गाय गोठा अनुदान योजना 2025| गोठा बांधणीसाठी मिळवा २.५ लाख रुपयापर्यंतचे अनुदान

नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा आपला लेख शेतकरी वर्गासाठी खूपच फायदेशीर असणार आहे, कारण आज आपण ज्या योजनेबद्दल पाहणार आहोत ती योजना शेतकरी वर्गाला १००% लाभदायक ठरणार आहे. आपल्या देशामध्ये सुमारे ५५% लोक हे प्रत्यक्षपणे शेती या व्यवसायात गुंतले आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय करताना शेतीबरोबरच एखादा जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वळतात, जेणेकरून या व्यवसायातून चार पैसे मिळतील हा दृष्टिकोन ठेवून हा व्यवसाय केला जातो. पशुपालन व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्यापैकी एक अडचण म्हणजे पशुपालन व्यवसायासाठी आर्थिक अडचणीमुळे गाय व म्हशीसाठी पक्का गोठा बांधता येत नाही.

शेतकरी वर्गाची ही अडचण समोर ठेवून महाराष्ट्र सरकारने पशुपालक शेतकऱ्यांना गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठीची योजना म्हणून गाय गोठा अनुदान योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आपण सदरच्या या लेखांमध्ये गाय गोठा अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सदरच्या योजनेची उद्दिष्टे, गाय गोठा अनुदान योजनेच्या नियम अटी, या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, सदर योजनेची वैशिष्ट्ये, गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

गाय गोठा अनुदान योजनेविषयी थोडक्यात…

गाय गोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे राबवली जाते. सदरचे योजनेची सुरुवात ३ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे राबवली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणे. या योजनेसाठीचे लाभार्थी हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी असतील. या योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्याला जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान असा घेता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन आहेत.

ग्रामीण भागातील जनतेला किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी जात आहेत. हे स्थलांतर थांबून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाच रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच गाय गोठा अनुदान योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) काही योजनांच्या एकत्रीकरणातून सदरची योजना राबवण्यात आली आहे. केंद्र सरकार द्वारे मनरेगा योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा रोजगार देखील या योजनेची जोडला गेला आहे.

हे वाचा-  PM किसान सन्मान निधी तून शेतकऱ्यांना ६००० रुपये, असा करा अर्ज

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याकडे पशुधन असते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय केला जातो. परंतु या गाई म्हशींसाठी निवारा ग्रामीण भागात उत्तम स्थितीत नसतो, त्यामुळे जनावरांना बांधण्यात येणारी जागा खडबडीत, ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते. म्हणजेच ग्रामीण भागातील गोठे हे कच्च्या स्वरूपातील असतात. जनावरांचे मलमूत्र साठवण्यासाठी पुरेशी व्यवस्था गोठ्यामध्ये नसल्यामुळे पावसाळ्यात या गोठ्याला दलदलीचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे जनावरे अनेक आजारांनी ग्रासली जातात.

वरील सर्व कारणांमुळे जनावरांवर होणारा परिणाम लक्षात घेता त्यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने राबवलेली गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागू शकते.

गाय गोठा अनुदान योजना वैशिष्ट्ये

  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी किंवा पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येते.
  • गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखली जाते.

गाय गोठा अनुदान योजना उद्दिष्टे

  • राज्यातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात राज्य सरकारने केली आहे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • शेतकऱ्यांच्या पशुधनाचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणे.
  • शेतकऱ्यांना पशुधन पाळण्यासाठी प्रेरित करून त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करणे.

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान (शरद पवार ग्राम समृद्धी योजना)

  • गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत त गाई व म्हशींसाठी पक्या स्वरूपातील गोठ्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.
  • सदरच्या योजनेअंतर्गत २ ते ६ पशूंसाठी गोठा बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ७७,१८८ रुपये अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • ६ पेक्षा जास्त पशुंसाठी म्हणजेच १२ पशूंसाठी गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाणार आहे.
  • त्याचबरोबर १८ पशूंसाठी गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
  • पशूंसाठी २६.९५ चौरस मीटर जमीन गोठा बांधण्यासाठी धरण्यात आली आहे. त्याची लांबी ७.७ मीटर आणि रुंदी ३.५ मीटर असेल.
  • पशुंसाठी गव्हाण ७.७ मीटर ×०.२ मीटर ×०.६५ मीटर आणि २५० लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येणार आहे.
  • त्याचबरोबर पशूंना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुद्धा या योजनेतून बांधण्यात येईल.
हे वाचा-  काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना? | जनधन योजनेअंतर्गत खातेधारकांना १०,००० रुपयांचा मिळतो लाभ

