PM Samman Nidhi Yojna 2024
नमस्कार शेतकरी बांधवांनो, सदर लेखांमध्ये आपण केंद्र सरकारची एक महत्वकांक्षी योजना जी की फक्त शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे. त्या योजनेविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना होय. देशातील सुमारे ५५% लोक हे शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. म्हणून म्हणून शेती हा भारताच्या एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर शेतकरी हा समाजातील प्रमुख घटकापैकी एक आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६००० रुपये आर्थिक मदत प्रदान केली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सदरची रक्कम शेतीच्या अनेक कामांसाठी मदतीच्या स्वरूपात देणे ही आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये दर चार महिन्याला प्रत्येकी २००० रुपयांच्या स्वरूपात दिली जाते.
देशातील शहरी आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या सामाजिक आर्थिक असमानतेमुळे शेतकरी समुदायाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक संघर्ष करावा लागला आहे. या समस्येने स्वातंत्र्यानंतर भारताच्या लोकसंख्येच्या अधिक महत्त्वाच्या भागाला म्हणजेच शेतकरी वर्गाला त्रास दिला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मोठ्या प्रमाणावर असे अनेक उपक्रम राबवून ही सामाजिक आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. या योजनेच्या माध्यमातूनच भारत सरकारने २०१८ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
म्हणूनच आपण सदरच्या लेखांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण किसान सन्मान निधी योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, त्याचबरोबर या योजनेची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबद्दल थोडक्यात…
तेलंगणा सरकारने २०१८ मध्ये, Ryuthu Bandhu योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. सदर योजनेच्या माध्यमातून तेलंगणा राज्य सरकारने शेतीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी वर्षातून दोन वेळा ठराविक रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली. यामुळे तेलंगणा मधील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. त्यामुळेच या योजनेची दखल केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतली गेली.
भारत सरकारने देशभरातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक साह्य देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ रोजी अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त होण्यास मदत झाली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे स्वरूप
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली.
- सदर योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६००० रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते.
- सुरुवातीला या योजनेसाठी केंद्र सरकारने २ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश केला होता. नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला.
- या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्ष ४ महिन्याच्या अंतराने २००० रुपयांचे ३ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडून जमा केले जातात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची वैशिष्ट्ये
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाचा आधार मिळणार आहे.
- या योजनेसाठी पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ६००० रुपये ३ समान हप्त्यांमध्ये दर ४ महिन्यांनी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात केंद्र सरकार द्वारे दिली जाते.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही पूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना असल्यामुळे या योजनेचा संपूर्ण निधी भारत सरकारकडून दिला जातो.
- या योजनेचा निधी देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे, पण लाभार्थ्याची ओळख त्यांच्या कक्षेत नाही. ही जबाबदारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारचे आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्रता निकष
- देशातील सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
- या योजनेचा लाभ फक्त भारतीय व्यक्तींनाच मिळणार आहे.
- भारतीय व्यक्ती म्हणजे भारतातील कोणत्याही राज्यांमध्ये राहणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
- यापूर्वी या योजनेचा लाभ २ हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळत असेल मात्र आता केंद्र सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवली आहे. ज्याद्वारे २ हेक्टर ची मर्यादा हटवली आहे.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खाते असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्याचे बँक खाते नाही त्याला बँक खाते उघडावे लागेल.
- या योजनेसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी करता येते.
वरील योजनेसाठी देण्यात आलेल्या पात्रतेमध्ये जे कोणी शेतकरी बसत असतील ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अपात्र व्यक्ती
- संस्थात्मक जमीन धारण करणारा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहे.
- संवैधानिक पद धारण केलेल्या किंवा धारण केलेली व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहे.
- केंद्र तसेच राज्य सरकारमधील अधिकारी या योजनेसाठी अपात्र आहेत.
- डॉक्टर, इंजिनीयर, सीए, वकील या व्यक्तीशी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- आयकर भरणारी कोणतीही व्यक्ती किंवा तिचे कुटुंब प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्राप्त करण्यासाठी अपात्र आहे.
- सेवानिवृत्त झालेल्या आणि दरमहा १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन मिळवणारी व्यक्ती आणि तिचे कुटुंब या योजनेतून वगळण्यात आले आहे.
वर दिलेल्या सर्व व्यक्ती या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अपात्र आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- मतदार ओळखपत्र,ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड इ. ओळखपत्र
- बँक खाते तपशील (खाते क्रमांक, आयएफएससी कोड, बँक पासबुक प्रत इ.)
- मोबाईल नंबर (मोबाईल नंबर मुळे या योजनेची संबंधित सर्व माहिती लाभार्थ्याला त्याच्या मोबाईलवर मिळू शकते.)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम अर्जदार करणाऱ्या व्यक्तीला किंवा शेतकऱ्याला https://pmkisan.gov.in वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईटला भेट दिल्यानंतर या वेबसाईटचे मुखपृष्ठ उघडेल.
- या मुखपृष्ठावर अर्जदाराला ‘शेतकरी कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या पर्यायांमध्ये अर्जदाराला आणखी तीन पर्याय दिसतील.
- या तीन पर्यायांपैकी अर्जदाराला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्जदारासमोर एक नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये अर्जदाराला त्याचा आधार नंबर, प्रतिमा कोड भरावा लागेल आणि विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात पूर्ण करावी लागेल.
- सर्व माहिती अचूक स्वरूपात भरल्यानंतर अर्जदाराला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर नोंदणी फार्म ची एक प्रिंट आऊट अर्जदाराला घ्यावी लागेल आणि पुढे भविष्यासाठी ती जतन करावी लागेल.
- वरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- अर्जदाराने दिलेल्या मोबाईल नंबर वर वेळोवेळी या योजनेची माहिती त्याला मिळू शकेल.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अर्ज प्रक्रिया आपण वर दिले आहे. त्याप्रमाणे अर्जदार व्यक्तीही या योजनेचा अर्ज भरू शकते.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची ऑनलाईन ekyc कशी करायची?
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ऑनलाईन केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. https://pmkisan.gov.in
- या संकेतस्थळावर ekyc पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- ekyc पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करावा लागेल.
- त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर OTP येईल तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- वरील प्रक्रिया अचूक स्वरूपात केल्यानंतर तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.
वरील प्रक्रियेच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ची केवायसी करणे सोपे आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही ते कसे पाहायचे?
- लाभार्थ्याच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेज द्वारे कळू शकते किंवा तुम्ही या संकेतस्थळावर चेक करू शकता.???????????? https://pmkisan.gov.in
- वरील संकेतस्थळावरून पाहण्यासाठी सर्वप्रथम Farmer Corner मधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तिथे तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय निवडून त्यामध्ये माहिती टाईप करायचे आहे.
- त्यानंतर get data या पर्यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या हप्त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल.
- या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.
- आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे किती हप्ते सरकारने जारी केले आहेत, त्यापैकी किती हप्ते शेतकऱ्याला मिळाले याविषयीची संपूर्ण माहिती हप्त्यानुसार दिलेली असते.
वरील माहितीचा संदर्भ घेऊन लाभार्थी शेतकरी या योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे पाहू शकतो.
सदरच्या लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना विषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सदर माहितीचा संदर्भ घेऊन शेतकरी या योजनेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडू शकतात,आणि सदर योजनेचा लाभ मिळवू शकतात.