नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदर लेखामध्ये आपण प्रधानमंत्री पिक विमा योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आपल्या देशाची ओळख एक कृषीप्रधान देश म्हणून आहे. देशातील सुमारे ५०% लोक हे शेती या व्यवसायामध्ये गुंतले आहेत. शेती या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. पण शेतकऱ्यांना सध्या शेती करताना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे त्यांचा हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीमुळे हिरावला जातो. या नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ अतिवृष्टी दुष्काळ गारपीट अवकाळी पाऊस त्याचबरोबर पिकावरील कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन त्यांना आर्थिक फटका बसतो या कारणामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित चुकते त्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्ज काढून शेती त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन तो नैराश्याच्या गर्तेत जातो आणि नाईलाजाने टोकाचे पाऊल उचलतो.
Pradhanmantri Pik Bima Yojana 2024
शेतीबाबत वरील सर्व कारणामुळे शेतकरी हा उदासीन झाला आहे त्यामुळे तो शेती क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसून येत आहे या सर्व कारणामुळे देशातील शेतीच्या व शेतकऱ्यांच्या समस्या विचार करून केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्या नुकसानीची भरपाई देण्यात येते.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या हिश्याची भीमा स्वरूपातील हप्त्याची रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पिक विमा पोर्टलवर पिक विम्याची नोंदणी करावी लागते.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती पाहताना या लेखांमध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, त्याचबरोबर या योजनेत असणाऱ्या पिकांची यादी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, या योजनेचे नियम व अटी, या योजनेचे अर्ज प्रक्रिया याविषयीची सर्व माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री पिक विमा योजने विषयी थोडक्यात…
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात एप्रिल २०१६ मध्ये झाली. ही योजना केंद्र सरकार द्वारे कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना शेतामधील पिकांच्या नुकसानीची आर्थिक भरपाई स्वरूपात दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या योजनेचे लाभार्थी देशातील सर्व शेतकरी असणार आहेत.
शेतकरी शेती करताना त्याच्या जवळील सर्व मौल्यवान संपत्ती पणाला लावून शेती करत असतो पण नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते त्यामुळे त्याला आर्थिक अटका बसतो ज्या शेती पिकावर त्याच्या कुटुंबाचे संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून असते ते या नैसर्गिक संकटामुळे ही आर्थिक गणित चुकते, त्यामुळे शेतकऱ्याला खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळेच देशातील शेतकऱ्यांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारने पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबवली आहे.
पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानीची घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी किंवा महसूल विभाग यांना देणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कर्जदार त्याचबरोबर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळांचां सुद्धा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.
- योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये DBT च्या साह्याने जमा करण्यात येईल.
- या योजनेमध्ये स्थानिक जोखीम आणि कापणी पश्चात आणि यांचा समावेश केला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना उद्दिष्टे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे उद्दिष्टे खालील प्रमाणे:
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक स्वरूपात सहाय्य उपलब्ध करून देणे.
- देशातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- पिकांच्या नुकसानीच्या काळात किंवा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित ठेवणे.
- देशातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करून त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- आर्थिक नुकसानीतून शेतकरी आत्महत्या यासारख्या शेतकऱ्यांच्या टोकाच्या निर्णयावर या योजनेच्या माध्यमातून आळा घालणे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत या कारणामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण मिळते
- पिकांची पेरणी केल्यापासून काढणीपर्यंतच्या कालावधीपर्यंत पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती व कीडरोप यामुळे येणाऱ्या घटीमुळे या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते.
- हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पूर, पावसातील खंड, दुष्काळ यासारख्या बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उत्पन्नाच्या ५०% पेक्षा जास्त घट होणार असेल तर नुकसान भरपाई देण्यात येते.
- अपुरा मान्सून त्याचबरोबर हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पेरणी लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाई देण्यात येते. (पेरणी व लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असावे.)
- नैसर्गिक आपत्ती म्हणजेच चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे पिकांच्या काढणी किंवा कापणी नंतर पीक सुकवण्यासाठी शेतात पसरून ठेवलेला पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. सदरची नुकसान पीक काढणी किंवा कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त १४ दिवस नुकसान भरपाईसाठी पात्र राहील.
- या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांने ज्या वित्तीय संस्थेमार्फत या योजनेत भाग घेतला आहे त्या वित्तीय संस्थेत किंवा संबंधित विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासाच्या आत नुकसानग्रस्त पिकांची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत ज्या क्षेत्राला विमा संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे त्या क्षेत्रामध्ये पाणी साठल्यास, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानी नुकसान भरपाई पंचनामे करून निश्चित करण्यात येईल.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अपवाद
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी काही अपवाद आहेत ते खालील प्रमाणे:
- प्रतिबंधित जोखीम
- द्वेषयुक्त नुकसान
- युद्ध आणि परमाणु जोखीमीमुळे उद्भवणारे नुकसान
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील पिकांची यादी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगामातील १४ पिकांची यादी खालील प्रमाणे:
- ज्वारी
- बाजरी
- मका
- नाचणी
- भात
- मुग
- तुर
- उडीद
- भुईमूग
- कारळे
- तीळ
- सोयाबीन
- कापूस
- खरीप कांदा
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत जिल्हा नुसार विमा कंपन्या
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्हा नुसार विमा कंपन्या खालील प्रमाणे:
१. भारतीय कृषी विमा कंपनी: वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, बीड
२. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.: लातूर
३. रिलायन्स जनरल इन्शुरन्स: यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
४. एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी लि.: हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, उस्मानाबाद
५. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.: नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
६. चोरामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लि.: औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड
७. आयसीआयसीआय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.: परभणी, वर्धा, नागपूर
८. युनिव्हर्सल सोंम्पो जनरल कंपनी लि.: जालना, गोंदिया, कोल्हापूर
९. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.: अहमदनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा
प्रधानमंत्री पिक विमा योजना पात्रता
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठीचे पात्रता पुढील प्रमाणे:
- अर्ज करणारा व्यक्ती हा ज्या राज्यातून तो या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी अर्ज करू शकतात.
