NPS Vatsalya Yojana 2025
नमस्कार, आपण केंद्र सरकारच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या योजनेमुळे आपल्या देशातील अल्पवयीन मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या केंद्र सरकारच्या योजनेचे नाव आहे NPS वात्सल्य योजना.
या योजनेचा प्रस्ताव भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात NPS वात्सल्य ही नवीन योजना सादर केला होता. एनपीएस वात्सल्य योजना या प्रस्तावानुसार १८ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू करण्यात आली. राष्ट्रीय पेन्शन योजना ही देशातील अल्पवयीन मुलांसाठी प्रामुख्याने असेल. या योजनेअंतर्गत पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्याचबरोबर त्यांना निवृत्तीनंतर विकास करण्यात मदत करण्यासाठी NPS मध्ये त्यांच्या वतीने ठराविक रक्कम योगदान स्वरूपात देता येईल
आपण सदर लेखाच्या माध्यमातून या योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, या योजनेसाठीची पात्रता, त्याचबरोबर या योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.
NPS वात्सल्य योजनेविषयी थोडक्यात….
२०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना प्रस्तावित होती. या योजनेची अंमलबजावणी १८ सप्टेंबर २०२४ पासून करण्यात आली. एनपीएस वाचले योजना पालक आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेच्या माध्यमातून पालक आणि त्यांची अल्पवयीन मुले यांना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी एनपीएस खाते उघडू शकतात आणि त्यांचे मुल १८ वर्षाचे होईल दर महिन्याला किंवा वर्षभरात रक्कम भरू शकतात. या योजनेअंतर्गत रक्कम भरण्याचे किमान योगदान प्रतिवर्ष १००० रुपये आहे आणि कमाल पैसे भरण्याच्या योगदानावर कोणतीही मर्यादा नाही.
एमपीएस वात्सल्य योजना ही सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेचा एक भाग आहे. ही योजना तरुणांसाठी खास करून तयार केली गेलेली आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलांसाठी खाते उघडून आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या बचतीसाठी योगदान देण्यासाठी. केंद्र सरकारने सुरू केलेली राष्ट्रीय पेन्शन योजना व्यक्तींना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पेन्शनचे उत्पन्न प्रदान करते.
अशाप्रकारे एनपीएस वासल्य योजना ही मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेची हमी देणारी सर्वोत्तम सेवानिवृत्ती योजनेच्या पर्यायांपैकी एक आहे.
NPS वात्सल्य योजनेची वैशिष्ट्ये
एनपीएस वात्सल्य योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:
- पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी एनपीएस वासल्य योजनेसाठी खाते उघडू शकतात,जे की या योजनेचे एकमेव लाभार्थी असतील.
- एनपीएस वात्सल्य योजनेद्वारे सुरू करण्यात आलेले खाते पालकाद्वारे अल्पवयीन मुलांच्या विशेष फायद्यासाठी चालवले जाईल. एकदा ते मुल १८ वर्षाचे झाली की ते जमा झालेल्या निधीसह खाते सुरू ठेवू शकते.
- अल्पवयीन मूल १८ वर्षाचे झाल्यानंतर त्या खात्याचे नवीन केवायसी केले जाईल बहुमत मिळाल्यानंतर ३ महिन्याच्या आत हे केले जाईल.
- केवायसी पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन व्यक्ती बहुसंख्य झाल्यानंतर खाते ऑपरेट करू शकते.
- अल्पवयीन मुल हे १८ वर्षे पूर्ण झाल्यावर, खाते चालू राहील आणि एनपीएस १ खाते सर्व नागरिक मॉडेलमध्ये शिफ्ट केले जाईल.
- सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने अद्वितीय पेन्शन रिटायरमेंट अकाउंट नंबर जारी करेल.
- एनपीएस वात्सल्य योजनेमध्ये किमान प्रतिवर्ष १००० रुपयाचे योगदान देता येते कमाल योगदानावर कोणतीही मर्यादा नाही.
- एनपीएस वात्सल्य योजना ही पैसे काढण्याचे आणि बाहेर पडण्याचेही पर्याय उपलब्ध करून देते.
- या योजनेमध्ये प्रारंभिक नाव नोंदणीचे योगदान १००० रुपयांचे आहे.
NPS वात्सल्य योजना फायदे
एनपीएस वात्सल्य योजनेचे फायदे खालील प्रमाणे:
- या योजनेमुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या पेन्शनसाठी गुंतवणूक मुलांच्या लहानपणापासूनच करता येऊ शकते.
- ही योजना दीर्घकाळ गुंतवणुकीच्या असल्यामुळे या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे.
- एनपीएस वासल्य योजनेमध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्याला करा मध्ये सवलत देण्यात येणार आहे.
- या योजनेतील रक्कम आणि कालावधी निवडण्याची पद्धत लवचिक आहे. ती या योजनेचा लाभ घेणाऱ्यावर अवलंबून असेल, तो त्याच्या सोयीनुसार ही पद्धत निवडू शकेल.
- मुलांच्या नावाने खाते असल्याने मुलांना याबाबतचा निर्णय घेणे अगदी सोपे आहे.
NPS वात्सल्य योजनेमध्ये किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल?
सदर योजनेसाठी ३ वर्षाचा लॉक इन कालावधी आहे. ३ वर्षानंतर शिक्षण, गंभीर आजार, आणि अपंगत्व या कारणासाठी सदरच्या खात्यामधून २५% रक्कम काढता येईल, हे जास्तीत जास्त ३ वेळा करता येते.
NPS वात्सल्य योजनेअंतर्गत खाते कोणाला उघडता येते?
या योजनेअंतर्गत ज्या मुलांचे वय १८ वर्षापेक्षा कमी आहे, ते एनपीएस वासल्य खाते उघडू शकतात. त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपोआप नियमित एनपीएस खात्यात या खात्याचे रूपांतर होईल. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावरच या खात्यातून निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन मिळू शकते. एनपीएस ने समभाग, कर्जरोखे आणि जी-सेक मधील गुंतवणुकीतून अनुक्रमे १४%, ९.१% आणि ८.८% परतावा दिला आहे.
NPS वासल्य योजनेच्या अटी व पात्रता
एनपीएस वात्सल्य योजनेच्या अटी व पात्रता खालील प्रमाणे:
- या योजनेसाठी १८ वर्षाच्या आतील सर्व मुले पात्र असणार आहेत.
- अनिवासी भारतीय आणि भारताचे परदेशी नागरिकत्व स्वीकारलेले १८ वर्षाखालील व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत.
- लहान मुलांचे पालक हे खाते उघडू आणि चालू शकतात.
- या योजनेअंतर्गत उघडण्यात येणारे खाते हे फक्त मुलांच्याच नावाने उघडले जाईल, म्हणजेच मुलेच या योजनेचे खरे लाभार्थी असतील.
- सर्व बँका पोस्ट ऑफिस पेन्शन फंडामध्ये हे खाते उघडता येऊ शकते किंवा ई-एनपीएस द्वारे देखील हे खाते उघडता येते.
- या योजनेअंतर्गत खाते उघडण्याची कमीत कमी मर्यादा ही १००० रुपये असणार आहे.
- या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठीची कमाल मर्यादा नाही म्हणजेच जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता.
- या योजनेअंतर्गत खात्यामध्ये जमा केलेल्या पैशावर लाभार्थ्याला चक्रवाढ व्याज मिळेल.
- तीन वर्षानंतर २५ टक्के रक्कम शिक्षण, आजार किंवा अपंगत्व यासाठी काढता येऊ शकते.
- मुलाचे वय १८ वर्षे होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढू शकता.
- या योजनेत एकदा गुंतवणूक केली तर मूल १८ वर्षाचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही.
NPS वात्सल्य योजना आवश्यक कागदपत्रे
एनपीएस वात्सल्य योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- पालकांचे आधार कार्ड
- अल्पवयीन व्यक्तीच्या जन्माचा पुरावा.
- पालकांची स्वाक्षरी
- अनिवासी भारतीय व्यक्तींच्या (NRI)बाबतीत पासपोर्टची स्कॅन केलेली प्रत
- 0IC (भारताचे परदेशी नागरिक) सदस्यांच्या बाबतीत परदेशी पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत
- एनआरआय आणि ओसीआय सदस्यांच्या बाबतीत बँकेच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत
NPS वात्सल्य योजनेअंतर्गत खाते उघडण्याची प्रक्रिया
एनपीएस वाचल योजना अंतर्गत खाते उघडण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- एनपीएस खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर जावे लागेल.???????? https://npstrust.org.in
- त्यानंतर खाली स्क्रोल करून एनपीएस वात्सल्य (अल्पवयीन) टॅब अंतर्गत ‘आता नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा.
- नंतर त्यामध्ये पालकाची जन्मतारीख, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि ईमेल प्रविष्ट करा आणि ‘नोंदणी सुरू करा’ वर क्लिक करा.
- पालकांच्या मोबाईल नंबर वर आणि ईमेलवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
- एकदा ओटीपी पडताळणी झाल्यानंतर स्क्रीनवर पोच पावती क्रमांक तयार केला जाईल. त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करा.
- त्यानंतर अल्पवयीन मूल आणि पालकांचे तपशील अचूक स्वरूपात प्रविष्ट करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा आणि ‘पुष्टी करा’ या पर्यायावर क्लिक करा.
- या योजनेसाठी कमीत कमी १००० रुपये भरा.
- PRAN जनरेट होऊन एनपीएस वासल्य खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडले जाईल.
अशा अगदी सोप्या ऑनलाईन पद्धतीने एनपीएस वासल्य योजनेचे खाते काढता येते.
अकस्मित मृत्यू झाल्यावर NPS वात्सल्य योजनेचे नियम
अकस्मित मृत्यू किंवा दुर्दैव मृत्यू झाल्यास एनपीएस वात्सल्य योजनेचे नियम खालील प्रमाणे:
- अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यास: अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण निधी पालकांना म्हणजेच नामांकित व्यक्तीला परत केला जाईल.
- पालकाचा मृत्यू झाल्यास: पालकाचा मृत्यू झाल्यास नवीन केवायसीद्वारे या योजनेअंतर्गत आणखी एका पालकाची नोंदणी केली जाईल.
- दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास: दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास मुलाचे कायदेशीर पालक १८ वर्षाचे होईपर्यंत योगदान न देता योजना सुरू ठेवू शकतात.
सदर लेखाच्या माध्यमातून आपण एनपीएस वात्सल्य योजनेची संपूर्ण माहिती पाहिली आहे. या माहितीच्या आधारे कोणी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेमध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, पात्रता, फायदे, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, या योजनेअंतर्गत खाते काढण्यासाठीच्या ऑनलाईन प्रक्रिया, या योजनेसाठीची पात्रता ही संपूर्ण माहिती आपण पाहिले आहेत. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडेल धन्यवाद!