
  • मत्स्यव्यवसाय विकास मंडळ
  • मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील बचत गट
  • राज्य मत्स्यव्यवसाय विकास मंडळ
  • राज्य सरकार व केंद्र सरकार आणि त्यांच्या संस्था
  • मत्स्यउत्पादक शेतकरी संस्था आणि कंपन्या
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व इतर मागासवर्ग
  • उद्योजक आणि खाजगी कंपन्या

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
  • मत्स्यपालन प्रकल्प अहवाल
  • जमिनीची कागदपत्रे
  • जमिनीच्या मालकीचे कागदपत्र किंवा जमीन मालकाकडून एनओसी यासारखे कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा अर्ज अर्जदाराला दोन पद्धतीने करता येतो. ऑनलाईन व ऑफलाईन आपण या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा याविषयीची माहिती पाहू.

हे वाचा-  अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: मराठा तरुणांसाठी १५ लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने अर्ज व्यवस्थितपणे व अचूक स्वरूपात भरून या योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • सदर अर्जामध्ये मत्स्य प्रकल्प अहवाल असणे आवश्यक आहे.
  • सदरचा अर्ज हा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याकडे किंवा अर्जदाराच्या अधिवासातील जिल्ह्याच्या किंवा संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

वरील माहितीच्या आधारे सदर योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्जदार अर्ज करू शकतो.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.???? https://www.pmmsy.dof.gov.in
  • वेबसाईटला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये क्विक लिंक्स येथील टेम्पलेट्स या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला पेजच्या डाव्या बाजूला टेम्प्लेट फॉर प्रिपरेशन ऑफ डीपीआर फॉर फीचर्स प्रोजेक्ट हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला पेजवर दोन पर्याय दिसतील त्यापैकी कोणत्याही एका पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात भरा.
  • त्यानंतर या योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा SCP DPR तयार करा त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाकडे तुमचा अर्ज सबमिट करा.
  • डीपीआर तयार करण्यासाठी टेम्प्लेट्स अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड केले जाऊ शकतात.
  • युनिट किमतीपेक्षा DPR आणि SCP ची किंमत जास्त असू शकते परंतु युनिटच्या किमतीनुसार तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सुमारे २९ लाभ दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी युनिट किमतीच्या ६०% खर्चाची तरतूद केली जाईल तर युनिट किमतीच्या ४०% इतर प्रयोगांना दिली जाईल.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेविषयीच्या संपूर्ण माहिती मध्ये आपण योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता, लक्ष, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात दिली आहे. ही माहिती कोणालाही अत्यंत उपयोगी ठरू शकेल.

सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे कोणतीही व्यक्ती ज्या योजनेचा लाभ घेऊ शकेल.

Leave a Comment