गाय गोठा अनुदान योजना पात्रता निकष

  • गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे स्वतःची जमीन आणि इतर काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेच्या प्रत्येक कामाच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे असलेल्या पशूंचे जीपीएस टॅगिंग करणे आवश्यक आहे.
  • गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ फक्त शेतकरी वर्गालाच घेता येईल.
  • कोणत्याही व्यक्तीने किंवा शेतकऱ्याने जर याआधी केंद्र तसेच राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या एखाद्या योजनेचा लाभ गाय, म्हैस व शेळी साठी शेड बांधून घेतला असेल तर तो शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार नाही.
  • गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ एका कुटुंबाला फक्त एकदाच घेता येईल.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी या योजनेचा लाभ येऊ शकतात.

गाय गोठा अनुदान योजनेसाठी वरील पात्रता आहेत. सदर पात्रतेमध्ये जो कोणी शेतकरी पात्र होत असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

गाय गोठा अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्न दाखला
  • रहिवासी दाखला (महाराष्ट्र)
  • ग्रामीण भागात राहत असलेला रहिवाशी दाखला
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • जन्माचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पूर्वी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतलेले घोषणापत्र
  • शेड बांधण्यात येणाऱ्या जागेत अर्जदाराचे सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे संमती पत्र/ना हरकत प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र
  • पशुधन पर्यवेक्षक, सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र
  • मनरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड
  • गोठा/शेड बांधण्याची अंदाजपत्रक

गाय गोठा अनुदान योजनेसाठी वरील सर्व कागदपत्रे ही अत्यंत महत्त्वाची आहेत.

गाय गोठा अनुदान योजना अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम या योजनेचा सरपंच, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कोणाकडे अर्ज करत आहोत त्यांच्या नावावर बरोबर चिन्हाची खूण करावी लागेल.
  • त्याखाली आपणाला ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे.
  • अर्जदाराने स्वतःचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • अर्जदार व्यक्ती ज्या कामासाठी अर्ज करणार आहे, त्यासमोर बरोबर चिन्हाची खूण करायची आहे.
  • अर्जदार व्यक्ती स्वतःची वैयक्तिक माहिती दिल्यानंतर व कामाचा प्रकार निवडल्यानंतर त्यासंबंधीचा आवश्यक कागदपत्राचा पुरावा जोडायचा आहे.
  • लाभार्थी व्यक्तीला गावचा रहिवासी दाखला जोडायचा आहे.
  • लाभार्थी व्यक्तीच्या नावे जमीन असल्यास अर्जावर ‘हो’ असे लिहायचे आहे. व त्यासोबत ७/१२ व ८अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
  • अर्जदारांनी निवडलेले काम अर्जदार प्रवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का? ते सांगायचे आहे.
  • त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. ठरावासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीची एक शिफारस पत्र द्यावी लागणार आहे. त्यामध्ये लाभार्थी सदर योजनेचा घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
  • सर्वात शेवटी लाभार्थ्याच्या कागदपत्राची व अर्जाची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल.
हे वाचा-  प्रधानमंत्री मोफत शिलाई योजना 2025 या योजनेच्या माध्यमातून महिला बनणार आत्मनिर्भर

गाय गोठा अनुदान योजनेसाठी वरील अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने अर्जदार करू शकतो.

काय गोठा अनुदान योजनेचा अर्ज रद्द होण्याचे कारण

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • अर्जदाराने अर्ज भरताना खोटी माहिती भरली असल्यास अर्ज रद्द होतो.
  • एकाचवेळी दोन अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराजवळ पशुधन उपलब्ध नसल्यास अर्ज रद्द होतो.
  • अर्जदार हा ग्रामीण भागातील नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसल्यास अर्ज रद्द होतो.
  • अर्जदाराने अर्ज पूर्वी त्याच्याकडे पक्या स्वरूपाचा गोटा उपलब्ध असल्यास अर्ज रद्द केला जातो.

वरील कारणामुळे गाय गोठा अनुदान योजनेचे अर्ज रद्द केले जातात त्यामुळे अर्ज रद्द होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन अर्जदाराने अर्ज करावा.

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यानंतर योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो

  • काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो
  • काम सुरू असतानाचा फोटो
  • काम पूर्ण झाल्याचा फोटो लाभार्थ्यासह

सदरच्या कामाचे तीन प्रकारातील फोटो अंतिम देयक प्रस्तावासोबत ७ दिवसात सादर करणे बंधनकारक असते.

सदरच्या लेखांमध्ये आपण गाय गोठा अनुदान योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात त्याचबरोबर अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सदर माहितीच्या आधारे पात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Comment