प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना काय आहे, बेरोजगारांना होणार मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर

नमस्कार, केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार व उद्योजकतेच्या किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. म्हणूनच आपण या योजनेविषयीची संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये या योजनेची वैशिष्ट्ये,उद्दिष्टे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया या विषयाची माहिती आपण सविस्तरपणे पाहूया.

नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव नसतो, आणि अनुभव नसल्याने कंपन्या अश्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यास टाळाटाळ करतात. नवीन उमेदवारांना काम शिकत असताना काही पैसे कमावता यावेत या उद्देशाने या योजनेची आखणी करण्यात आली आहे. उमेदवारांना या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या क्षेत्रातील वेगवेगळ्या कामांचे प्रशिक्षण मिळते. सरकार कडून अनुदान मिळत असल्याने कंपन्यांना ही नवीन उमेदवारांना रोजगार देण्यास कोणतीही अडचण नाही.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेविषयी थोडक्यात….

या योजनेचा शुभारंभ ३ ऑक्टोंबर रोजी झाला. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने अंतर्गत ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून देशातील कंपन्या त्यांच्या कार्यक्रमांतर्गत रिक्त पदांची संख्या सांगतील आणि या रिक्त पदांच्या संख्येच्या आधारावर उमेदवार अर्ज करू शकतील.कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने इंटर्नशिप सुरू करण्यासाठी अंतिम तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार २ डिसेंबर पासून या योजनेअंतर्गत पहिल्या बॅचच्या उमेदवारांची इंटर्नशिप  सुरू होईल. पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत कंपन्या १० ऑक्टोबर पर्यंत रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. त्यानुसार उमेदवारांना १२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान या योजनेच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. ८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना ऑफर लेटर पाठवण्यात येणार आहे, तर दोन डिसेंबर पासून निवड झालेल्या उमेदवारांची इंटर्नशिप कंपन्यांमध्ये सुरू होणार आहे.

हे वाचा-  प्रधानमंत्री गोबर धन योजना २०२५ पहा संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:

  • प्रधानमंत्री इंटर्नशिप  योजनेच्या पोर्टलमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट ५०० कंपन्यांसह इतरही अनेक कंपन्यांचा समावेश आहे.
  • या योजनेअंतर्गत उमेदवारांना दर महिन्याला ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या पाच हजार रुपये मधील ४५०० केंद्र सरकारकडून आणि ५०० रुपये कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देण्यात येणार आहेत.
  • ऑनलाइन आणि दुरुस्त शिक्षणाशी संबंधित असलेले विद्यार्थी इंटर्नशिप कार्यक्रमासाठी पात्र आहेत.
  • पूर्णवेळ नोकरी न करणारे आणि पूर्णवेळ शिक्षण न घेणारे २१ ते २४ वयोगटातील सर्व इंटर्नशिपसाठी पात्र आहेत.
  • २०२३-२४ आर्थिक वर्षात ज्या कुटुंबाचे  उत्पन्न ८ लाखापेक्षा जास्त असेल ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
  • जर एखाद्या कुटुंबातील एखादा सदस्य कायमस्वरूपी सरकारी नोकरी करत असेल तर अशा कुटुंबातील व्यक्ती किंवा तरुण या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
  • या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी या हेल्पलाइन नंबरचा वापर करू शकता.१८००-११६-०९०

या योजनेचा लाभ प्रामुख्याने नवीन Graduate झालेल्या विद्यार्थ्यांना आणि सुशिक्षित बेरोजगारांना होणार आहे. कोणतेही काम करण्यासाठी सर्वात आधी ते शिकून घेणे आवश्यक असते. कोणतेही शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते परंतु Skill शिकण्यासाठी अनुभवाची गरज असते.

या योजनेचा फायदा उद्योगांनाही होणार आहे. कमी पगारात कामगार मिळाल्याने अनेक स्टार्टअप चा उत्पादन खर्च कमी होतो, त्यामुळे नवीन उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. 5 हजार रुपये सरकार कडून अनुदान मिळत असल्याने पैशाची अडचण येत नाही. या योजनेमुळे भारतात मोठ्या प्रमाणात Skill असलेले कामगार उपलब्ध होणार आहेत त्यामुळे अनेक परदेशी कंपन्या देशात येतील आणि नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

हे वाचा-  घरकुल आवास योजना ऑनलाईन सर्व्हे सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती

Graduation झाल्यानंतर साधारण उमेदवाराचे वय 21 वर्ष असते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर कोणतीही अट नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज करून योजनेचा लाभ घेता येईल. तुमच्या मित्रपरिवारातील नवीन सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार हमी मिळण्यासाठी या योजनेची माहिती करून द्या.

ही योजना भारत सरकारने सर्व राज्यात सुरू केली असल्याने महाराष्ट्रात ही या योजनेचा सहज लाभ घेता येईल.

Leave a Comment