- या योजनेसाठी देशातील सर्व शेतकरी पात्र आहेत.
- कुळाणे अगर भाडेपट्टी कराराने शेती करणं शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे फायदे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे फायदे खालील प्रमाणे:
- देशातील शेतकऱ्यांच्या पिकाचे चक्रीवादळ, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी त्याचबरोबर रोगराई यामुळे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येते.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल व शेतकऱ्यांच्या हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार मार्फत भरण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत देशातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसायाकडे आकर्षित होतील.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेमुळे शेती क्षेत्राचा विकास होईल.
प्रधानमंत्री पिक विमा योजना नियम व अटी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम वाटे आहेत त्या खालील प्रमाणे:
- सगळ्यात महत्त्वाची या योजनेची अट म्हणजे अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत फक्त शेती क्षेत्रात होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाते इतर क्षेत्रात होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाणार नाही.
- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- शेतामध्ये पिकांची पेरणी झालेली आहे याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे त्यामुळे पीक पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी, सरपंच अथवा ग्रामसेवकाचे पत्र सादर करू शकतो.
- जर एखाद्या शेतकऱ्यांनी शेत हसायला घेतले असेल तर व पीक पेरणी झाली असेल तर जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी अर्जासोबत जोडावी लागते.
- प्रधानमंत्री पिक विमा योजना फक्त केंद्र शासनाने सांगितलेल्या पिकांसाठीच लागू आहे.
- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात येते परंतु मानवनिर्मित आपत्तीमुळे झालेल्या नुकसानास कोणतीही भरपाई दिली जात नाही.
- शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्यापूर्वी केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या एखाद्या पिक विमा योजनेचा लाभ मिळवलेला नसावा.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मोबाईल द्वारे पिकांच्या नुकसानीची मोजमाप केले जाणार आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जमिनीचा ७/१२उतारा ८-अ दाखला
- पीक पेरणीचा दाखला म्हणून शेतकऱ्यांनी शेतात पिकांची पेरणी किंवा लागवड केल्या बाबतचे स्वयंघोषणापत्र
- बँक स्टेटमेंट
- पासपोर्ट साईज फोटो
- शपथ पत्र
प्रधानमंत्री पिक विमा योजना अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज एखाद्या अर्जदाराला दोन पद्धतीने भरता येतो ऑनलाईन व ऑफलाईन आपण या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा भरायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया:
प्रधानमंत्री पिक विमा योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- अर्ज करणारे व्यक्तीला सर्वप्रथम त्याच्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
- जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जाऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात भरून सोबत या योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे जोडावी.
- सदरचा अर्ज कृषी विभागात किंवा आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन जमा करावा लागेल.
अशाप्रकारे अर्जदार प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरू शकतो.
प्रधानमंत्री पिक विमा योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.???????????????????????? https://pmfby.gov.in
- वेबसाईट ओपन केल्यानंतर होम पेजवर अर्जदाराला शेतकऱ्यांचा अर्ज यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक स्वरूपात भरून त्याबरोबर या योजनेसाठी लागणारे आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड झाली आहेत का नाही हे पाहून सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
अशाप्रकारे तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सोप्या पद्धतीने भरता येईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्जाची स्थिती
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अर्जाची स्थिती एखाद्या अर्जदाराला खालील स्टेप बाय स्टेप पद्धतीने पाहता येईल.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल जी की आपण वर दिलेलीच आहे.
- त्यानंतर होम पेजवर पॉलिसीची स्थिती वर क्लिक करावे लागेल.
- तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Reciept Number टाकून Check Status बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अर्जाची स्थिती दिसेल.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मिळणारी हेक्टरी सबसिडी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मिळणारी हेक्टरी सबसिडी खालील प्रमाणे:
१. खरीप हंगामातील सर्व कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी शेतकऱ्यांना २ टक्के इतकी हेक्टरी सबसिडी दिली जाते.
२. रब्बी हंगामातील सर्व कडधान्य आणि तेलबिया पिकांसाठी शेतकऱ्यांना १.५ टक्के इतकी सबसिडी दिली जाते.
३. खरीप आणि रब्बी हंगामातील वार्षिक बागायती पिके त्याचबरोबर बारमाही बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना ५ टक्के इतकी सबसिडी दिली जाते.
प्रधानमंत्री पिक विमा योजने विषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या आधारे अगदी अचूक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. या माहितीच्या आधारे प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. आपण योजनेची संपूर्ण माहिती त्यामध्ये योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता, योजनेचे नियम व अटी, योजनेचा फायदा, या योजनेची अर्ज प्रक्रिया याविषयी सर्व माहिती दिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडेल. धन्यवाद!