प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र २०२४, या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३० हजार आर्थिक मदत…

नमस्कार, सदर लेखाच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेडेगावांमध्ये राहते. खेडेगावामध्ये अजूनही नागरिकांना स्वतःची पक्की घरी आर्थिक परिस्थितीमुळे बांधता आलेली नाहीत. त्यामुळेच केंद्र सरकारने अशा आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना २०१५ पासून सुरू केली आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार यांचा हिस्सा अनुक्रमे ६०:४० इतका आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही देशातील ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर/कच्चा स्वरूपातील घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. महाराष्ट्र मध्ये या योजनेची अंमलबजावणी २०१६-१७ या वित्तीय वर्षापासून करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर असलेल्या किंवा कच्चा स्वरूपातील घरी असलेल्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत २ कोटी घरे बांधली आहेत, त्याचबरोबर २.७२ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी सरकार द्वारे लाभार्थ्यांना १,२०,००० रुपये दिले जातात. त्याचबरोबर डोंगराळ भागातील नागरिकांना १,३०,००० रुपये घरे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना देण्यात येतात.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे देशातील प्रत्येक बेघर कुटुंब आणि ग्रामीण भागातील कच्चा आणि खराब झालेल्या घरामध्ये राहणाऱ्यांना सन २०२४ पर्यंत मूलभूत सुविधा सह घर मिळावे. याचा लाभ १ कोटी कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे तात्काळ उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशातील बहुसंख्य नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेतून त्यांनी स्वतःसाठी एक मजबूत व पक्क्या स्वरूपाचे घर बनवलेले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार हे देशातील व राज्यातील नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणासाठी अशा अनेक प्रकारचे योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना होय.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने विषयीची संपूर्ण माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. यामध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, या योजनेची उद्दिष्टे, या योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठीचे पात्रता, त्याचबरोबर या योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया या विषयाची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहूया.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:

  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना पक्क्या स्वरूपाची घरी बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
  • लाभार्थी नागरिकांना १,२०,००० ते १,३०,००० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना पक्या स्वरूपाची घरे बांधण्यासाठी अनुदान तर मिळणारच आहे परंतु त्यासोबत मोफत एलपीजी कनेक्शन, पाणी कनेक्शन, वीज कनेक्शन सुद्धा जोडले जाणार आहे. या पायाभूत सुविधा मोफत मिळाल्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरामध्ये चार सदस्य असलेले कुटुंब सहज राहू शकेल अशी ग्वाही सरकार द्वारे देण्यात आली आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरासोबतच शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्याला १२ हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • एखाद्या लाभार्थ्याचे घर डोंगरात भागात असले तरी त्याला जलजीवन उपक्रमांतर्गत त्याच्या घरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जोडून देऊन त्याला 24 तास पाण्याचा पुरवठा केला जाईल.
हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: मिळणार ₹3000 आणि उपयोगी उपकरणे | Vayoshree Yojana

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना उद्दिष्ट्ये

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:

  • देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरिकांना स्वतःचे घर मिळावे व त्यांचे जीवनमान उंचावावे या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशातील बहुसंख्य नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे पक्या स्वरूपाचे घर बांधले आहे.
  • प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व मजबूत घर हवे असते परंतु काही आर्थिक अडचणीमुळे आर्थिक दुर्बल असणारे घटक आपले स्वतःचे असे पक्के घर बांधू शकत नाही अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत स्वतःचे घर बांधण्याची एक सुवर्णसंधी सरकारद्वारे दिली गेली आहे.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणत्याही अटींची गरज नसते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा फक्त भारताचा रहिवासी असायला हवा त्याचबरोबर त्याच्या नावावर कोणतेही पक्या स्वरूपाचे घर असू नये. या अटींच्या पूर्ततेनंतर लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना २०१५ ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशातील बहुसंख्य नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन पक्क्या स्वरूपाची घरे बांधली आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • रहिवाशी दाखला
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड
  • जॉब कार्ड
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकडे मजबूत घर नसल्याचा पुरावा.
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
हे वाचा-  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र २०२४ | Ladki Bahin Yojana Online Apply

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना फायदे

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचे फायदे खालील प्रमाणे:

