नमस्कार मित्रांनो, आपण सदर च्या लेखांमध्ये केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजना याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना ही केंद्र सरकारने महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत देशातील गरिब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केली आहे. म्हणजेच सदर योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे दिसून येते.
Pradhanmantri Muft Silai Yojana 2025
सदर लेखांमध्ये आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. यामध्ये पंतप्रधान शिलाई मशीन योजना काय आहे? त्याचबरोबर या योजनेचे फायदे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, या योजनेचा मुख्य उद्देश, सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, आणि सर्वात शेवटी या योजनेची अर्ज प्रक्रिया आपण पाहणार आहोत.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेविषयी थोडक्यात…
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना ही केंद्र सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवली जाते. या योजनेसाठी देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिला लाभार्थी असणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देणे हा आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा ही २० ते ४० वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागतो तो अर्ज लाभार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकतो.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल किंवा कमकुवत महिला त्याचबरोबर शेतमजूर कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. सदर योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना घेता येणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी महिलांना कामासाठी बाहेर जाता येत नाही त्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेद्वारे एक खूप मोठी सुवर्णसंधी मिळाली आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिलांना आर्थिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला घरबसल्या शिलाई मशीनच्या सहाय्याने शिवण काम करून एक चांगले उत्पन्न मिळवू शकतील. त्यामुळे त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. या योजनेच्या माध्यमातून त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना उद्दिष्टे
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेची प्रमुख उद्दिष्टे खालील प्रमाणे:
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
- देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करून घरबसल्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
- महिलांचे भविष्य उज्वल करणे या हेतूने प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.
- प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान सुधारणे त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे जेणेकरून महिलांना कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावता येईल.
- प्रधानमंत्री मोफत शिलाई योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतः उद्योजक होऊन स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना पात्रता
- प्रधानमंत्री मोफत शिलाई योजनेसाठीची महत्त्वाची पात्रता म्हणजे अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे वय २० ते ४० वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावेत.
- अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
- प्रधानमंत्री मोफत शिलाई योजनेसाठी विधवा किंवा अपंग महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.
- प्रधानमंत्री मोफत शिलाई योजनेसाठी कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदार महिला विधवा असल्यास त्या महिलेला अर्जासोबत विधवा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- या अगोदर एखाद्या महिलेने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे सुरू केलेल्या एखाद्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल तर अशा महिलेला या योजनेअंतर्गत सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ची पात्रता वरील प्रमाणे आहेत. या पात्रतेमध्ये कोणतीही महिला बसत असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकेल.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना लाभ
- प्रधानमंत्री मोफत शिलाई योजनेअंतर्गत देशातील तसेच राज्यातील ५०,००० महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील व आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांना मिळणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर बनतील त्याचबरोबर त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वरील लाभ मिळणार आहेत.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना कागदपत्रे
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- उत्पन्नाचा दाखला
- विधवा असल्यास विधवा प्रमाणपत्र
- अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रे प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक आहेत.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेची अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेची अर्ज प्रक्रिया ही अर्जदाराला दोन पद्धतीने करता येते. त्या कोणत्या आहेत हे आपण खाली सविस्तरपणे पाहूया.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज ऑफलाईन करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला त्याच्या रहिवाशी क्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका या शासकीय कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
- सदरच्या कार्यालयातून प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज घेऊन तो अर्ज व्यवस्थित व अचूक रित्या विचारलेली संपूर्ण माहिती त्या अर्जामध्ये भरावी लागेल.
- अर्जासोबत सदर योजनेसाठी लागणाऱ्या मूळ कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज जमा करा, अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची पोचपावती संबंधित अधिकाऱ्याकडून घ्यायला विसरू नका.
- अर्जदाराने केलेल्या अर्जाची संबंधित अधिकाऱ्याकडून पडताळणी झाल्यानंतर अर्जदार या योजनेचा लाभार्थी होऊन त्याला या योजनेद्वारे शिलाई मशीन मिळेल.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेची ऑफलाईन प्रक्रिया वरील प्रमाणे आहे. सदर माहितीच्या आधारे अर्ज करणारी महिला ऑफलाईन अर्ज करू शकते, व प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकते.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- त्यानंतर या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी फॉर्म लिंक शोधा आणि त्यात जाऊन शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करा वर क्लिक करा.
- त्यानंतर सदर योजनेच्या अर्जासाठी लागणारी संपूर्ण माहिती अगदी अचूकपणे भरा.
- त्यानंतर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जामध्ये लिहिलेली सर्व माहिती अचूक आहे का? ही पुन्हा एकदा खात्री करून घ्या. त्याचबरोबर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्याची ही खात्री करा. आणि त्यानंतर अर्ज सबमिट करा.

अशा पद्धतीने अर्जदार महिला प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना ही देशातील या राज्यामध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. ही योजना वेगवेगळ्या नावांनी सदरची राज्ये आपापल्या राज्यामध्ये राबवत आहेत.
महाराष्ट्र मध्ये या योजनेचे नाव मुख्यमंत्री स्वयंसिद्धी महिला सन्मान योजना असे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये लाभार्थी या महिला उद्योजक आहेत.
सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना याविषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. धन्यवाद!