नमस्कार, सदर लेखाच्या माध्यमातून आपण आज महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली योजना आहे. लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक नाराजीचा सूर उमटल्यामुळे या योजनेची घोषणा महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर मधून मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केली.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी योग्य व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य प्रदान करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेमुळे महाराष्ट्रातील शिकाऊ विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानंतर त्यांना योग्य ते व्यावसायिक कौशल्य देऊन त्यांच्या शिक्षणाानुसार त्यांना योग्य तो मोबदला सरकारद्वारे दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेच्या या लेखांमध्ये आपण लाडका भाऊ योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, पात्रता, लाडका भाऊ योजनेचे फायदे, त्याचबरोबर लाडका भाऊ योजनेचे अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेविषयी थोडक्यात…
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाणारी योजना आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर मधून केली. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी घेऊ शकतात. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचे उद्दिष्ट बेरोजगार उमेदवारांना किंवा तरुणांना उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण प्रदान करून रोजगारासाठी सक्षम बनवणे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ५५०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली गेली आहे. या योजनेसाठीचा इंटर्नशिप कालावधी सहा महिने इतका आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारे विद्यावेतन हे शासनाकडून देण्यात येणार आहे ते थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जाईल.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार युवा विद्यार्थ्यांना रोजगाराशी जोडण्यासाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासोबतच, १२ वी उत्तीर्ण युवकांना दरमहा ६००० रुपये, डिप्लोमा धारक युवकांना दरमहा ८००० रुपये तर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना दरमहा १०,००० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र युवा विद्यार्थ्यांना १ वर्षासाठी कारखाना किंवा एखाद्या कंपनीत अप्रेंटिसशिप करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे या युवा विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळेल ज्या आधारे त्यांना पुढे जाऊन नोकरी मिळवण्यात काही अडचण निर्माण होणार नाही.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना उद्दिष्टे
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे:
- राज्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांना उद्योगासंबंधी कौशल्य व व्यवहारिक प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीसाठी सक्षम बनवणे.
- औद्योगिक क्षेत्रामधील कुशल आणि कौशल्य तरुणांची मागणी पाहता त्यांची या योजनेअंतर्गत तफावत कमी करणे आणि रोजगाराच्या शक्यता वाढवणे.
- कौशल्य प्रशिक्षण घेत असलेल्या बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्यता प्रदान करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे.
- सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचे फायदे
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचे फायदे खालील प्रमाणे:
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला १ वर्षासाठी कारखाना किंवा एखाद्या कंपनीमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरीसाठी सक्षम बनवणे.
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत दरवर्षी १० लाख बेरोजगार युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
- या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणा दरम्यान ६००० ते १०,००० हजार रुपये पर्यंत प्रति महिना स्टायपेंड देखील दिला जाणार आहे.
- या योजनेद्वारे मिळणारी संपूर्ण रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यावर DBT द्वारे जमा केली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमुळे तरुण आर्थिक सक्षम होतील.
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेमुळे तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना मिळेल.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थी एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज देखील करू शकतील आणि नोकरी मिळवण्यास पात्र ठरतील.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पात्रता
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे:
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा प्रवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असावे.
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास असावी. बारावी पेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असलेले अर्जदार किंवा उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार इतर कोणत्याही भत्ता योजनेचा लाभ मिळवत नसावा.
- या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार कोणत्याही रोजगाराशी संबंधित नसावा.
- या योजनेअंतर्गत जो अर्जदार अर्ज करणार आहे त्या अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे गरजेचे आहे.
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा कार्य प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यांचा राहील.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा अर्ज अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीने करता येतो. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत खूपच सोपी आहे त्याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.???????????????? https://rojgar.mahaswayam.gov.in
- वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम मुख्य पेजवरील नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल OTP पडताळणीसाठी तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म येईल.
- या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अगदी काळजीपूर्वक आणि अचूक स्वरूपात प्रविष्ट करा.
- विचारलेली माहिती अचूक स्वरूपात प्रविष्ट केल्यानंतर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर Register या पर्यावर क्लिक करा.
- अशाप्रकारे तुम्हाला एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- हा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉगिन करा.
- आता तुमचा संपूर्ण तपशील डॅशबोर्ड वर दिसेल ज्यामध्ये तुम्हाला आणखी काही माहिती प्रवेश करावी लागेल.
- संपूर्ण माहिती प्रवेश केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल.
- प्राप्त झालेला OTP टाकून पडताळणी करा.
- त्यानंतर सर्वात शेवटी Submit बटणावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ही अर्ज प्रक्रिया खूपच सोपी आहे.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेविषयीची संपूर्ण माहिती आपण अगदी अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे राज्यातील तरुण लाभ घेऊ शकतात. या लेखामध्ये आपण या योजनेविषयीची संपूर्ण माहिती म्हणजेच या योजनेची वैशिष्ट्ये उद्देश पात्रता अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे या विषयाची संपूर्ण माहिती पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद!