प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2025 विमाधारकांना मिळणार २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात जीवन विमा हा खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण अत्यंत धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा जीवन विमा कोणत्या ना कोणत्या विमा कंपनीमध्ये काढून ठेवलेला असतो. त्यामुळे जीवन विमा हा एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील नियोजनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणूनच आज आपण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील लोकांना अगदी कमी पैशांमध्ये जीवन विमा संरक्षण प्रदान केले आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे समर्थन आहे. त्यामुळे ही योजना केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेमुळे देशातील प्रत्येक व्यक्ती हा जीवन विमा संरक्षण घेण्यासाठी पात्र ठरला आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल सदरच्या लेखांमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे काय? त्याचबरोबर या योजनेचे फायदे काय आहेत, सदरच्या योजनेसाठीचे निकष, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची अर्ज प्रक्रिया याबद्दलची संपूर्ण माहिती आपण सदरच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

विषयसूची

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. सदर योजना ही २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. सदरची योजना ही देशातील लोकांना अगदी कमी पैशांमध्ये जीवन विमा संरक्षण प्रदान करते. या योजनेसाठी १८ ते ५० वर्षी वयोगटातील कोणतीही व्यक्ती पात्र आहे. या योजनेच्या पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास या योजनेची रक्कम पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला किंवा वारसाला मिळते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही आरोग्य विमा प्रदान करत नाही. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ही योजना देशातील प्रत्येक व्यक्तीला किंवा नागरिकाला जीवन विमा संरक्षण प्रदान करणे हा आहे.

हे वाचा-  प्रधानमंत्री पिक विमा योजना : असा करा १ रुपयांमध्ये पिक विमा जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रता

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे.

  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारे व्यक्तीचे वय १८ ते ५० वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.
  • विमा हप्ता भरण्यासाठी अर्जदाराच्या बँक बचत खात्यात पुरेशी शिल्लक असणे गरजेचे आहे.
  • या जीवन विमा योजनेत सामील होण्यासाठी संमती दिली पाहिजे आणि त्याचबरोबर आवश्यक तो तपशील प्रदान केला पाहिजे.
  • या योजनेचा लाभ घेण्याची सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे अर्जदाराकडे इतर कोणतीही जीवन विमा योजना नसावी.

वरील पात्रता या प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी च्या आहेत. या पात्रतेमध्ये बसणारी प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी कोण पात्र नसेल

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत कोण पात्र नसेल ते खालील प्रमाणे

  • मादक पदार्थाच्या किंवा व्यसन करणाऱ्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्यास त्याला या योजनेचा फायदा मिळणार नाही.
  • जाणून-बुजून एखाद्याने स्वतःला दुखापत किंवा आत्महत्या केली तर अशा व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • कायद्याचे उल्लंघन, गुन्हेगारी हेतूने केलेले एखादे काम अशा व्यक्तींना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आले आहे.
  • या योजनेसाठी नाव नोंदणी करताना सुरुवातीच्या ३० दिवसाच्या आत नवीन सदस्यांना अपघाती मृत्यूसाठी संरक्षण दिले जात नाही.
  • या कालावधीतच गैर अपघाती मृत्यूच्या दाव्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आले.

या योजनेसाठी वरील पाच मुद्द्यातील करण्यात येणारे क्लेम हे वगळण्यात आले आहेत किंवा याचा फायदा सदरच्या व्यक्तींना मिळणार नाही.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे

  • या योजनेसाठी भरावा लागणारा प्रीमियम हा खूपच कमी आहे. प्रति वर्ष ३३० रुपये त्यामुळे हा प्रीमियम एखादा सर्वसामान्य व्यक्तीला ही परवडणारा आहे. आणि इतक्या कमी प्रीमियमच्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती त्याच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकतो.
  • पॉलिसी धारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास पॉलिसी धारकाच्या वारसाला विम्याची रक्कम मिळते. ही रक्कम पॉलिसी धारकाच्या कुटुंबाची आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यास मदत करते.
  • या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही खूपच सोपी आहे. एखादी  व्यक्ती त्याच्या बँकेला भेट देऊन या योजनेसाठी नाव नोंदणी करू शकते.
  • या योजनेचा एक सर्वात मोठा फायदा म्हणजे या योजनेसाठी नाव नोंदणी करताना कोणत्याही व्यक्तीला वैद्यकीय तपासणी करावी लागत नाही.
  • एखाद्या पॉलिसीधारकाने त्याच्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक ठेवल्यास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत या पॉलिसीचे दरवर्षी ऑटोमॅटिक नूतनीकरण केले जाते.
हे वाचा-  प्रधानमंत्री मोफत शिलाई योजना 2025 या योजनेच्या माध्यमातून महिला बनणार आत्मनिर्भर

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे वरील फायदे ही एखाद्या पॉलिसीधारकाला खूपच फायद्याचे आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील कोणतीही व्यक्ती फायदा घेऊ शकते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची अर्ज प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप पाहू.

