प्रधानमंत्री आवास योजना २०२४ अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार घरासाठी  केंद्र सरकारकडून 3 लाख रुपये

नमस्कार, आपण या लेखामध्ये केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री आवास योजना याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत देशातील सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून देशातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहेत.

Pradhanmantri Aawas Yojana 2024

माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा आहेत. अन्न वस्त्र या मूलभूत गरजा माणूस पूर्ण करू शकतो पण निवारा ही एक अशी गरज आहे की, ही गरज पूर्ण करताना माणसाला खूप कष्ट घ्यावे लागतात. पण तरीही स्वतःचे घर मिळणे हे प्रत्येकाच्या नशिबी नसते. याचे एकमेव कारण म्हणजे गरिबी हे आहे.

वरील कारणामुळे केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत या योजनेच्या लाभार्थ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर घरी बनण्यासाठी कर्ज दिले जाते आणि या कर्जावर शासनाकडून अनुदानही दिले जाते.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या या लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना काय आहे? त्याचबरोबर योजनेचे उद्दिष्ट, योजनेसाठी लागणारी पात्रता, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, सदर योजनेची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण सदर लेखांमध्ये पाहणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजनेविषयी थोडक्यात…

प्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जून २०१५ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली. या योजनेचा उद्देश बेघर, कच्ची घरे आणि दारिद्र्य रेषेखालील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे. केंद्र सरकारने या योजनेचे दोन भाग केले आहेत. त्यातील पहिला भाग प्रधानमंत्री शहरी गृहनिर्माण योजना आहे. तर दुसरा भाग प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना हा आहे. या योजनेद्वारे ३१ मार्च २०२२ पर्यंत देशात ४ कोटी पक्की घरी बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार द्वारे आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत गरीब तुम्हाला घरी बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची मदत सरकारकडून केली जाते. यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम ३ ते ६ लाख रुपये होती या कर्जावर अनुदानही मिळत असेल आता या कर्जाची रक्कम १८ लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आले आहे.

हे वाचा-  प्रधानमंत्री गोबर धन योजना २०२५ पहा संपूर्ण माहिती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी च्या अर्थसंकल्पात असे जाहीर केले की, प्रधानमंत्री आवास योजनेतील निधी वाटप ६६% ने वाढवून ७९ हजार कोटी रुपये केला.

त्याचबरोबर केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन्ही कार्यक्रमाची वैधता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना उद्दिष्ट्ये

मंत्री आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतातील ग्रामीण भागात कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पायाभूत सुविधा सह पक्की घरे प्रदान करणे हे आहे. या पायाभूत सुविधांमध्ये शौचालय, वीज, पाणी यांचा समावेश केला आहे.

खालील योजनांचे लाभ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळतील.

  • स्वच्छ भारत – शौचालये बांधण्यासाठी
  • सौभाग्य योजना – विज जोडणीसाठी
  • प्रधानमंत्री उज्वला योजना -एलपीजी कनेक्शनसाठी
  • जल जीवन मिशन – स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी
  • मनरेगा – रोजगारासाठी

वरील सर्व योजनांचे लाभ एकट्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत  लाभार्थ्यांना मिळतात.

प्रधानमंत्री आवास योजना पात्रता

  • गरीब कुटुंब
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती
  • बंधमुक्त कामगार
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
  • संरक्षण कर्मचारी/निमलष्करी दलाच्या सैनिकांच्या विधवा आणि आश्रित
  • ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे पक्या स्वरूपाची पक्या स्वरूपाची घरी नाहीत अशी कुटुंबे
  • कमी उत्पन्न गटातील लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख दरम्यान आहे अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे‌.
  • घराची सह-मालकी कुटुंबातील महिला सदस्याकडे असावी.
  • कुटुंबामध्ये पती-पत्नी अविवाहित मुले किंवा अविवाहित मुलींचा समावेश असावा.
  • मध्यम उत्पन्नाच्या श्रेणी १ मधील लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ६ लाख ते१२ लाख दरम्यान असावे.
  • श्रेणी २ मधील लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १२ लाख ते १८ लाख रुपये असावे.
  • कमी उत्पन्न गटातील लाभार्थी ६.५% अनुदानास पात्र आहेत. तर मध्यम उत्पन्न गटातील श्रेणी एक मधील लाभार्थी 4% अनुदानास तर श्रेणी दोन अंतर्गत लाभार्थ्याला ३% टक्के अनुदान मिळू शकते.
  • मध्यम उत्पन्न पहिल्या श्रेणीमधील लोकांचे चटई क्षेत्र १२० चौरस मीटर होते जे सरकारने वाढवून १६० चौरस मीटर केले आहे.
  • दुसऱ्या श्रेणीमध्ये येणाऱ्या मध्यम उत्पन्न धारकाचे चटई क्षेत्र यापूर्वी १५० चौरस मीटर होते ते २०० चौरस मीटर पर्यंत वाढवले आहे.
हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: मिळणार ₹3000 आणि उपयोगी उपकरणे | Vayoshree Yojana

वरील सर्व घटक प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहेत.

PMAY Features

प्रधानमंत्री आवास योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • फॉर्म नंबर १६
  • बँक खाते स्टेटमेंट

वरील सर्व कागदपत्रे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना एक सोप्या अर्ज प्रक्रियेतून जावे लागते. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने नागरिक अर्ज करू शकतात. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहू.

प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.???????????? https://pmaymis.gov.in
  • संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मुखपृष्ठावर नागरिकांचे मूल्यांकन वर क्लिक करा आणि ड्रॉप-आउट मेनू मधून अप्लाय ऑनलाईन पर्याय निवडा.त्या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिसतील तुम्हाला जो पर्याय लागू होत असेल तो निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला इन सीटू स्लॅम रिडेव्हलपमेंट पर्याय निवडा.त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव विचारेल हा सर्व तपशील भरा आणि तुमचा आधार तपशील पडताळणीसाठी चेक वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला फॉरमॅट ए दिसून येईल या फॉर्मसाठी तुमचे सर्व तपशील अगदी अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचा सर्व तपशील भरल्यानंतर कॅप्च्या प्रविष्ट करा. आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्जदारांना त्यांच्या अर्जाची गटविकास कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयात ही छाननी केली जाते पडताळणी पात्र आढळल्यास लाभार्थ्याचे नाव अंतिम यादीत नोंदवले जाते.

प्रधानमंत्री आवास योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदाराला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सरकारसोबत भागीदारी केलेल्या जवळच्या सीएससी किंवा संलग्न बँकेला भेट देऊ शकता. या ठिकाणाहून अर्जदार स्वतःचा प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज भरू शकतो. हा अर्ज भरण्यासाठी अर्जदाराला 25 रुपये इतके नाममात्र शुल्क भरावे लागेल.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्जदार हा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अर्ज करू शकतो. या लाभार्थ्याची ओळख ग्रामसभेद्वारे केली जाते. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी दरवर्षी ग्रामसभे मार्फत जारी केली जाते.

हे वाचा-  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2025 विमाधारकांना मिळणार २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

प्रधानमंत्री आवास योजना अर्जाची स्थिती कशी तपासायची?

  • सर्वप्रथम अर्जदाराला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. जी वेबसाईट आपण वर दिलेली आहे.
  • नंतर तुम्हाला स्क्रीनवर होम पेज दिसेल
  • मुखपृष्ठावरील लाभार्थी विभागा वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर ‘नावाने सर्च करा’ यावर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल या पेज मध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि शो बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतरच्या पेजवर तुम्हाला तुमची लाभार्थी स्थिती पाहू शकता.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जाची स्थिती काय आहे हे तपासू शकता.

प्रधानमंत्री आवास योजना मोबाईल ॲप कसे डाऊनलोड करावे?

  • सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. जी वेबसाईट आपण वर दिलेली आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल.
  • होम पेजवर तुम्हाला MIS LOGIN च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक यादी दिसेल.
  • तुम्हाला या यादीतील प्रधानमंत्री आवास योजनाPMAY(U) पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करताच हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड होईल.

अशा पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे मोबाईल ॲप डाऊनलोड करून या मोबाईल वरून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने या योजनेचा अर्ज भरता येईल.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोण पात्र नाही?

  • ज्या व्यक्तीची उत्पन्न १८ लाख रुपये पेक्षा जास्त आहे तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाही.
  • ज्या व्यक्तीकडे देशात कुठेही पक्के घर आहे तो व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहे.
  • यापूर्वी घर खरेदीसाठी एखाद्या व्यक्तीने कोणत्याही स्वरूपातील सरकारी अनुदान घेतले असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाही.

सदर योजनेसाठी वरील व्यक्ती पात्र असणार नाहीत. त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला तरी त्यांचा अर्ज अपात्र केला जाईल.

सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर योजनेच्या माहिती च्या आधारे या योजनेसाठी कोणतीही पात्र व्यक्ती अर्ज करू शकते. आम्हाला अशा आहे की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडेल. धन्यवाद!

Leave a Comment