  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांना घरे बांधण्यासाठी जास्त पैशाची तरतूद केली आहे. जर प्रकल्प पर्वत किंवा विशेष जिल्ह्यासारख्या कठीण ठिकाणी असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत आणखी पैसे मिळू शकतात.
  • ज्या नागरिकांना या योजनेअंतर्गत घर बांधायचे आहे ते बँकेकडून कर्ज घेऊ शकतात ते नागरिक ७० हजार रुपये पर्यंतचे कर्ज घेऊ शकतात, आणि त्यांना या रकमेवर अगदी कमी व्याज द्यावे लागते. त्यांना २ लाख रुपये पेक्षा अधिक पैशांची आवश्यकता असल्यास त्यांना कर्जावर सूट देखील मिळू शकते.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घराचे क्षेत्रफळ किमान २५ चौरस मीटर इतके मोठे असावे. त्याचबरोबर स्वयंपाक घर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे महत्त्वाचे आहे.
  • स्वच्छ भारत मिशन – ग्रामीण यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी १२००० रुपये पर्यंतची मदत मिळते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना त्यांच्या घरात शौचालय उपलब्ध करून देऊन स्वच्छतेला प्रोत्साहन देणे हे आहे.
  • प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला स्वयंपाक करण्यासाठी एक गॅस कनेक्शन मिळू शकते. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध होण्यास मदत करणे हा आहे.
  • स्वच्छ इंधनाबरोबरच नागरिकांना स्वच्छ पाणी वीज यासारख्याही पायाभूत सुविधा सरकारने दिलेल्या आहेत.
  • मनरेगा कायद्यानुसार ग्रामीण भागातील लोकांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना एकूण ९५ दिवसापर्यंत प्रत्येक दिवस कामासाठी ९०.९५ दिले जाणार आहेत.
  • 2011 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणातून विशिष्ट निकषावर आधारित घर बांधणी मदतीसाठी लाभार्थी निवडले जातात. या सर्वेक्षणातील डेटा घरासाठी खरोखर कोणाला मदतीची आवश्यकता आहे हे ओळखण्यास मदत होते. केवळ योग्य लोकांनाच मदत मिळते का याची खात्री करण्यासाठी स्थानिक समित्या तपासणी करतात. त्यामुळे संसाधनाचा योग्य वापर केला जातो. ही प्रक्रिया काळजीपूर्वक सर्वकाही निष्पक्ष आणि पारदर्शक असल्याची खात्री करून ज्यांना सरकारी मदत सर्वात जास्त आवश्यक आहे त्यांच्याकडून जाईल याची खात्री करते.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना पात्रता

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी ची पात्रता खालीलप्रमाणे:

  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारे व्यक्तीकडे त्याच्या नावावर पक्के घर नसावे.
  • अर्जदाराची वार्षिक उत्पन्न 3 लाख ते ६ लाख रुपयापेक्षा अधिक नसावे.
  • अर्जदार व्यक्ती ही बीपीएल म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील असावी.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो. यासाठीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर जावे लागेल.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना २०२४ साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘इन सी टू स्लम रिडेव्हलपमेंट’पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुमचा आधार क्रमांक टाका आणि त्यानंतर आधार कार्डवर तुमचे जसे नाव आहे तसेच नाव तिथे टाका.
  • त्यानंतर खाली तुम्हाला terms & conditions वर चेक आऊट करा आणि चेक बटणावर क्लिक करा आणि पुढे जा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती अगदी अचूक स्वरूपात भरा. आणि शेवटी कॅपच्या कोड इंटर करून सबमिट करा.
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2024 चा अर्ज भरून सबमिट करताना तुम्ही तो अर्ज व्यवस्थित रित्या व अचूक स्वरूपात भरला आहे की नाही त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अपलोड झाले आहेत का नाही हे पुन्हा एकदा व्यवस्थित तपासा. आणि पुन्हा एकदा कॅपच्या प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: मिळणार ₹3000 आणि उपयोगी उपकरणे | Vayoshree Yojana

वरील माहितीच्या आधारे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा अर्ज अर्जदार भरू शकतो. हा अर्ज भरणे खूपच सोपे असल्यामुळे, अर्जदार स्वतः हा अर्ज कोणाच्याही मदतीशिवाय भरू शकतो.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची घरकुल यादी कशी तपासावी?

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची घरकुल यादी तपासण्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:

  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची घरकुल यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल जी की आपण वर दिलेलीच आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Print Assessment वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या घरकुल यादी साठी show list या बटनावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात लिहावी लागेल. त्यानंतर तुम्हाला सर्च बटनावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर असेसमेंट फॉर्म उघडेल ज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या घरकुल यादी चा फॉर्म तुम्ही डाऊनलोड आणि प्रिंट करून घेऊ शकता.

आमच्याकडून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची संपूर्ण माहिती अधिक अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल.

या योजनेची संपूर्ण माहिती मध्ये आपण योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठीच्या अटी, पात्रता, त्याचबरोबर या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे किंवा जाणून घेतली आहे.

Leave a Comment