  • प्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या.
  • बँकेला भेट दिल्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेच्या ग्राहक सेवांशी संपर्क साधा.
  • बँकेकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा अर्ज मागवा. सदरच्या अर्जामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती भरणे आवश्यक आहे. जसे की, नाव, वय, पत्ता आणि इतर नामनिर्देशित तपशील भरणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून प्रीमियम रकमेच्यासाठी तुम्ही परवानगी देणे आवश्यक आहे. परवानगी देण्यासाठी अर्जावर तुम्ही सही किंवा अंगठ्याचा ठसा देणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. शेवटी अर्ज योग्य रित्या भरला असल्याची खात्री करून अर्ज सबमिट किंवा जमा करा.
  • अर्ज भरत असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला वारसदार लावणे आवश्यक आहे. कारण तुमचा वारसदाराला विमा संरक्षण रक्कम मिळेल. अर्जामध्ये वारसदार व्यक्तीची संपूर्ण माहिती द्या.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम ३३० रुपये आहे. जो तुमच्या बँक खात्यातून ऑटो-डेबिट केला जाईल. कोणताही अयशस्वी व्यवहार टाळण्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक असल्याची खात्री करा, नाहीतर तुमची पॉलिसी रद्द होऊ शकते.

वरील अर्ज प्रक्रिया ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी आहे, वरील माहितीच्या आधारे एखादा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसीची ऑनलाईन स्थिती कशी पहायची?

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसीची ऑनलाईन स्थिती पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ज्या बँकेमध्ये या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून तुमच्या इंटरनेट बँकिंग खात्याला लॉगिन करा.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा विभाग निवडून ते तुमचा बँक खाते नंबर टाका.
  • त्यानंतर तुमचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा अर्ज क्रमांक टाकून त्याची स्थिती तपासण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

वरील माहितीच्या आधारे कोणतीही व्यक्ती प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेच्या अर्जाची स्थिती पाहू शकते.

हे वाचा-  गाय गोठा अनुदान योजना 2025| गोठा बांधणीसाठी मिळवा २.५ लाख रुपयापर्यंतचे अनुदान

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे?

  • सर्वप्रथम तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करा.
  • विमा ड्रॉप-डाऊन मेनू अंतर्गत, ‘सामाजिक सुरक्षा योजना’ निवडा आणि त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना निवडा.
  • व्यवहाराच्या पडताळणीसाठी UID सारखा व्यवहार प्रकार निवडा आणि तुमचा आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर तुमचे नाव, खाते क्रमांक, नामनिर्देशित माहितीसह तपशील द्या.’उत्तम आरोग्याची घोषणा’साठी बॉक्स चेक करा.
  • तुमचे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे प्रमाणपत्र नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमचे सर्व पॉलिसी तपशील मुखपृष्ठावर प्रदर्शित केले जातील. तेथून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.

वरील माहितीच्या आधारे एखादा व्यक्ती प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचे पॉलिसी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करून घेऊ शकतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना दावा नोंदणी आणि सेटलमेंट प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने कसे करायचे?

  • सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही ज्या बँकेमध्ये जर योजनेची पॉलिसी केली आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना विभागात Enter करा.
  • दावा अर्ज भरताना अचूक माहिती भरा.
  • दावा अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे सबमिट करा. जसे की मृत्यू प्रमाणपत्र, दावा अर्ज इ.
  • सदरच्या दावा अर्जावर विमा कंपनीकडून पडताळणी आणि मंजुरीची प्रतीक्षा करा.
  • दावा अर्ज एकदा मंजूर झाल्यानंतर, सेटलमेंट ची रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.

वरील माहितीच्या आधारे वारसदार दावा अर्ज दाखल करून सेटलमेंट ची रक्कम मिळू शकतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी रद्द कशी करावी?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची जोडलेल्या तुमच्या बँक कार्यालयात जाऊन सदर योजनेचे प्रीमियम वार्षिक ऑटो डेबिट थांबवण्याची विनंती करणे. पेमेंट ऑटो डेबिट न झाल्यास किंवा चुकल्यास पॉलिसी आपोआप रद्द होते.

दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही लिंक केलेल्या बँक खात्यातून सर्व रक्कम हस्तांतरित करा. रक्कम हस्तांतरित केल्यामुळे हे सुनिश्चित होते की अपुऱ्या निधीमुळे स्वयं डेबिट प्रक्रिया अयशस्वी झाली आहे ज्यामुळे पॉलिसी रद्द होते.

सदरच्या लेखांमध्ये आपण केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना की ज्या योजनेमुळे देशातील सर्व नागरिकांना अगदी कमी प्रीमियम मध्ये जीवन विमा प्राप्त होण्यास मदत झाली आहे. त्या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिली आहे. या लेखाच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया ही अगदी सोप्या पद्धतीने आपण दिली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हालाही माहिती नक्कीच आवडेल.

Leave a Comment